Book Title: Trimantra Marathi
Author(s): Dada Bhagwan
Publisher: Dada Bhagwan Aradhana Trust
Catalog link: https://jainqq.org/explore/034051/1

JAIN EDUCATION INTERNATIONAL FOR PRIVATE AND PERSONAL USE ONLY
Page #1 -------------------------------------------------------------------------- ________________ Marathi WAR दादा भगवान कथित त्रिमंत्र વર્તન તેથેર ગ્રામ Page #2 -------------------------------------------------------------------------- ________________ दादा भगवान कथित त्रिमंत्र मूळ गुजराती संकलन : डो. नीरूबेन अमीन अनुवाद : महात्मागण Page #3 -------------------------------------------------------------------------- ________________ प्रकाशक श्री अजित सी. पटेल दादा भगवान आराधना ट्रस्ट, दादा दर्शन, 5, ममतापार्क सोसायटी, नवगुजरात कॉलेजच्या मागे, उस्मानपुरा, अहमदाबाद - 380014, गुजरात. फोन - (079 ) 39830100 © All Rights reserved - Shri Deepakbhai Desai Trimandir, Simandhar City, Ahmedabad-Kalol Highway, Adalaj, Dist.-Gandhinagar-382421, Gujarat, India. No part of this book may be used or reproduced in any manner whatsoever without written permission from the holder of the copyrights. प्रथम आवृत्ति : 3,000 ऑक्टोबर 2016 भाव मूल्य : ‘परम विनय' आणि 'मी काहीच जाणत नाही', हा भाव! द्रव्य मूल्य : 10 रुपये मुद्रक : अंबा ऑफसेट B-99, इलेक्ट्रोनीक्स GIDC, क-6 रोड, सेक्टर-25, गांधीनगर-382044 फोन : (079) 39830341 Page #4 -------------------------------------------------------------------------- ________________ [त्रिमंत्र नमो अरिहंताणं नमो सिखाणं नमो आयरियाणं नमो उवझायाणं नमो लोए सब्यसाहूर्ण एसो पंच नमुकारो, सव्य पावप्पणासणी मंगलाणं च सव्वेसिं, पडर्म हवाइ मंगलम् १ ॐ नमो भगवते वासुदेवाय २ ॐ नमः शिवाय ३ जब सच्चिदानंद Page #5 -------------------------------------------------------------------------- ________________ दादा भगवान कोण? जून १९५८ संध्याकाळची अंदाजे सहाची वेळ, सुरत स्टेशनवर अलोट गर्दी होती. प्लेटफार्म नंबर तीनच्या रेल्वेच्या बाकावर बसलेले श्री. अंबालाल मुळजीभाई पटेल रुपी देहमंदिरात नैसर्गिक स्वरूपात कित्येक जन्मांपासून व्यक्त होण्यासाठी आतूर असलेले 'दादा भगवान' संपूर्णपणे प्रगट झाले आणि निसर्गाने सर्जन केले अध्यात्माचे अद्भुत आश्चर्य! एका तासात विश्वदर्शन लाभले! मी कोण? भगवंत कोण? जग कोण चालवत आहे? कर्म म्हणजे काय? मुक्ती कशाला म्हणतात? इत्यादी जगातील सर्व आध्यात्मिक प्रश्नांची रहस्ये संपूर्णपणे प्रकट झाली. अशा प्रकारे निसर्गाने विश्वाला प्रदान केले एक अद्वितीय, संपूर्ण दर्शन आणि ह्याचे माध्यम बनले अंबालाल मूळजीभाई | पटेल, जे होते गुजरातचे चरोतर जिल्ह्यातील भादरण गावचे पाटील, कंट्राक्टचा व्यवसाय करणारे आणि तरीही पूर्ण वीतराग पुरुष. त्यांना ज्ञान प्राप्ति झाली तशी ते फक्त दोन तासात इतर मुमुक्षुनां सुद्धा आत्मज्ञान प्राप्ति करवीत असत, त्यांच्या सिद्ध झालेल्या अद्भुत ज्ञान प्रयोगाद्वारे. त्याला अक्रम (क्रमविरहीत) मार्ग म्हटले जाते. अक्रम म्हणजे क्रमाशिवायचा आणि क्रम म्हणजे पायरी पायरीने, क्रमाक्रमाने वर चढणे! अक्रम म्हणजे लिफ्ट मार्ग! शॉर्ट कट!! ते स्वतः प्रत्येकाला 'दादा भगवान कोण?' ह्याबद्दलची फोड करून देताना म्हणायचे की, "हे दिसतात ते 'दादा भगवान' नाहीत. हे तर ए.एम. पटेल आहेत. आम्ही ज्ञानीपुरुष आहोत आणि आत प्रगट झाले ते दादा भगवान आहेत. दादा भगवान तर चौदालोकाचे नाथ आहेत, ते तुमच्यात पण आहेत, सर्वांमध्ये आहेत! तुमच्यात अव्यक्त रुपात आहेत आणि 'येथे' माझ्या आत संपूर्णपणे व्यक्त झालेले आहेत! माझ्या आत प्रगट झालेले 'दादा भगवान' यांना मी पण नमस्कार करतो." व्यापारात धर्म असावा परंतु धर्मात व्यापार नसावा.या सिद्धांताने त्यांनी आपले संपूर्ण जीवन व्यतीत केले. संपूर्ण जीवनात त्यांनी कधीही कोणाकडूनही पैसे घेतले नाहीत, उलट स्वतःच्या व्यवसायातून झालेल्या फायद्यातून भक्तांना यात्रा करवीत असत. Page #6 -------------------------------------------------------------------------- ________________ आत्मज्ञान प्राप्तिची प्रत्यक्ष लींक मी तर, काही लोकांना माझ्या हातून सिद्धि प्रदान करणार आहे. नंतर कोणीतरी हवा की नको! नंतर लोकांना मार्ग तर हवाच ना? ___ - दादाश्री परम पूज्य दादाश्री गावो-गावी, देश-विदेशी परिभ्रमण करुन मुमुक्षूना सत्संग आणि आत्मज्ञान प्राप्ती करवीत होते. दादाश्रींनी आपल्या हयातीतच पूज्य डॉ. नीरुबहन अमीन (नीरुमा) यांना आत्मज्ञान प्राप्त करवून देण्याची ज्ञानसिद्धी प्रदान केली होती. दादाश्रींच्या देहविलयानंतर नीरुमा त्यांच्याप्रमाणेच मुमुहूंना सत्संग व आत्मज्ञाप्राप्ती निमित्त भावाने करवित असत. पूज्य दीपकभाई देसाई यांना दादाश्रींनी सत्संग करण्याची सिद्धी प्रदान केली होती. पू. नीरुमांच्या उपस्थितीतच त्यांच्याच आशीर्वादाने पूज्य दीपकभाई देश-विदेशात कित्येक ठिकाणी जाऊन मुमुक्षूना आत्मज्ञान प्राप्ती करवून देत होते, हे कार्य नीरुमांच्या देहविलयानंतर आजसुद्धा चालूच आहे. या आत्मज्ञान प्राप्तीनंतर हजारो मुमुक्षु या संसारात राहून, सर्व जबाबदाऱ्या संभाळत असताना सुद्धा मुक्त राहून आत्मरणतेचा अनुभव घेत आहेत. पुस्तकात मुद्रित वाणी मोक्षार्थीला मार्गदर्शनासाठी अत्यंत उपयोगी सिद्ध होईल, परंतु मोक्षप्रप्तिसाठी आत्मज्ञान प्राप्त करणे गरजेचे आहे. अक्रम मार्गाने आत्मज्ञान प्राप्तीचा मार्ग आजसुद्धा चालू (मोकळा) आहे. जसा प्रज्वलित दिवाच दुसऱ्या दिव्याला प्रज्वलीत करु शकतो, त्याचप्रमाणे प्रत्यक्ष आत्मज्ञानींकडून आत्मज्ञान प्राप्त करुनच स्वतःचा आत्मा जागृत होऊ शकतो. Page #7 -------------------------------------------------------------------------- ________________ निवेदन परम पूज्य ‘दादा भगवान' यांच्या प्रश्नोत्तरी सत्संगात विचारलेल्या प्रश्नांचे उत्तर देताना त्यांच्या श्रीमुखातून अध्यात्म आणि व्यवहार ज्ञानासंबंधी जी वाणी निघाली, ती रेकॉर्ड करून, संकलन व संपादन करून पुस्तकांच्या रुपात प्रकाशित केली जात आहे. त्याच साक्षात सरस्वतीचे अद्भूत संकलन ह्या पुस्तकात झाले आहे, जे आम्हा सर्वांसाठी वरदानरुप ठरेल. __ प्रस्तुत अनुवादाची वाक्यरचना मराठी व्याकरणाच्या मापदण्डा वर कदाचित खरी ठरणार नाही, परंतु दादाश्रींची गुजराती वाणीचे शब्दशः मराठी अनुवाद करण्याचा प्रयत्न केलेला आहे, की जेणे करुन वाचकांना असा अनुभव व्हावा की दादाजींचीच वाणी ऐकली जात आहे. पण तरीसुद्धा दादाश्रींच्या आत्मज्ञानाचे अचूक आशय, जसे आहे तसे तर तुम्हाला गुजराती भाषेतच अवगत होईल. ज्यांना ज्ञानाचा गहन अर्थ समजून घ्यायचा असेल, ज्ञानाचा खरा मर्म जाणायचा असेल, त्यांनी या हेतूने गुजराती भाषा शिकावी अशी आमची नम्र विनंती आहे. अनुवादातील त्रुटींसाठी आपली क्षमा प्रार्थीतो. वाचकांना... ह्या पुस्तकातील मुद्रित पाठ्यसामग्री मूळत: 'दान' या गुजराती पुस्तकाचे मराठी अनुवाद आहे. जिथे जिथे 'चंदुभाऊ' ह्या नावाचा उल्लेख केला आहे, तिथे वाचकांनी स्वत:चे नाव समजून वाचन करावे. पुस्तकातील कोणतीही गोष्ट जर तुम्हाला समजली नाही, तर प्रत्यक्ष सत्संगात