________________
त्रिमंत्र
जैनांनी फक्त नवकार मंत्रच स्वीकारला आणि बाकीचे काढून टाकले. वैष्णवांनी नवकार मंत्र वगळला व स्वत:चा मंत्र तेवढा ठेवला. अर्थात् मंत्र सर्वांनीच वाटून घेतले आहे. अरे, या लोकांनी भेदाभेद करण्यात काहीच शिल्लक ठेवले नाही आणि म्हणून तर या हिंदूस्तानाची ही दशा झाली, या भेदाभेदीमुळे. पहा, या देशाची स्थिति छिन्न विछिन्न झाली आहे ना! आणि हे जे भेद केले आहेत, ते या अज्ञानी माणसांनी स्वत:चे मत योग्य आहे असे दाखविण्यासाठी केले आहेत. जेव्हा ज्ञानी असतात तेव्हा ते पुन्हा सर्व एकत्र करुन देतात, निष्पक्षपाती बनवतात. यासाठीच तर आम्ही तीन्ही मंत्र एकत्रच लिहीले आहेत. जर हे तीन मंत्र एकत्र म्हटले तर मनुष्याचे कल्यणाच होईल.
पक्षपातामुळेच अकल्याण
प्रश्नकर्ता : हे त्रिमंत्र कुठल्या परिस्थितित वाटले गेले असतील ?
दादाश्री : आपला संप्रदाय चालविण्यासाठी. हे आमचे बरोबर आहे! आणि जो स्वतःला बरोबर समजतो तो दुसऱ्यास चुकीचा समजतो. ही गोष्ट भगवंतांना खरी वाटेल का ? भगवंतांसाठी तर दोन्ही समानच ना? अर्थात् त्यामुळे स्वत:चेही कल्याण झाले नाही आणि दुसऱ्यांचेही कल्याण झाले नाही, सर्वांचेच अकल्याण केले या लोकांनी.
4
तरीसुद्धा या संप्रदायांना तोडण्याची आवश्यकता नाही, संप्रदाय राहणे गरजेचे आहे, कारण पहीलीपासून ते मॅट्रिकपर्यंत भिन्न-भिन्न धर्म असणे गरजेचे आहे आणि त्यासाठी अलग अलग शिक्षक हवेत. पण याचा अर्थ असा नाही की दुसरीचा वर्ग चुकीचा आहे, असे होऊन नये. मेट्रीकला आल्यावर कोणी असे म्हणेल की दुसरीचा वर्ग चुकीचा आहे, तर ते किती गैरवाजवी ठरेल ! सर्व वर्ग खरे आहेत, परंतु सर्व समान नाहीत !
त्रिमंत्र, स्वतःसाठीच हितकर
हे तर असे आहे की, एखादा मनुष्य म्हणेल की 'हे आमचे