________________
त्रिमंत्र
दादाश्री : हा काही आजचा प्रोजेक्ट नाही. हा तर आधीपासूनचाच आहे, परंतु दुसऱ्या रुपात होता. दुसऱ्या रुपात म्हणजे भाषेत फक्त फरक असेल, परंतु अर्थ तर तो आणि तोच चालत आला आहे.
त्रिमंत्रात कोणी मॉनिटर नाही प्रश्नकर्ता : या सगळ्या मंत्रांमध्ये कोणी अग्रेसर, मॉनिटर तर असेल ना?
दादाश्री : कोणीच मॉनिटर नाही. मंत्रामध्ये मॉनिटर नसतो. मॉनिटर तर, लोक आपापला मॉनिटर ठरवून पुढे करतात की हा 'माझा मॉनिटर.'
प्रश्नकर्ता : परंतु जर मी सगळ्यांना सांगितले की 'तुम्ही माझे काम करा', दुसऱ्यांना सांगितले की, 'तुम्ही माझे काम करा' तर माझे काम कोण करेल?
दादाश्री : जेथे निष्पक्षपाती स्वभाव असतो तेथे सर्वजण काम करण्यास तयार असतात, सर्वच्या सर्व! एका पक्षाचा झाला तर दुसरे लोक लगेच विरोधी म्हणून समोर उभे राहतात, पण जर निष्पक्षपात असेल तर सर्व काम करण्यासाठी तयार होतात, कारण ते खूपच नोबल(मोठ्या मनाचे) असतात. हे तर आम्हीच आमच्या संकुचिततेच्या कारणाने त्यांना संकुचित बनवतो. निष्पक्षतेमुळे सर्व काम होतात. येथे तर कधीच अडचण आली नाही. आमच्या येथे चाळीस हजार माणसे हा त्रिमंत्र बोलतात, कोणालाही कुठलीही अडचण आली नाही. जरासुद्धा अडचण येत नाही.
काम करेल असे हे औषध । प्रश्नकर्ता : तीन मंत्र एकत्र बोलले तर उत्तम. ते धर्माचा समभाव आणि सद्भावासाठी चांगली गोष्ट आहे.
दादाश्री : त्यामध्ये, औषध निहित असते, काम करेल असे. ज्यांना मुलींची लग्ने करायची आहेत, मुलांचे लग्न करायचे आहेत,