येऊन त्याचे समाधान मिळवावे अशी नम्र विनंती. दादाश्रींच्या श्री मुखातूत निघालेले काही गुजराती शब्द जसे च्या तसे 'इटालिक्स' मध्ये ठेवले आहेत. कारण त्या शब्दांसाठी मराठीमध्ये तसेच कोणतेही शब्द उपलब्ध नाहीत की ज्यामुळे त्याचा अर्थ पूर्णपणे समजता येईल. पण तरीही त्या शब्दाचे समानार्थी शब्द () कंसात लिहिलेले आहेत. Page #8 -------------------------------------------------------------------------- ________________ संपादकीय अनादि काळापासून प्रत्येक धर्मांचे मूळपुरुष, जसे की महावीर भगवान, राम भगवान इत्यादी जेव्हा विद्यमान असतात, तेव्हा ते लोकांना सर्व धर्मांच्या मतमतांतरातन बाहेर काढून आत्मधर्मामध्ये स्थिर करतात आणि मूळपुरुष जेव्हा नसतील तेव्हा जगातील लोक काळाच्या ओघात हळूहळू मतमतांतरात पडून धर्म-पंथ-संप्रदाय यामध्ये विभक्त होतात, परिणामी हळूहळू सुख शांति क्षीण होत जाते. धर्मात माझे-तुझे करुन भांडणे होतात. ती भांडणे मिटविण्यासाठी निष्पक्षपाती त्रिमंत्र आहे. या त्रिमंत्राचा मूळ अर्थ जर समजला तर त्याचा कोणत्याही व्यक्ति, संप्रदाय किंवा कोणत्याही पंथाशी काहीही संबंध नाही. आत्मज्ञानीपासून ते अंततः केवळज्ञानी आणि निर्वाणप्राप्तिने मोक्षगती प्राप्त करणाऱ्या उच्च जागृत आत्म्यांनाच नमस्कार निर्दिष्टत आहे. आणि त्यांना नमस्कार केल्याने संसारी विघ्ने दूर होतात, अडचणींमध्ये शांती राहते आणि मोक्षाच्या ध्येयाकडे लक्ष्य बांधले जाते. कृष्ण भगवंतांनी त्यांच्या संपूर्ण आयुष्यात कधीच म्हटले नाही की 'मी वैष्णव आहे,' 'माझा वैष्णव धर्म आहे.' भगवान महावीरांनी त्यांच्या आयुष्यात कधीच म्हटले नाही की 'मी जैन आहे,' 'माझा जैन धर्म आहे.' भगवान रामचंद्रांनी सुद्धा कधीही म्हटले नाही की 'माझा सनातन धर्म' आहे. सर्वांनी आत्म्याची ओळख करुन मोक्षाला जाण्याचीच गोष्ट केली आहे. जसे की भगवत गीतेमध्ये भगवान कृष्णांनी, आगमामध्ये तीर्थंकरांनी आणि योगवशिष्ठमध्ये वशिष्ठ मुनींनी रामास आत्म्याची ओळख करुन घेण्यास सांगितले आहे. जीव म्हणजे अज्ञान दशा. शिव म्हणजे कल्याण स्वरुप. आत्मज्ञान प्राप्तीनंतर त्याच जीवमघून शिवची प्राप्ती होते. शिव म्हणजे कोणत्या व्यक्तिची बाब नाही. जे कल्याणस्वरुप सिद्ध झाले त्यांचीच ही बाब आहे. आत्मज्ञानी परम पूज्यश्री दादा भगवानांनी निष्पक्षपाती त्रिमंत्र प्रदान Page #9 -------------------------------------------------------------------------- ________________ केला, तो सकाळ संध्याकाळ पाच-पाच वेळा उपयोगपूर्वक पठन करण्यास सांगितले आहे. त्यामुळे संसारिक कार्ये शांतिपूर्वक संपन्न होतात. आणि अगदी कठीण प्रसंगी जर एक-एक तास म्हटला तर सूळीचा घाव सुईने सरेल. निष्पक्षपाती त्रिमंत्राचा शब्दार्थ, भावार्थ आणि तो कसा हितकारी आहे, त्याचे संपूर्ण समाधान दादाश्रींनी प्रश्नोत्तरी रुपाने दिले आहे. हा सगळा मजकूर प्रस्तुत पुस्तकात संकलित केला आहे. या त्रिमंत्राच्या आराधनेमुळे सर्वांच्या जीवनातील विघ्ने दूर होतील आणि निष्पक्षपातीपणा निर्माण होईल. - डो. नीरूबहन अमीन Page #10 -------------------------------------------------------------------------- ________________ त्रिमंत्र त्रिमंत्राच्या समन्वयाचे रहस्य प्रश्नकर्ता : या त्रिमंत्रात तीन प्रकारचे मंत्र आहेत, एक जैनाचा मंत्र, एक वैष्णवांचा मंत्र, एक शैवाचा मंत्र, ह्यांच्या समन्वयाचे तात्पर्य काय? त्याचे रहस्य काय आहे ? दादाश्री : भगवंत निष्पक्ष असतात. भगवंताचा वैष्णव, शिव किंवा जैन यांच्याशी काहीही देणे-घेणे नाही. वीतरागांना पक्षपात नसतो. भेद करणारे 'हे तुमचे आणि हे आमचे' असा भेद करतात. 'आमचे' असे जे म्हणतो, ते दुसऱ्यांना 'तुमचे' असे म्हणतो. जेथे आमचे-तुमचे असते तेथे राग-द्वेषच असतो, तो वीतरागांचा मार्ग नाही. जेथे आमचा-तुमचा असा भेद असतो तो वीतरागांचा मार्ग नव्हे. वीतरागांचा मार्ग भेदभावरहित असतो, हे आपणास समजतय का? त्रिमंत्रापासून पूर्ण फळप्राप्ती प्रश्नकर्ता : हा त्रिमंत्र सर्वांसाठी आहे का? आणि तो जर सर्वांसाठी असेल तर तो कसा काय? दादाश्री : हा तर सर्वांसाठीच आहे. ज्यांना पापांचा क्षय करायचा असेल त्यांच्यासाठी हा चांगला आहे आणि ज्यांना पाप धुवायचे नसतील त्यांच्यासाठी नाही. प्रश्नकर्ता : या त्रिमंत्रामध्ये नवकार मंत्र, वासुदेव आणि शिव या तीन मंत्राना एकत्र करण्याचे काय प्रयोजन आहे ? Page #11 -------------------------------------------------------------------------- ________________ त्रिमंत्र दादाश्री : संपूर्ण फळ खाणे आणि फक्त फळाचा एक तुकडा खाणे यात काही फरक नाही ? हा जो त्रिमंत्र आहे तो पूर्ण फळस्वरुपच आहे, पूर्ण फळ ! मंत्र - जप, तरीसुद्धा सुखाचा अभाव... ऋषभदेव भगवंतांनी एकच गोष्ट सांगितली होती की, ही जी मंदिरे आहेत, वैष्णवपंथीयांचे विष्णुचे, शिवपंथीयांचे शिवाचे, जैनपंथीयांची जैनांचे अशी सर्व आपपली मंदिरे वाटून घ्या पण जे मंत्र आहेत त्यांना वाटून घेऊ नका. मंत्र वाटून घेतले तर त्यातील सत्व निघून जाईल, परंतु लोकांनी मंत्रही वाटून घेतले आणि एकादशीसुद्धा वाटून घेतली, 'ही शैवांची आणि ही वैष्णवांची. ' त्यामुळे एकदाशीचे महत्व नष्ट झाले आणि या मंत्राचे महात्म्यसुद्धा राहिले नाही. हे तीन मंत्र एकत्र न राहिल्यामुळे जैन सुद्धा सुखी होत नाहीत व दुसरे लोकसुद्धा सुखी होत नाहीत. म्हणून हा समन्वय भगवंतांनी सांगितल्यानुसार आहे. 2 ऋषभदेव भगवंत हे धर्माचे मुख मानले जातात. धर्माचे मुख म्हणजे साऱ्या जगास धर्माची प्राप्ति करवून देणारे ते स्वतः आहेत ! हा वेदांत मार्ग सुद्धा त्यांनीच स्थापित केला आहे आणि या जैनमार्गाची स्थापना सुद्धा त्यांच्या हातूनच झाली आहे. काही लोक ज्यास आदम म्हणतात ना, ते आदम म्हणजे हे आदिम तीर्थंकरच आहेत. आदिमच्या ऐवजी आदम म्हणतात ही लोकं. अर्थात् हा सगळा जो मार्ग आहे तो त्यांनीच सांगितलेला मार्ग आहे. सांसारीक अडचणींसाठी प्रश्नकर्ता : ऋषभदेव भगवंतांनी मंदिरे वाटून घेण्यास सांगितले, पण मंदिरातील सर्व देवता तर एकच आहेत ना ? दादाश्री : नाही, देवता सर्व खूप वेगवेगळ्या आहेत. सर्वांचे Page #12 -------------------------------------------------------------------------- ________________ त्रिमंत्र शासनदेव सुद्धा वेगवेगळे आहेत, ह्या संन्यस्त मंत्रांचे शासनदेव वेगळे असतात, सगळे देव निरनिराळेच असतात. प्रश्नकर्ता : पण तीन्ही मंत्र एकाच वेळेस बोलल्याने काय फायदा? दादाश्री : अडचणी तर दूर होतात ना. व्यवहारात अडचणी येत असतील तर त्या कमी होतात. पोलिसांशी थोडीशी ओळख असेल तर सुटका होते की नाही? प्रश्नकर्ता : हो, सुटका होते. दादाश्री : तर या त्रिमंत्रात जैनांचा, वैष्णवांचा आणि शैवांचा, या तीन्ही मंत्रांना एकत्र केले आहे. जर तुम्हाला देवतांची सहाय हवी असेल तर ते सर्वही मंत्र एका वेळेसच म्हणा. त्याचे शासनदेव असतात ते तुम्हाला सहाय करतील. या त्रिमंत्रामध्ये जैनांचा मंत्र आहे, तो जैनांच्या शासनदेवांना प्रसन्न करण्याचे साधन आहे. वैष्णवांचा मंत्र आहे तो त्यांच्या शासनदेवांना प्रसन्न करण्याचे साधन आहे आणि शिवाचा जो मंत्र आहे तो त्यांच्या शासनदेवांना प्रसन्न करण्याचे साधन आहे. म्हणजे प्रत्येक धर्माच्या पाठीमागे नेहमीच शासनाचे रक्षण करणारे देव असतात. हे मंत्र बोलल्याने ते