________________
44
त्रिमंत्र
भावपूजा करतात, द्रव्यपूजा करत नाहीत, ते फक्त हा एकच मंत्र बोलू शकतात. आणि जे द्रव्यपूजा आणि भावपूजा दोन्ही करतात, त्यांनी सर्व मंत्र एकत्र बोलले पाहिजे.
मूर्तिचे भगवंत द्रव्य भगवंत आहेत, द्रव्य महावीर आहे आणि हा आत भाव महावीर आहे. त्यांना तर आम्ही सुद्धा नमस्कार करतो.
मनाला तर करतो मंत्र ____ जोपर्यंत मन आहे, तोपर्यंत मंत्राची आवश्यकता आहे आणि मन शेवटपर्यंत राहणार आहे. जोपर्यंत शरीर आहे तोपर्यंत मन आहे. मंत्र इटसेल्फ (स्वयं) म्हणतो की मनाला तर (खुश) करायचे असेल तर मंत्र म्हणा. हो, मनाला खुश करण्यासाठी हा सुंदर मार्ग आहे.
अर्थात त्याची रचनाच इतकी चांगली, पद्धतशीर आहे की तुम्ही मंत्र म्हणाल तर त्याचे फळ प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही.
त्रिमंत्राची भजना कोठेही प्रश्नकर्ता : त्रिमंत्र मानसिक रित्या कोणत्याही वेळी आणि कोणत्याही जागी करु (बोलू) शकतो की नाही? ।
दादाश्री : नक्कीच, कोणत्याही वेळी बोलू शकतो. त्रिमंत्र तर संडासातसुद्धा बोलू शकतो, पण असे म्हटल्याने लोक दुरुपयोग करतील आणि मग ते संडासातच बोलत राहतील. असे समजणार नाहीत की एखादे दिवशी काही अडचण असेल आणि वेळ मिळाला नाही, तर संडासात बोललो तर ती गोष्ट निराळी आहे. पण मग लोक या विधानाचा उलटा अर्थ घेतील, म्हणून अशा लोकांसाठी नियम ठेवावे लागतात, पण तरीसुद्धा आम्ही कोणतेही नियम ठेवत नाही.
नवकार मंत्राचा सर्जनकर्ता कोण? प्रश्नकर्ता : नवकार मंत्राचे सर्जनकर्ता कोण?