________________
42
त्रिमंत्र
तेव्हा कोणाचे निदिध्यासन करावे ?
प्रश्नकर्ता : त्रिमंत्र बोलताना प्रत्येक ओळीपाशी कोणाचे निदिध्यासन करावे. ते विस्तारानी सांगा.
दादाश्री : अध्यात्माच्या बाबतीत तुम्हाला कोणावर प्रेम वाटले आहे ? तुम्हास कोणावर प्रेमाचे भरते आले आहे ? कोणावर आले आहे ?
प्रश्नकर्ता : आपल्यावरच, दादा.
दादाश्री : तर त्याचेच ध्यान करा. ज्याच्यावर प्रेमाचे भरते येते ना, त्याचेच ध्यान करा.
उपयोगपूर्वक केल्याने फळ पुरेपूर
लोकांनी नवकार मंत्र तर आपपल्या भाषेत घेतला. महावीर भगवानांनी असे सांगितले होते की, यास कोणत्याही प्राकृत भाषेत घेऊ नका, अर्धमागधी भाषेतच राहू द्या. त्याचा ह्या लोकांनी काय अर्थ घेतला की, प्रतिक्रमण अर्धमागधी भाषेतच राहू दिले आणि ह्या मंत्राच्या शब्दांचे अर्थ काढू लागले ! प्रतिक्रमणात तर 'क्रमण' आहे आणि हा तर मंत्र आहे. प्रतिक्रमण हे जर यथार्थपणे समजता आले नाही तर ते (एका बाजूने) शिव्या देत राहातात आणि (दुसऱ्या बाजूने) त्याचे प्रतिक्रमण करतात.
गोष्ट समजत नाही आणि कसे - कसे दुराग्रह घरुन बोलतात. हा त्रिमंत्र आहे, त्यास कसाही वेडा माणूस बोलेल तर त्याला सुद्धा फळ मिळेल. तरीसुद्धा त्याचा अर्थ समजून वाचाल तर योग्य होईल.
हा नवकार मंत्र सुद्धा भगवानांच्या काळापासून आहे आणि अगदी योग्य आहे, परंतु नवकार मंत्र समजला तर ना? त्याचा अर्थ समजत नाही आणि गात राहतात. त्यामुळे त्याचा जसा लाभ मिळायला हवा तसा मिळत नाही. पण तरीसुद्धा घसरुन पडले नाहीत, ही चांगली गोष्ट आहे. नाहीतर नवकार मंत्र तर त्यास म्हणता येईल की नवकार मंत्र