देव खुश होतात, त्यामुळे आपल्या अडचणी दूर होतात. तुम्हाला संसारात अडचणी असतील ना, तर या तीन्ही मंत्रांना एकत्र बोलल्याने त्या अडचणी नरम होतात. तुमच्या सर्व कर्मांचा उदय आला असेल ना, तर त्या उदयांना नरम करण्याचा रस्ता आहे हा. अर्थात हळूहळू मार्गावर चढण्याचा रस्ता आहे हा. ज्या कर्माचा उदय सोळा आणे आहे, तो चार आणे होईल. म्हणून हे तीन मंत्र बोलल्याने येणाऱ्या सर्व अडचणी हलक्या होतील. त्यामुळे शांति होते बिचाऱ्याला. त्रिमंत्र निष्पक्षपाती बनवतात फार पूर्वीपासून हे तीन मंत्र आहेतच, परंतु या लोकांनी वादावादीत मंत्रसुद्धा वाटून घेतले की 'हा आमचा आणि तो तुमचा.' Page #13 -------------------------------------------------------------------------- ________________ त्रिमंत्र जैनांनी फक्त नवकार मंत्रच स्वीकारला आणि बाकीचे काढून टाकले. वैष्णवांनी नवकार मंत्र वगळला व स्वत:चा मंत्र तेवढा ठेवला. अर्थात् मंत्र सर्वांनीच वाटून घेतले आहे. अरे, या लोकांनी भेदाभेद करण्यात काहीच शिल्लक ठेवले नाही आणि म्हणून तर या हिंदूस्तानाची ही दशा झाली, या भेदाभेदीमुळे. पहा, या देशाची स्थिति छिन्न विछिन्न झाली आहे ना! आणि हे जे भेद केले आहेत, ते या अज्ञानी माणसांनी स्वत:चे मत योग्य आहे असे दाखविण्यासाठी केले आहेत. जेव्हा ज्ञानी असतात तेव्हा ते पुन्हा सर्व एकत्र करुन देतात, निष्पक्षपाती बनवतात. यासाठीच तर आम्ही तीन्ही मंत्र एकत्रच लिहीले आहेत. जर हे तीन मंत्र एकत्र म्हटले तर मनुष्याचे कल्यणाच होईल. पक्षपातामुळेच अकल्याण प्रश्नकर्ता : हे त्रिमंत्र कुठल्या परिस्थितित वाटले गेले असतील ? दादाश्री : आपला संप्रदाय चालविण्यासाठी. हे आमचे बरोबर आहे! आणि जो स्वतःला बरोबर समजतो तो दुसऱ्यास चुकीचा समजतो. ही गोष्ट भगवंतांना खरी वाटेल का ? भगवंतांसाठी तर दोन्ही समानच ना? अर्थात् त्यामुळे स्वत:चेही कल्याण झाले नाही आणि दुसऱ्यांचेही कल्याण झाले नाही, सर्वांचेच अकल्याण केले या लोकांनी. 4 तरीसुद्धा या संप्रदायांना तोडण्याची आवश्यकता नाही, संप्रदाय राहणे गरजेचे आहे, कारण पहीलीपासून ते मॅट्रिकपर्यंत भिन्न-भिन्न धर्म असणे गरजेचे आहे आणि त्यासाठी अलग अलग शिक्षक हवेत. पण याचा अर्थ असा नाही की दुसरीचा वर्ग चुकीचा आहे, असे होऊन नये. मेट्रीकला आल्यावर कोणी असे म्हणेल की दुसरीचा वर्ग चुकीचा आहे, तर ते किती गैरवाजवी ठरेल ! सर्व वर्ग खरे आहेत, परंतु सर्व समान नाहीत ! त्रिमंत्र, स्वतःसाठीच हितकर हे तर असे आहे की, एखादा मनुष्य म्हणेल की 'हे आमचे Page #14 -------------------------------------------------------------------------- ________________ त्रिमंत्र वैष्णव मत आहे' तर दुसरा म्हणेल की 'हे आमचे हे मत आहे.' अर्थात या मतवाल्यांनीच लोकांच्या मनात संभ्रम निर्माण केला आहे. तर हे त्रिमंत्र निष्पक्षपाती मंत्र आहेत. यात जैनांचा किंवा वैष्णवांचा, असे काही आहे का? नाही. हा भारतातील सर्व लोकांसाठी आहे. त्यामुळे या त्रिमंत्राच्या उच्चारणामुळे पुष्कळ फायदा होणार आहे, कारण त्यामध्ये उत्तम मनुष्यांना, उच्चतम कोटीच्या जीवांना नमस्कार करण्याची शिकवण दिली आहे. हे आपल्या लक्षात आले, की काय शिकवण दिली आहे ? प्रश्नकर्ता : नमस्कार करणे. दादाश्री : त्यांना नमस्कार केल्यामुळे आम्हाला फायदा होईल, फक्त नमस्कार म्हणण्याने फायदा होणार. तेव्हा तुम्हाला कळेल की 'हे तर माझ्या स्वत:च्याच हितासाठी आहे! जे आपल्या हितासाठी असेल, त्यास जैनांचा मंत्र असे कसे म्हणता येईल?! परंतु मतार्थ रोगी काय म्हणतात? 'हा आमचा नाही.' अरे, आमचा का नाही? भाषा आमची आहे, सर्वकाही आमचेच आहे ना?! आमचे नाही कसे? पण या सगळ्या असमंजस गोष्टी आहेत. ते तर जेव्हा त्याचा अर्थ समजावतो तेव्हा लक्षात येईल. हे आहेत त्रिमंत्र यासाठीच आम्ही हा मंत्र मोठ्याने बोलावून घेतो. नमो अरिहंताणं नमो सिद्धाणं नमो आयरियाणं नमो उव्वज्झायाणं नमो लोए सव्वसाहूणं एसो पंच नमुक्कारो, सव्व पावप्पणासणो Page #15 -------------------------------------------------------------------------- ________________ त्रिमंत्र मंगलाणं च सव्वेसिं, पढमं हवई मंगलम् ॥१॥ ॐ नमो भगवते वासुदेवाय ॥२॥ ॐ नमः शिवाय ॥३॥ जय सच्चिदानंद आता जर हा नवकार मंत्राचा अर्थ तुम्हाला समजावून सांगितला तर तुम्हीच म्हणाल की हा तर आमचा मंत्र आहे. जर त्याचा अर्थ तुम्हाला कळला तर तुम्ही त्यास सोडणारच नाही. हे तर तुम्ही असेच मानता की हा शिव मंत्र आहे किंवा हा वैष्णवांचा मंत्र आहे, पण त्याचा अर्थ समजण्याची गरज आहे. मी त्याचा अर्थ आपणास समजाऊन सांगेन, मग तुम्ही असे म्हणणारच नाही. नमो अरिहंताणं... प्रश्नकर्ता : 'नमो अरिहंताणं' म्हणजे काय? याचा अर्थ विस्तारपूर्वक सांगा. दादाश्री : 'नमो अरिहंताणं' अरि म्हणजे शत्रु आणि हंताणं म्हणजे ज्यांनी त्याचे हनन केले आहे, अशा अरिहंत भगवंतांना नमस्कार करीत आहे. ___ज्यांनी क्रोध-मान-माया-लोभ-राग-द्वेषरुपी सर्व शत्रुचा नाश केला आहे, त्यांना अरिहंत म्हणतात. शत्रुचा नाश केला तेव्हापासून पूर्णाहुति होईपर्यंत अरिहंत म्हटले जातात. ते पूर्णस्वरुप भगवंत आहेत ! ते अरिहंत भगवंत मग कोणत्याही धर्माचे असोत, हिंदु असो की जैन असो की कुठल्याही जातीचे असो, ते ह्या ब्रम्हांडात कोठेही असतील, त्यांना नमस्कार करीत आहे. प्रश्नकर्ता : अरिहंत देहधारी असतात का? दादाश्री : हो देहधारीच असतात. देहधारी नसतील तर त्यांना Page #16 -------------------------------------------------------------------------- ________________ त्रिमंत्र अरिहंत म्हणताच येणार नाही. अरिहंत देहधारी आणि नामधारी, नामासहित असतात. प्रश्नकर्ता : अरिहंत भगवंत हा शब्द प्रयोग चोवीस तीर्थकरांना संबोधून केला आहे का? दादाश्री : नाही, वर्तमान तीर्थंकरच अरिहंत भगवंत म्हटले जातात. महावीर भगवान तर मोक्षपदी विराजमान आहेत. तसे तर लोक म्हणतात की, 'आमचे चोवीस तीर्थंकर' (च अरिहंत आहेत) आणि एकीकडे वाचतात की 'नमो अरिहंताणं, नमो सिद्धाणं' मग मी त्यांना म्हणतो की, 'हे दोन आहेत?' तर ते म्हणतात की, 'हो, दोन आहेत' मग मी म्हणतो, 'अरिहंत दाखवा बघू.' तर ते म्हणतात की, 'हे चोवीस तीर्थंकरच अरिहंत आहेत.' अहो, पण ते तर सिद्ध झाले आहेत. ते आता सिद्धक्षेत्रात आहेत. आणि तुम्ही तर सिद्धास अरिहंत म्हणून ओळखता? अरिहंत कोणास म्हणतात हे लोक? प्रश्नकर्ता : ते सर्व चोवीस तीर्थंकर तर सिद्ध झाले आहेत. दादाश्री : मग तुम्ही या लोकांना असे म्हणत नाही की भाऊ, जे सिद्ध झाले आहेत त्यांना तुम्ही अरिहंत म्हणून का म्हणता? हे तर दुसऱ्या पदी सिद्धाणंमध्ये येतात. अरिहंताचे पद रिकामे राहिले, त्यामुळे ही उपाधी आहे ना! म्हणून आम्ही म्हणतो की, अरिहंतांना स्थापित करा, सीमंधर स्वामींना स्थापित करा, असे का म्हणतो ते आपल्याला समजले का? या चोवीस तीर्थंकरांना सिद्ध म्हणता येईल की अरिहंत? आता त्यांची दशा सिद्ध आहे की अरिहंत आहे? प्रश्नकर्ता : आता ते सिद्ध (गतीमध्ये) आहेत. दादाश्री : सिद्ध आहेत ना? तुमचा विश्वास आहे ना? शंभर टक्के आहे ना? प्रश्नकर्ता : हो. शंभर टक्के. Page #17 -------------------------------------------------------------------------- ________________ त्रिमंत्र दादाश्री : त्यासाठीच त्यांना सिद्धाणंमध्ये ठेवले आहे. सिद्धाणंमध्येच