________________
त्रिमंत्र
कशामुळे मीच शंकर आणि मीच निळकंठ म्हटले? तर या जगतात ज्यांनी ज्यांनी विष पाजले, ते सर्वच पिऊन टाकले. आणि तुम्ही जर ते प्यालात तर तुम्ही पण शंकर व्हाल. कुणी शीवी दिली, कोणी अपमान केला तर आशीर्वाद देऊन, समभावाने सर्वच विष पिऊन टाका तर शंकर व्हाल. तसे समभाव राहू शकत नाही, पण जेव्हा आशीर्वाद देतो तेव्हा तर समभाव येतो. नुसताच समभाव ठेवायला गेलो तर विषम भाव होऊन जाईल.
32
महादेव विषाचे सर्व पेले प्यायले होते, ज्यांनी विषाचे पेले दिले त्यांचे घेऊन पिऊन टाकले, आम्ही पण असे विषाचे पेले पिऊन महादेवजी झालो. तुम्हाला सुद्धा महादेव व्हायचे असेल तर असे करा . अजूनही वेळ निघून गेली नाही. पाच दहा वर्षे प्यायले तरी पुष्कळ आहे. तर तुम्ही सुद्धा महादेव व्हाल. पण तुम्ही तर तो विषाचा पेला पाजेल त्याआधी तुम्हीच त्याला पाजता ! 'घे, मला महादेव व्हायचे नाही, तू महादेव हो' असे म्हणता !
शिवोहम् केव्हा म्हणू शकतो ?
प्रश्नकर्ता: काही लोक 'शिवोहम् शिवोहम्' असे म्हणतात, ते काय आहे?
दादाश्री : असे आहे ना, या काळात नाही परंतु पूर्वी जे शिवस्वरुप झाले आहेत, मागच्या काळात जे शिवस्वरुप झाले असतील, ते ‘शिवोहम्’ बोलू शकतात, त्यांचीच नक्कल त्यानंतर त्यांच्या शिष्यांनी, या लोकांनी केली, आणि मग त्यांची नक्कल त्या शिष्यांच्या शिष्यांनी आणि त्यांच्याही शिष्यांनी केली. अशा तऱ्हेने सर्व नक्कलच करतात. असे करुन थोडेच शिव होणार आहेत ? घरात दररोज बायकोसोबत भांडणे होतात आणि तेथे 'शिवोहम् शिवोहम्' करतात, अरे, शिवाला का दोष देता? बायकोसोबत भांडण करत असेल आणि 'शिवोहम् ' म्हणत असेल तर शिवाची नालस्ती होणार की नाही ?