________________
१७६
अनुसन्धान-७५(२)
धरमकरमची दाखवीली शिक्षा, जिनांजीचे जवले गेली घेतली वो दीक्षा; गिरनारगिरी वरि बैसले स्वामी, हेत् सिख्या-दिख्या दीली झाले सिवगामी. १० यांचा वो पिता बरवें समुद्रभूपाला, सिवादेवी रानीचा ल्योंक सुखुचा सुगाला; ज्याने जिनगुनस्तुति गानां मधे गावली, त्याने अष्ट सिद्धि नवनिधि रिधि पावली. ११ पहिलै पाहले ज्ञानदृष्टि खाल्ती वो धरती, तर लोक पाहले मागुनि गगना वरती; करती याची मनसूधी सुर-नर सेवो, ऐसा नको पाहला भी देवांचा देवो. १२ । संखचा लंछन स्वाम नेम निरंजना, गिरनार गिरिपती जतिजनरंजना; वाचक लखिमी सांगे तूही माझा नाथा, तू ही ग्यान तू ही ध्यान तू ही सिवसाथा. १३
इति महाराष्ट्रभाषायां श्रीनेमिस्तवनं ।
दीखणी भाषा लख्यते ।