पोहोचले. त्यानंतर आता अरिहंताणंमध्ये कोण आहे? अरिहंत म्हणजे प्रत्यक्ष, हजर हवेत, परंतु आता मान्यता उलटी चालू आहे. चोवीस तीर्थंकरांना अरिहंत म्हटले जात आहे, परंतु जर विचार केला तर ते लोक सिद्ध झाले आहेत. त्यामुळे जेव्हा तुम्ही 'नमो सिद्धाणं' असे म्हणता तेव्हा त्यामध्ये ते लोक येऊनच जातात, तेव्हा अरिहंताचा रकाणा बाकी राहतो. म्हणून संपूर्ण नमस्कार मंत्र परिपूर्ण होत नाही. आणि अपूर्ण राहिल्यामुळे फळ प्राप्त होत नाही. म्हणजे सध्या वर्तमान तीर्थंकर असायला हवेत. अर्थात् वर्तमान तीर्थंकर सीमंधर स्वामींना अरिहंत मानले तरच नमस्कार मंत्र पूर्ण होईल. चोवीस तीर्थंकर तर सिद्ध झालेत, ते सर्व 'नमो सिद्धाणं'मध्ये येऊन जातात. जसे कोणी कलेक्टर असेल ते मग गव्हर्नर झाल्यावर आम्ही त्यांना असे म्हटले की, 'कलेक्टर साहेब इकडे या' तर किती वाईट दिसेल, नाही का? प्रश्नकर्ता : नक्कीच वाईट दिसेल. दादाश्री : त्याप्रमाणे सिद्धांना जर आपण अरिहंत मानले तर खूपच मोठे नुकसान होते. त्यांचे नुकसान होत नाही, कारण ते वीतराग आहेत; परंतु आपलेच नुकसान होते, जबरदस्त नुकसान होते. पोहोचते प्रत्यक्ष तीर्थंकरांनाच महावीर भगवान आदी सारे तीर्थंकर आपणांस मोक्ष प्राप्तीसाठी कामी येणार नाहीत, ते तर मोक्षाला गेले आणि आम्ही येथे 'नमो अरिहंताणं' म्हणतो ते त्यांचे संबोधन नाही. त्यांचा संबंध तर 'नमो सिद्धांणं'शी आहे. हे 'नमो अरिहंताणं' जे आपण बोलतो ते कोणास पोहोचते? इतर क्षेत्रात जिथे-जिथे अरिहंत आहेत तेथे त्यांना पोहोचते. महावीर भगवंताना पोहोचत नाही. पत्र नेहमी त्याच्या पत्यावरच पोहोचते. तर लोक काय समजतात की, हे 'नमो अरिहंताणं' बोलण्याने आम्ही महावीर भगवंतांना नमस्कार पोहचवतो. ते चोवीस तीर्थंकर तर मोक्षाला Page #18 -------------------------------------------------------------------------- ________________ त्रिमंत्र जाऊन बसले, ते तर 'नमो सिद्धाणं' झाले आहेत. त्यांना भूतकाळीतील तीर्थंकर म्हटले जाते. म्हणून आज त्यांना सिद्ध भगवंत म्हटले जाते आणि जे वर्तमान तीर्थंकर आहेत, त्यांना अरिहंत म्हटले जाते. बुद्धिने सुद्धा समजेल अशी ही गोष्टी प्रश्नकर्ता : आज गोष्ट समजली, अरिहंताणं बोलतो, पण अरिहंत तर हे सीमंधर स्वामीच आहेत, हे आता समजले. दादाश्री : पूर्ण भोपळा भाजीमध्ये गेला! दुधीची भाजी चिरली आणि आख्खा भोपळा त्यात गेला! असेच चालू राहते... मग काय करणार? एक वकिल म्हणून आपणास कसे वाटले? प्रश्नकर्ता : ही गोष्ट मला समजली, दादाजी. वकिल म्हणून तर ठीक आहे, परंतु मी जैन धर्माचा पक्का अनुयायी आहे, म्हणून मला ही गोष्ट बरोबर समजली, आपण जी गोष्ट सांगितली, त्यावर जर कोणी जैन असेल आणि तो जर बरोबर समजत असेल, तर त्याच्या लक्षात येईल की जे वर्तमानात विचरण करीत आहेत, त्यांनाच तीर्थंकर म्हणतात, म्हणून तर अरिहंताना सिद्धांच्या आधी स्थान दिले आहे. ते कोठेही असोत, तरी सुद्धा प्रत्यक्षच प्रश्नकर्ता : ते लोक असे मानत असतील ना की सीमंधर स्वामी परदेशात आहेत? दादाश्री : वर्तमान तीर्थंकर कोठे आहेत हे पहायचे नाही. मग ते परदेशात असतील किंवा कोठेही असतील. तसे पाहिले तर ते प्रथम बिहारमध्ये होते, त्याचा या चरोतरवाल्यांशी (गुजरात) काय संबंध? गाड्या नव्हत्या, काहीही नव्हते, तर मग काय संबंध असणार? परंतु नाही, येथे बसल्या-बसल्या त्यांचा नामजप करीत राहतात. फक्त कळले की तीर्थंकर आहेत. ते मग कितीही दूर असतील, परंतु कुठल्यातरी Page #19 -------------------------------------------------------------------------- ________________ त्रिमंत्र जागी वर्तमानात आहेत की नाही? तर म्हणे, 'हो आहेत.' तर ते वर्तमान तीर्थंकर म्हटले जातील. आम्ही जर अरिहंतांस पाहिले नसेल, भगवान महावीरांच्या काळात त्यांना पाहिले नसेल, भगवान महावीर तिकडे (बिहारमध्ये) असतील आणि आम्ही इकडे (गुजरातमध्ये) असू, पण तरी त्यांना अरिहंतच म्हटले जाईल. आम्ही पाहिले नाही तर त्यामुळे काही बिघडत नसते. अर्थात अरिहंतास अरिहंत असे मानले तर त्यामुळे पुष्कळ फळप्राप्ती होते, नाहीतर त्याची (सिद्धास अरिहंत म्हणणे) मेहनत वाया जाते. नवकार मंत्र फलदायी होत नाही, त्याचे हेच कारण आहे. तीर्थंकर कोणास म्हणतात? तीर्थंकर भगवंतांना केवळज्ञान असते, केवळज्ञान तर दुसऱ्यांसही होते, केवळियांनासुद्धा होते, परंतु तीर्थंकर होण्यासाठी तीर्थंकर (गोत्र) कर्माचा उदय व्हावा लागतो. जेथे त्यांची पावले पडतील ते तीर्थक्षेत्र होते. ज्या काळात तीर्थंकर भगवंत असतात ना, तेव्हा संपूर्ण जगात त्यांच्या सारखा पुण्यही कोणाचाच नसतो आणि त्यांच्या सारखे परमाणुही कोणाचे नसतात. त्यांच्या शरीराचे परमाणु, त्यांच्या वाणीचे परमाणु, अरे! स्यादवाद वाणी! ऐकल्याबरोबरच सर्वांची हृदये तृप्त होतात, असे ते तीर्थंकर महाराज! अरिहंत तर पुष्कळ मोठे रुप आहे, साऱ्या ब्रम्हांडात त्याकाळी असे परमाणु कोणाचेच नसतात, सर्व उच्चतम परमाणु फक्त त्यांच्याच शरीरात एकत्र आलेले असतात. तेव्हा त्यांचे शरीर कसे? त्यांची वाणी कशी? त्यांचे रुप कसे? त्या सगळ्या गोष्टींचे तर काय सांगावे! त्यांची तर गोष्टच निराळी ना! अर्थात् त्यांची तुलना करुच नका, त्यांच्या तुलनेत ठेउच नका कुणालाही! तीर्थंकरांची तुलना कोणाबरोबर करताच येणार नाही, अशी ही गजब मूर्ति आहे. चोवीस तीर्थंकर होऊन गेलेत, परंतु त्या सगळ्या गजब मूर्ति! Page #20 -------------------------------------------------------------------------- ________________ त्रिमंत्र का ? बंधन राहिले, अघाती कर्मांचे प्रश्नकर्ता : अरिहंत भगवंत, ही मोक्षाच्या आधीची स्थिती आहे 11 दादाश्री : हो, अरिहंत भगवंत ही मोक्षाच्या आधीची स्थिती. ज्ञानाच्या बाबतीत सिद्ध भगवंतांसारखीच स्थिती आहे, परंतु बंधनाच्या रुपात एवढेच शिल्लक राहिलेले असते, जसे दोन मनुष्यांना साठ वर्षांची शिक्षा सुनावली त्यावेळी एका मनुष्याला जानेवारीच्या पहिल्या तारखेस सुनावली आणि दुसऱ्या मनुष्यास जानेवारीच्या तिसऱ्या तारखेस सुनावली. पहिल्या मनुष्याची ६० वर्षे पूर्ण झाल्यावर तो मुक्त झाला आणि दुसरा मनुष्य दोन दिवसानंतर मुक्त होणार आहे, परंतु दुसरा मनुष्यसुद्धा मुक्तच म्हटला जाईल की नाही? अशी त्यांची स्थिती आहे. नमो सिद्धाणं... मग दुसरे कोण आहे ? प्रश्नकर्ता : 'नमो सिद्धाणं. ' दादाश्री : आता येथून जे सिद्ध झाले आहेत, ज्यांचा येथे (पृथ्वीतलावरचा) देहसुद्धा सुटला आहे आणि ज्यांना पुन्हा देह प्राप्त होणार नाही आणि सिद्धगतीमध्ये निरंतर भगवंताच्या स्थितीमध्ये आहेत, अशा सिद्ध भगवंतास मी नमस्कार करतो. आता येथून प्रभू श्री. रामचंद्रजी, ऋषभदेव भगवंत, महावीर भगवंत आदी सर्व जे षड्रिपुंना जिंकून सिद्धगतीला गेलेत, अर्थात तेथे निरंतर सिद्धदशेत राहणारे, त्यांना मी नमस्कार करतो. त्यात काय हरकत आहे, बोला ! त्यामध्ये काही हरकत घेण्यासारखे आहे ? आता ते पहिल्या स्थानावरील उच्च, की दुसरे जे आताच बोललो ( नमो सिद्धाणं) ते उच्च ? हे तर देह सोडून सिद्ध झाले आहेत, पूर्णपणे मुक्त झाले ! तर आता या दोघांमध्ये उच्च कोण आणि निम्न कोण ? Page #21 -------------------------------------------------------------------------- ________________ त्रिमंत्र आपल्याला काय वाटते? जास्त विचार करुन हे समजणार नाही, आपोआप सहजपणे बोला ना ! 12 प्रश्नकर्ता : सर्व एक समान. नमस्कार केला म्हणून सर्व एक समान. आता त्यांच्यात श्रेष्ठता किंवा कनिष्ठता हे आम्ही कशी ठरवू शकू ? दादाश्री : परंतु ह्या लोकांनी पहिला नंबर अरिहंताणंचा लिहिला आणि सिद्धाणंचा दुसरा नंबर लिहिला, याचे कारण आपल्या लक्षात आले का? ते काय म्हणतात की जे सिद्ध झाले ते संपूर्ण आहेत, ते तिथे सिद्धगतित विराजमान झालेत पण ते आमच्या कोणत्याच कामी येत नाहीत, आम्हाला तर 'हे' (अरिहंत) कामी येतात, त्यामुळे त्यांचा पहिला नंबर आणि सिद्ध भगवंतांचा दुसरा नंबर आहे. आणि जेथे सिद्ध भगवंत आहेत, तेथे आपणास जायचे आहे, म्हणून ते आपले लक्ष्य आहे, परंतु उपकारकर्ते कोण ? तर अरिहंत. त्यांनी स्वतः ‘सहा शत्रुंना जिंकले आहे आणि आपणांस जिकंण्याचा मार्ग दाखवितात, अशीर्वाद देतात. त्यासाठी त्यांना प्रथम स्थानावर ठेवले. त्यांना पुष्कळ उपकारी मानले. अर्थात आपले लोक जे प्रकट असतात त्यांना उपकारकर्ते मानतात. फरक, अरिहंत आणि सिद्धांमधील प्रश्नकर्ता : सिद्ध भगवंत कोणत्याही प्रकारे मानवजीवनाच्या कल्याणासाठी प्रवृत्त होतात का ? दादाश्री : नाही 'सिद्ध' हे तर आपले ध्येय आहे, तरीसुद्धा ते तुम्हाला काही मदत करणार नाहीत. ते तर इथे जेव्हा ज्ञानी असतील किंवा तीर्थंकर असतील तर ते तुम्हाला मदत करतील, हेल्प करतील, तुमची चूक दाखवतील, तुम्हाला मार्ग दाखवतील, तुम्हाला तुमच्या स्वरुपाची ओळख करुन देतील. Page #22 -------------------------------------------------------------------------- ________________ त्रिमंत्र प्रश्नकर्ता : तर हे 'सिद्ध' देहधारी नाहीत का? दादाश्री : सिद्ध भगवंत देहधारी नसतात, त्यांना तर परमात्माच म्हटले जाते आणि हे जे सिद्ध पुरुष आहेत ना, त्यांना तर मनुष्यच म्हटले जाते. त्यांना तुम्ही शिवी घालाल तर ते सिद्ध पुरुष तुमच्यावर चिडतील, नाहीतर तुम्हाला शाप तरी देतील. प्रश्नकर्ता : अरिहंत आणि सिद्धांमध्ये काय फरक? दादाश्री : सिद्ध भगवानांस शरीराचे ओझे उचलावे लागत नाही. अरिहंतांना शरीराचे ओझे उचलून चालावे लागते. त्यांना स्वत:च्या शरीराचे ओझे वाटते. जसे काही मोठा हांडा डोक्यावर घेऊन इकडे तिकडे फिरत आहेत. काही कर्म शिल्लक आहेत, त्यांची पूर्ती केल्याशिवाय ते सिद्धगतीला जाऊ शकत नाहीत. म्हणजे त्यांना तेवढे कर्म भोगण्याचे शिल्लक आहेत. __ नमो आयरियाणं... हे दोन झाले, आता? प्रश्नकर्ता : 'नमो आयरियाणं'... दादाश्री : अरिहंत भगवंतांनी सांगितलेल्या आचारांचे जे स्वतः पालन करतात, आणि त्या आचारांचे पालन करवून घेतात अशा आचार्य भगवंतांना मी नमस्कार करीत आहे. त्यांनी स्वतः आत्मप्राप्ती केली आहे, आत्मदशा प्रकट झाली आहे. संयमसहित आहेत. परंतु आजकाल येथे जे आचार्य आहेत ते (खरे खरे) आचार्य नाहीत. ते तर असे आहेत की त्यांचा जरासा अपमान झाला की तर लगेच फणा काढतात. अर्थात असे आचार्य असता कामा नयेत, अशांच्या दृष्टीत परिवर्तन झालेले नाही, दृष्टीत परिवर्तन झाल्यानंतर काम होईल. जे मिथ्या दृष्टीवाले आहेत, त्यांना आचार्य म्हणता येणार नाही. समकित (आत्मदृष्टी) प्राप्त झाल्यावर जे आचार्य होतात. त्यांना आचार्य म्हटले जाते. Page #23 -------------------------------------------------------------------------- ________________ 14 त्रिमंत्र आचार्य भगवंत कोण? हे जे दिसतात, लौकिक धर्माचे आचार्य, ते नाहीत. ज्यांना कुठल्याही प्रकारच्या (भौतिक) सुखांची इच्छा नाही आणि फक्त स्वतःच्या आत्मसुखासाठीच आचार पाळतात. आयरियाणं म्हणजेच ज्यांना आत्मा जाणल्यानंतर आचार्यपणा (अर्थात जे स्वतः आचारांचे पालन करतात व दुसऱ्यांकडून आचार पाळून घेतात,) आहे अशा आचार्य भगवंतांना मी नमस्कार करीत आहे. त्यात काही हरकत आहे का? तुम्हाला यात काही अडचण वाटते का? मग भले कोणीही असो, कोणत्याही जातीचा असो, परंतु ज्यांना आत्मज्ञान झाले आहे, अशा आचार्यांना मी नमस्कार करीत आहे. आताच्या काळात असे आचार्य या जगात सर्व ठिकाणी उपस्थित नाहीत, पण काही ठिकाणी आहेत, परंतु असे आचार्य या इथे नाहीत. आपल्या भूमिवर नाहीत पण दुसऱ्या भूमिवर आहेत, म्हणून हा नमस्कार ते (आचार्य) जेथे असतील तेथे पहोचतो आणि स्वत:ला त्याचे फळ लगेचच मिळते. प्रश्नकर्ता : ह्या आचार्यांमध्ये शक्ती नव्हती का? आचार्यपद केव्हा प्राप्त होते? दादाश्री : हे आचार्यपद जे आहे ते महावीर भगवानानंतर एक हजार वर्षांपर्यंत ठीक चालले, आणि त्यानंतरचे जे आचार्यपद आहे ते लौकिक आचार्यपद आहे, नंतर अलौकिक आचार्य झालेच नाहीत. प्रश्नकर्ता : मी अलौकिक आचार्यांची गोष्ट करीत आहे. दादाश्री : अलौकिक तर झालेच नाहीत, अलौकिक आचार्यांना तर भगवंत म्हणतात. प्रश्नकर्ता : तर कुंदकुंदाचार्य....? दादाश्री : कुंदकुंदाचार्य झाले परंतु ते महावीर भगवानांच्या नंतर सहाशे वर्षांनंतर झाले होते. कुंदकुंदाचार्य तर पूर्ण पुरुष होते. आणि हे तर मी सांगतो की, शेवटच्या पंधराशे वर्षांत आचार्य झालेच नाहीत. Page #24 -------------------------------------------------------------------------- ________________ त्रिमंत्र 15 प्रश्नकर्ता : परंतु या आचार्यांच्या ज्या काही कृती आहेत, त्या मागच्या महापुरुषांचे 'आगम' असतील किंवा वेदांताची सुत्रे असतील, त्याच्यावरतीच त्यांची मोहोर आहे. त्यांनाच आचार्य म्हटले आहे. दादाश्री : ते तर म्हणतील, परंतु खरे आचार्य तर आत्मज्ञान झाल्यानंतरच म्हटले जातात. आचार्य, प्रतापी सिंहा सारखे तीर्थंकर आमच्या कोणत्या कामास येतात ? दर्शनाच्या कामी येतात आणि ऐकण्याच्या कामी येतात ! ऐकणे केव्हा जेव्हा देशना देत असतात तेव्हा ऐकण्याच्या कामी येतात, नाहीतर दर्शनाच्या कामी येतात. ते सुद्धा, ज्यांना फक्त दर्शनाचीच त्रुटी राहिली आहे, ते त्यांचे दर्शन घेऊन मोक्षास जातात. त्यांच्या दर्शनानेच पूर्णाहुति प्राप्त होते, परंतु जो कोणी त्या स्टेजपर्यंत पोहोचला असेल त्याच्यासाठीच फक्त. ज्याने आचार्यांकडून सर्व आचार जाणून घेतलेत, म्हणजेच त्या स्टेजपर्यंत आला आहे ना, त्याचे तेथे तीर्थंकर भगवानांच्या दर्शनाने काम होते. अर्थात शेवटची परिपक्वता आचार्यांपाशीच होते, कारण आचार्य परिपक्व असतात. तीर्थंकर सुद्धा त्यांच्या म्हत्तेचा स्वीकार करतात. तीर्थंकर भगवानांना जर विचारले की ' या पाचमध्ये सर्वात मोठा कोण' ? तर तीर्थंकर भगवंत म्हणतील की, 'आचार्य भगवंत मोठे.' हे तर तीर्थंकर भगवंताकडून अभिप्राय मागितले तेव्हा अभिप्राय तर त्यांचाच म्हणावा लागेल ना ! प्रश्नकर्ता: परंतु असे का म्हणतील ? दादाश्री : कारण तीर्थंकर भगवंतांमध्ये एकशे आठ गुण असतात ! आणि आचार्य महाराजात एक हजार आठ गुण असतात. अर्थात ते तर गुणांचे धाम समजले जातात ! आणि ते सिंहासारखे असतात. त्यांच्या डरकाळीमुळे सर्वजण कापतात. जसे कोल्ह्याने मांस खाल्ले असेल, Page #25 -------------------------------------------------------------------------- ________________ 16 त्रिमंत्र परंतु त्याने जर सिंहास पाहिले तर पाहताचक्षणीच मासाची उलटी करुन टाकेल! असाच आचार्य महाराजांचा प्रताप असतो. हो, कुणी जास्त पाप केले असेल, तर तो त्यांच्यासमोर आपल्या पापांची उलटी करुन टाकतो. तीर्थंकर सुद्धा म्हणतात की, 'मी त्यांच्यामुळेच इथवर आलो आहे' म्हणून आचार्य भगवंत तर पुष्कळ मोठे गुणधाम समजले जातात ! हे पाच नवकार (नमस्कार) सर्वश्रेष्ठ पद आहे. त्यात पण आचार्य महाराजांची प्रशंसा तर तीर्थंकरांना सुद्धा करावी लागते. कारण ते तीर्थंकर कसे झाले? तर (त्यांच्यावेळी असणाऱ्या) आचार्य महाराजांच्या प्रतापामुळेच! गणधर पार करतील बुद्धीचे स्तर प्रश्नकर्ता : तर हे जे भगवंताचे गणधर असतात, ते सुद्धा आचार्यांच्या कक्षेत येतात? दादाश्री : हो. आचार्य पदामध्येच येतात, कारण भगवंतांच्या खालचे दुसरे काणतेच पद नाही. गणधर नाव का पडले? कारण त्यांनी बुद्धिचे पूर्ण भेदन केले आहे. आणि आचार्य महाराज तसे असतीलही किंवा नसतीलही. परंतु गणधरांनी तर बुद्धिचे सर्व स्तर पार केलेले असतात. तो स्तर आम्ही पार केला आहे. एक चंद्राचा स्तर म्हणजे मनाचा स्तर आणि दूसरा सूर्याचा स्तर म्हणजे बुद्धीचा स्तर, या सूर्य चंद्रांचे ज्याने भेदन केले आहे असे गणधर भगवंत, तरी सुद्धा ते तीर्थंकरांच्या आदेशात राहतात. आम्ही सुद्धा सूर्य-चंद्रांचे भेदन केले आहे. बर्फासारखा ताप आचार्यांचे संपूर्ण शास्त्र कंठस्थ असते आणि त्यांनी सर्वकाही धारण केलेले असते. जेव्हा की उपाध्याय स्वतः शिकतात आणि शिकवतात. आता ते अभ्यास करत असतात पण त्यांना आत्मप्राप्ती झालेली असते, म्हणजेच सम्यक्त्व प्राप्त केलेले असते. हे उपाध्याय थोडे जास्त शिकलेले Page #26 -------------------------------------------------------------------------- ________________ त्रिमंत्र असतात, परंतु ते आचार्य महाराजांसमोर 'बापजी, बापजी' असे करत राहतात. ज्यांच्या डरकाळीमुळे साधु व उपाध्याय मांजारासारखे होतात, ते आचार्य ! आणि साधुने जरी कितीही जोरात डरकाळी फोडली तरीसुद्धा आचार्य महाराज त्याची दखल सुद्धा घेत नाहीत. 17 आचार्य असे असतात की, शिष्याच्या हातून काही चूक झाली तर त्यांच्यासमोर (शिष्यास) उलटी होते, कारण तो आत सहन करु शकत नाही. आचार्यांचा इतका ताप असतो तरीसुद्धा ते कडक नसतात, ते क्रोध करत नाहीत. तरीपण त्यांचा कडकपणा जाणवतो, खूप ताप जाणवतो. जसा हा हिम (बर्फ) पडतो ना, त्या हिमाचा ताप किती अधिक असतो? असे हिमताप म्हटले जातात, पण तरी त्यांच्यात क्रोध नसतो. क्रोध- मान-माया-लोभ जर असतील तर त्यांना आचार्य म्हणता येणारच नाही ना ! नाहीतर आचार्य महाराज तर कसे असतात ? त्यांचे तर काय सांगावे! त्यांची वाणी ऐकून तेथून उठायचे मनच होत नाही! आचार्यांना तर भगवंतच म्हटले जाते ! ते कोणी असे तसे नाही म्हटले जात. दादा, खटपटी वीतराग आमचे हे आचार्यपद म्हटले जाते, परंतु संपूर्ण वीतरागपद म्हटले जात नाही. पण आम्हाला वीतराग म्हणायचे असेल तर खटपटी वीतराग (कल्याण हेतू खटपट करणारे) म्हणा. अशी खटपट की 'तुम्ही या, आपण सत्संग करु आणि आपणासाठी असे करीन, तसे करीन.' संपूर्ण वीतरागमध्ये असे नसते. ढवळाढवळ सुद्धा नाही आणि दखल सुद्धा नाही. आपले हित होत आहे किंवा अहित होत आहे, हे सगळे ते पाहत बसत नाहीत. ते स्वतःच हितकारी आहेत. त्यांची हवा हितकारी आहे, त्यांची वाणी हितकारी आहे, त्यांचे दर्शन हितकारी आहे, परंतु ते तुम्हाला असे म्हणणार नाही की 'तुम्ही असे करा' आणि मी तर तुम्हाला सांगतो की, 'तुमच्यासोबत मी सत्संग करीन आणि तुम्ही Page #27 -------------------------------------------------------------------------- ________________ त्रिमंत्र थोडेतरी मोक्षाकडे वाटचाल करा.' तीर्थंकर तर एकच स्पष्ट वाक्य बोलतात की 'चारी गती अत्यंत दुःखदायी आहेत. म्हणून हे माणसा, इथून मोक्षास जाण्याचे साधन प्राप्त होईल, असे तुम्हास मनुष्यपण प्राप्त झाले आहे, म्हणून मोक्षास जाण्याची कामना करा,' इतकेच बोलतात. तीर्थंकर आपल्या देशनेत बोलतात. 18 ह्या काळात येथे तीर्थंकर नाहीत आणि सिद्ध भगवंत तर आपल्या देशात (सिद्धक्षेत्रात) च राहतात. म्हणून सध्या तीर्थंकरांचे प्रतिनिधी म्हणून आम्ही आहोत, हो, ते नाहीत, म्हणून सर्व सत्ता आमच्या हातात आहे. कोणासही विचारल्याशिवाय आम्ही त्याचा उपयोग निवांतपणे करीत आहोत. पण आम्ही तीर्थंकरांना आमच्या माथी ठेवतो. त्यांना येथे बसवले आहेत ना ! उपाध्यायांमध्ये विचार आणि उच्चार असे दोनच असतात आणि आचार्यांमध्ये विचार, उच्चार आणि आचार असे तीन असतात. त्यांच्यात या तीघांची पूर्णाहुती झालेली असते, म्हणून ते आचार्य भगवंत ! म्हटले जातात. नमो उवज्झायाणं प्रश्नकर्ता : 'नमो उवज्झायाणं' सविस्तर समजावून सांगा. दादाश्री : उपाध्याय भगवंत! याचा अर्थ काय होतो ? ज्यांना आत्म्याची प्राप्ति झाली आहे आणि जे स्वतः आत्म्याला जाणल्यानंतर सर्व शास्त्रांचा अभ्यास करतात आणि दुसऱ्यांकडून अभ्यास करवून घेतात, अशा उपाध्याय भगवंतांना मी नमस्कार करतो. उपाध्याय म्हणजे स्वतः सर्व समजतात जरुर, तरी पण त्यांच्या आचरणात संपूर्णपणे आलेले नसते. ते मग वैष्णवांचे असतील, जैनांचे असतील किंवा कोणत्याही धर्माचे असतील पण त्यांनी आत्मा प्राप्त केलेला असतो. आजचे हे जे सर्व साधू आहेत ते सर्व यांच्या पंक्तीत बसत नाहीत, कारण त्यांनी आत्म्याची प्राप्ति केलेली नाही. आत्म्याच्या प्राप्तिनंतर क्रोध - मान-माया Page #28 -------------------------------------------------------------------------- ________________ त्रिमंत्र लोभ नष्ट होतात, त्यांचा कमकुवतपणा जातो. अपमान केल्यावर फणा काढत नाही. हे तर अपमान केल्यावर फणा काढतात ना? ते फणा काढणारे चालणार नाहीत तिथे. प्रश्नकर्ता : आपण असे म्हटले की, उपाध्याय जाणतात, पण ते काय जाणतात? दादाश्री : उपाध्याय म्हणजे जे आत्म्यास जाणतात, कर्तव्य जाणतात आणि आचार सुद्धा जाणतात. पण तरी त्यांच्यात काही आचार असतात आणि काही आचार यायचे बाकी असतात. संपूर्ण आचार प्राप्त न झाल्यामुळे ते उपाध्याय पदामध्ये आहेत, म्हणजे स्वतः काही शिकत असतात आणि दुसऱ्यांना पण शिकवतात. प्रश्नकर्ता : म्हणजेच, आचारांमध्ये पूर्णता आलेली नसते? दादाश्री : हो, उपाध्यायांमध्ये आचारांची पूर्णता नसते. आचार पूर्णतेनंतरच आचार्य म्हटले जातात. प्रश्नकर्ता : अर्थात उपाध्याय पण आत्मज्ञानी असावेत? दादाश्री : आत्मज्ञानी नाही, आत्मप्रतीतिवाले आणि प्रतीतिची डीग्री जरा उंच असते, प्रतीति! आणि पुढे ? ___ नमो लोए सव्वसाहूणं..... प्रश्नकर्ता : 'नमो लोए सव्वसाहूणं.' दादाश्री : 'लोए' म्हणजे लोक, तर या लोकात जेवढे साधु आहेत त्या सर्व साधुंना मी नमस्कार करतो. साधु कोणास म्हणतात? तर जे पांढरे शुभ्र कपडे घालतात, भगवे कपडे घालतात त्यांना साधू म्हणता येणार नाही. ज्यांनी आत्मदशा साधली (प्राप्त केली) ते साधू. अर्थात ज्यांना अजिबात देहाध्यास नाही, संसारदशा-भौतिकदशा नाही, परंतु आत्मदशा साधली अशा साधुंना मी नमस्कार करतो. आता असे Page #29 -------------------------------------------------------------------------- ________________ त्रिमंत्र साधु कोठे भेटतील? असे साधु असतात का आता? परंतु या ब्रम्हांडात जेथे जेथेही असे साधू आहेत, त्यांना मी नमस्कार करतो. संसारी अवस्थेपासून मुक्त होऊन आत्मदशा प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करतात, आत्मदशा साध्य करतात, अशा सर्वांना मी नमस्कार करतो. बाकी योग आदी जे सगळे काही करतात त्या साऱ्या संसारी दशा आहेत. आत्मदशा, हीच अस्सल वस्तू आहे. कोणकोणते योग संसार दशेत आहे? तर म्हणतात, एक आहे देहयोग, ज्यामध्ये आसने आदी करावी लागतात त्यास देहयोग म्हणतात. मग दुसरा मनोयोग, येथे चक्रांवर स्थिरता ठेवणे हा मनोयोग म्हटला जातो. आणि जपयोग करणे, तो वाणीचा योग म्हटला जातो. हे तीन्ही स्थूळ शब्द आहेत आणि त्याचे फळ, संसार फळच मिळते. म्हणजेच येथे बंगला मिळेल, गाड्या मिळतील. आणि आत्मयोग साधल्यावर मुक्ती मिळते, सर्व प्रकारचे सुख प्राप्त होतात. तोच अंतिम, मोठा योग म्हटला जातो. सव्वसाहूणं म्हणजे ज्यांनी आत्मयोग साधला आहे अशा सर्व साधूंना मी नमस्कार करतो. महणजे साधू कोण? तर ज्यांना आत्म्याची प्रतीति झाली आहे, त्यांची गणना आम्ही साधुंमध्ये केली. अर्थात या साहूणंना प्रथम प्रतीति आणि उपाध्यायांना प्रतीति, पण विशेष प्रतीति आणि आचार्यांना आत्मज्ञान झालेले असते. आणि अरिहंत भगवंत, ते पूर्ण भगवंत! अशा रीतीने नमस्कार केले आहेत. पाचही इंद्रिये ऐकतील तेव्हा प्रश्नकर्ता : भगवंतानी नवकाराच्या पाच पदांची रचना केली आहे, त्यामध्ये पहिले चार तर बरोबर आहेत; परंतु पाचव्यामध्ये नमो लोए सव्वसाहूणंच्या ऐवजी सव्वसाहूणं का नाही ठेवले? दादाश्री : तर पत्र लिहा ना आपण! त्याचे असे आहे, त्यांनी जसे म्हटले आहे तसेच, काना मात्रासहित बोलण्यास सांगितले आहे, कारण ती त्यांच्या श्रीमुखातून निघालेली वाणी आहे, त्याचा गुजराती अनुवाद Page #30 -------------------------------------------------------------------------- ________________ त्रिमंत्र करण्यास मनाई केली आहे, भाषा परिवर्तन करु नका, अर्थात त्यांच्या श्रीमुखातून निघालेली वाणी आहे, महावीर भगवंतांच्या मुखातून आणि जेव्हा ती वाणी बोलाल ना, तर ते परमाणुच असे संयोजित होतात की लोकांना आश्चर्य वाटते. परंतु हे तर असे बोलतात की स्वतःला सुद्धा ऐकु येत नाही, तेव्हा फळ सुद्धा तसेच मिळेल ना ! स्वतःला फळाची माहिती पडत नाही. तेव्हा पाचही इंद्रिये ऐकतील असे बोलण्यामुळे खरे फळ प्राप्त होते. हो, डोळे सुद्धा पाहत राहतात, कान सुद्धा ऐकत राहतात, नाक सुंघत राहतो... प्रश्नकर्ता : आपण तर रहस्यमय वाणी बोललात ! 21 दादाश्री : हो, नवकार जर असेच बोलत राहिले तर कान ऐकू शकत नाही, कान भुकेलेच राहतात, डोळे भुकेलेच राहतात, फक्त एक जीभच तोंडात फिरत राहते, तेव्हा मग फळ कसे मिळेल ? म्हणजे पाचही इंद्रिये जेव्हा प्रसन्न होतील, तेव्हाच नवकार मंत्र फलित झाला असे म्हणता येईल. मंत्र म्हणतात खरे, परंतु कान ऐकतील, डोळे पाहतील, नाक सुगंध अनुभवेल, त्या वेळी त्वचेस त्याचा स्पर्श व्हावा, असे सगळे झाले पाहिजे! त्यासाठीच आम्ही हा त्रिमंत्र मोठ्याने बोलवतो ना. केवळ साधक, नाही बाधक जे आत्मदशा साधण्यासाठी साधना करतात, ते साधू, परंतु संसाराच्या आवडीसाठी जे साधना करतात, ते साधू नाहीत. आवडीसाठी, मानासाठी, किर्ती मिळविण्यासाठी केल्या जाणाऱ्या साधना वेगळ्या आहेत. आत्म्यासाठी केलेल्या साधनेत हे सगळे नसते. अशा सर्व साधुंना मी नमस्कार करतो. बाकीच्या सर्वांना साधू म्हणता येणार नाही... जो आत्मदशा साधतो, त्याला साधू म्हटले जाते, त्या सगळ्यांना मी नमस्कार करतो. बाकी सगळ्यांना साधू म्हटले जात नाही. देहावस्था, देहाच्या रुबाबासाठी, देहाच्या सुखाची इच्छा ठेवतात, परंतु हे सर्व चालत नाही ना. हिन्दुस्तानात क्वचित एखादा असा संत असेल. Page #31 -------------------------------------------------------------------------- ________________ त्रिमंत्र (किंवा) एक सुद्धा नसेल. असे साधू दुसऱ्या क्षेत्रात आहेत. ते दुसऱ्या जागी आहेत, म्हणजे आपला नमस्कार तेथे पोहोचतो आणि तेव्हाच आपणास फळ मिळते. लोकांनी जेवढे ठरविले आहे तेवढेच ब्रम्हांड नाही, ब्रम्हांड फार मोठे आहे, विशाल आहे, त्या सर्व साधूंना मी नमस्कार करतो. __ प्रश्नकर्ता : लोए म्हणजे काय? दादाश्री : नमो लोए सव्वसाहूणं. लोए म्हणजे लोक, या लोकाशिवाय दुसरा अलोक आहे; तेथे काहीच नाही. अर्थात लोकात जे सर्व साधु आहेत त्यांना मी नमस्कार करतो. प्रश्नकर्ता : म्हणजे आत्मदशा साधल्यावर आत्मज्ञान होते का? दादाश्री : हो. प्रश्नकर्ता : आणि आत्मदशा साधल्यावर आत्म्याचा अनुभव येतो का? दादाश्री : तो आत्मदशा साधतो म्हणजे अनुभवच्या दिशेत वेगाने धावतो. साधना करतो. साधनेचा अर्थ काय? 'आत्मभावना करत जीव लहे केवळज्ञान रे!' परंतु आत्मभावना त्याला प्राप्त झाली पाहिजे ना? आम्ही येथे जे ज्ञान देतो, त्याने आत्मदशेचीच प्राप्ति करवितो आणि ती प्राप्त केल्यानंतर मग त्याला पुढील दशा प्राप्त होते आणि त्यामध्ये कोणी जस-जसा पुढे जातो त्याला उपाध्याय दशा प्राप्त होते. येथे या काळात शेवटी कोणत्या पदापर्यंत पोहचू शकतो? तर आचार्यपदापर्यंत जाऊ शकतो. त्यापुढे जाता येत नाही. प्रश्नकर्ता : आम्ही कसे ठरवू शकतो की हा आत्मदशा साधतो आहे की नाही? दादाश्री : हो, आम्ही त्याचे बाधक गुण बघितले तर कळू Page #32 -------------------------------------------------------------------------- ________________ त्रिमंत्र शकते. आत्मदशा साधणारा मनुष्य फक्त साधकच असतो, बाधक नसतो. साधू नेहमी साधक असतात आणि सध्याच्या काळातील जे साधू आहेत ते दुषमकाळाच्या प्रभावामुळे साधक नाहीत, ते साधक-बाधक आहेत. साधक-बाधक म्हणजे बायको मुलांना सोडून, तप-त्याग वगैरे करतात. आज सामायिक प्रतिक्रमण करुन शंभर रुपये मिळवतात परंतु शिष्यासोबत बेबनाव झाल्यावर त्याच्यावर उग्र होतात, त्यामुळे मग दिडशे रुपये गमाऊन बसतात. म्हणून ते बाधक आहे. आणि खरा साधू कधीच बाधक होत नाही, साधकच असतो. जितके साधक असतात ना, तेच सिद्ध दशा प्राप्त करु शकतात! आणि हे तर बाधक आहे, त्यांना छेडल्याबरोबरच चिडून जाण्यास वेळ लागत नाही ना, अर्थात् ते साधू नाही, पण त्यागी म्हटले जातात. आजच्या काळानुसार त्यांना साधू म्हणता येईल. बाकी आता तर साधूत्यागींचा क्रोध उघडपणे दिसून येतो ना! अरे! ऐकू सुद्धा येतो, जो क्रोध ऐकू येत असेल तो क्रोध मग कसा असेल? प्रश्नकर्ता : अनंतानुबंधी? दादाश्री : हो. जो क्रोध दुसऱ्यास भयभीत करेल, आम्हांस ऐकू (पाहू) येईल, तो अनंतानुबंधी म्हटला जातो. ॐ चे स्वरुप प्रश्नकर्ता : ॐ, हा नवकार मंत्राचे छोटे रुप आहे? दादाश्री : हो, समजून ॐ बोलण्याने धर्मध्यान होते. प्रश्नकर्ता : नवकार मंत्राच्या एवजी ॐ, एवढेच म्हटले तर चालेल का? दादाश्री : हो, परंतु ते समजून बोलतात तर! हे लोक बोलतात ते अर्थहीन असते, खरा नवकार मंत्र म्हटल्यावर घरातील क्लेश होणे थांबते, आता घरोघरी क्लेश होणे बंद झाले आहेत ना! Page #33 -------------------------------------------------------------------------- ________________ त्रिमंत्र प्रश्नकर्ता : क्लेश नाही थांबले. दादाश्री : क्लेश चालूच आहेत? क्लेश बंद झाले नसतील तर समजावे की आतापर्यंत हा नवकार मंत्र चांगल्या त-हेने समजून बोलत नाहीत. हा जो नवकार मंत्र आहे, तो बोलल्याने ॐ (पंच परमेष्टि) खुश होतात, भगवंत खुश होतात. फक्त ॐ बोलण्याने कधी ॐ खुश होत नाहीत. अतः हा नवकार मंत्र सुद्धा म्हणा! हा नवकार मंत्र तेच ॐ आहे! या सर्वांच्या संक्षिप्तरुपात हा ॐ शब्द ठेवला आहे. करणाऱ्यांनी लोकांच्या हितासाठीच असे केले आहे, परंतु लोकांना हे समजत नसल्यामुळे सगळे उलटेच झाले. ते पोहोचते अक्रमच्या महात्म्यांना भगवंतांनी ॐ स्वरुप कोणाला म्हटले आहे ? ज्याला मी येथे ज्ञान देतो ना, तो त्या दिवसापासूनच 'मी शुद्धात्मा आहे' बोलायला लागतो, तेव्हापासून तो साधू झाला, शुद्धात्म दशा साधतो तो साधू. म्हणून आपले हे महात्मा, जेवढ्यांना मी हे ज्ञान दिले आहे, त्यांना हा नवकार पोहोचतो. हो, लोक नवकार मंत्र म्हणतात ना, त्याची जबाबदारी तुमच्या (ज्ञान प्राप्त महात्म्यांच्या) डोक्यावर येते, कारण तुम्ही सुद्धा नवकारात आलात. आत्मदशा साधेल तो साधू. त्यानंतर हळूहळू थोडे-थोडे तुम्ही स्वतः समजत गेले आणि थोडे-थोडे दुसऱ्यांना समजावू शकाल, असे झाले अर्थात तुम्ही तर साधुच्याही पुढे गेलात. तेव्हापासून उपाध्याय व्हायला लागले. आणि आर्चापद तर या काळात लवकर मिळेल असे नाही! आम्ही गेल्यानंतर निघेल ती गोष्ट वेगळी आहे. - नवकाराचे महात्म्य 'एसो पंच नमुक्कारो' अर्थात् हे जे वरती सांगितले, त्या पाचांना नमस्कार करतो. Page #34 -------------------------------------------------------------------------- ________________ त्रिमंत्र 'सव्व पावप्पपणासणो' अर्थात् हे सर्व पापांचा नाश करणारे आहे. ते म्हटल्यामुळे सर्व पाप भस्मीभूत होतात. 'मंगलाणं च सव्वेसिं' अर्थात् सर्व मंगलांमध्ये... 'पढमं हवई मंगलम्' म्हणजे हे प्रथम मंगल आहे. ह्या दुनियेत जे सर्व मंगल आहेत, त्या सर्वात सर्व प्रथम मंगल हे आहे, सर्वात मोठे मंगल हे आहे, असे सांगू इच्छितात. बोला आता, हे आपण सोडायला पाहिजे का? पक्षपातासाठी सोडून द्यायला पाहिजे? भगवंत निष्पक्षपाती असतील की पक्षपाती असतील? प्रश्नकर्ता : निष्पक्षपाती. दादाश्री : तेव्हा मग जसे भगवंतांनी सांगितले, तसेच त्यांच्या निष्पक्षपाती मंत्राना भजा. त्रिमंत्रानी हलके होते भोगणे प्रश्नकर्ता : त्रिमंत्रात सव्व पावप्पणासणो येते, ते साऱ्या पापांचा नाश करणारे आहे, तर ते भोगल्याशिवायच नष्ट होतात का? दादाश्री : भोग तर येणारच. असे आहे ना, तुम्ही येथे माझ्याजवळ चार दिवस राहिले असाल तर तुम्हाला कर्म तर भोगावेच लागणार परंतु ते भोग माझ्या हजेरीत हलके होऊन जातील. तसेच त्रिमंत्राच्या हजेरीमुळे भोगण्यात बराच फरक पडतो. मग तुमच्यावर त्याचा जास्त परिणाम होणार नाही. आता एका माणसास ज्याला ज्ञान नाही, त्याला चार दिवसासाठी तुरुंगात टाकले तर त्याला किती घुसमट होईल? आणि ज्ञान असलेल्याला तुरुंगात टाकले, तर? त्याचे कारण हेच की भोग तर तेच आहे पण त्या भोगाचा आत परिणाम होत नाही. Page #35 -------------------------------------------------------------------------- ________________ त्रिमंत्र व्यवस्थितमध्ये असेल तरच जपले जाईल प्रश्नकर्ता : आपण म्हणता की त्रिमंत्र आमच्या साऱ्या अडचणी दर करतो, आपण हेही म्हणता की सर्व 'व्यवस्थित'च आहे, तर मग त्रिमंत्रामध्ये शक्ती कोठून आली? दादाश्री : व्यवस्थित म्हणजे काय की जर अडचण दूर होणार नसेल तर तोपर्यंत आमच्याकडून त्रिमंत्र बोलले जात नाहीत, अशा प्रकारे 'व्यवस्थित शक्ती' आहे, असे समजावे? प्रश्नकर्ता : परंतु त्रिमंत्र म्हटल्यावर सुद्धा अडचण दूर झाली नाही, तर काय समजावे? दादाश्री : ती अडचण किती मोठी होती आणि किती कमी झाली, ते तुम्हाला कळत नाही परंतु आम्हाला ते कळते. नवकार म्हणजे नमस्कार प्रश्नकर्ता : काही लोक 'नमो लोए सव्वसाहूणं' पर्यंतच म्हणतात आणि काही लोक 'एसो पंच नमुक्कारो' आणि शेवटपर्यंत म्हणतात. दोन्ही पैकी खरे कोणते? दादाश्री : 'एसो पंच नमुक्कारो'च्या मागची चार वाक्ये नाही म्हटली तरी चालेल. मंत्र तर पाचच आहेत आणि पाठीमागची चार वाक्ये तर त्याचे महात्म्य समजावण्यासाठी लिहीली गेली आहेत. प्रश्नकर्ता : नव(नऊ) पदांच्या हिशोबाने हा नवकार मंत्र म्हटला जातो ना? दादाश्री : नाही, नाही, असे नाही. ही नऊ पदे नाहीत. हा नमस्कार मंत्र आहे, त्याच्या ऐवजी नवकार झाला. हा मूळ शब्द 'नमस्कार मंत्र आहे, त्याच्या ऐवजी मागधि भाषेत नवकार' म्हणतात. म्हणून नमस्कारलाच नवकार बोलतात. अर्थात नऊ पदांशी त्याचे देणेघेणे नाही. हे पाचच नमस्कार आहेत. Page #36 -------------------------------------------------------------------------- ________________ त्रिमंत्र ॐ नमो भगवते वासुदेवाय.... प्रश्नकर्ता : मग 'ॐ नमो भगवते वासुदेवाय' समजावून सांगा. दादाश्री : वासुदेव भगवंत! म्हणजे जे वासुदेव भगवंत नरमधून नारायण झाले, त्यांना मी नमस्कार करीत आहे. जेव्हा ते नारायण होतात, तेव्हा त्यांना वासुदेव म्हणतात. प्रश्नकर्ता : श्रीकृष्ण, महावीर स्वामी हे सगळे कोण आहेत? दादाश्री : ते सगळे तर भगवंत आहेत, ते देहधारी रुपात भगवंत म्हटले जातात, त्यांना भगवंत का म्हटले जाते की त्यांच्या आत संपूर्ण भगवंत प्रकट झाले आहेत. म्हणून आम्ही त्यांना देहासहित भगवंत म्हणतो. __ आणि जे महावीर भगवंत झाले, ऋषभदेव भगवंत झाले ते पूर्ण भगवंत म्हटले जातात. कृष्ण भगवंतांना तर वासुदेव भगवंत म्हटले जाते, त्यात काही शंका नाही ना? वासुदेव म्हणजे नारायण, नराचे जे नारायण झाले, असे भगवंत प्रकट झाले. त्यांना आम्ही भगवंत म्हणतो. ___वासुदेवांची गणना भगवंतांमध्ये होते. शिवांची गणना भगवंतांमध्ये होते आणि सच्चिदानंद, ते सुद्धा भगवंतांमध्येच धरले जातात आणि हे पाच परमेष्टिसुद्धा भगवंतांमध्येच धरले जातात, कारण ते खरेखुरे साधक असतात, ते सर्व भगवंतांमध्येच धरले जातात, परंतु पंच परमेष्टी हे कार्यभगवंत म्हटले जातात, जेव्हा की वासुदेव आणि शिव हे कारण-भगवंत म्हटले जातात. ते कार्य-भगवंत होण्याच्या कारणांचे सेवन करीत आहेत. नराचा नारायण! प्रश्नकर्ता : 'ॐ नमो भगवते वासुदेवाय' याचे विशेष स्पष्टीकरण करा. दादाश्री : हे श्रीकृष्ण भगवंत वासुदेव आहेत, ऋषभदेव भगवंतांच्या काळापासून आजपर्यंत असे नऊ वासुदेव झाले आहेत. वासुदेव म्हणजे Page #37 -------------------------------------------------------------------------- ________________ त्रिमंत्र जे नराचे नारायण झाले, त्या पदाला वासुदेव म्हणतात. तप-त्याग काहीच नाही. त्यांचे तर मारझोड-भांडणतंटे सगळे काही त्यांच्या प्रतिपक्षीशी होतात. म्हणून तर त्यांच्या प्रतिपक्षाच्या रुपात प्रतिवासुदेव जन्म घेतात, ते प्रतिनारायण म्हटले जातात. त्या दोघांची भांडणे होत राहतात. आणि त्यावेळी नऊ बलदेव सुद्धा असतात. कृष्ण वासुदेव म्हटले जातात आणि बलराम (श्रीकृष्णाचे वडीलबंधू) यांना बलदेव म्हटले जाते. भगवान रामचंद्रांना वासुदेव म्हटले जात नाही, रामचंद्राना बलराम म्हटले जाते. लक्ष्मण वासुदेव म्हटले जातात आणि रावण प्रतिवासुदेव म्हटले जातात. रावण पूज्य आहेत. रावण खास पूजा करण्याच्या योग्य आहेत. लोक त्यांचे पुतळे जाळतात. भयंकर रीतीने जाळतात ना! पहा ना! असे उलटे ज्ञान जेथे पसरले आहे, त्या देशाचे कसे भले होईल? रावणाचे पुतळे जाळू नये. या काळाचे वासुदेव कोण? तर कृष्ण भगवंत, त्यामुळे हे नमस्कार कृष्ण भगवंतांना पोहोचतात. त्यांचे जे शासनदेव असतील, त्यांना पोहोचतात! वासुदेव पद, अलौकिक वासुदेव तर कसे असतात? त्यांच्या एका डोळ्यानेच लाखो लोक घाबरतील असे तर वासुदेवांचे डोळे असतात. त्यांचे डोळे पाहूनच घाबरतात. वासुदेव पदाचे बीज कधी पडेल? वासुदेव होणार असतील तर कितीतरी जन्माआधी त्यांचा प्रभाव असतो. वासुदेव जेव्हा चालतात तेव्हा धरणीमाता कापते ! हो, धरणीखालून आवाज येतो. अर्थात् ते बीजच निराळ्या त-हेचे असते. त्यांच्या उपस्थितीनेच लोक इकडे-तिकडे होऊन जातात. त्यांची गोष्टच निराळी आहे. वासुदेव तर मुळात जन्मापासून ओळखले जातात की ते वासुदेव होणार आहेत. कित्येक अवतारानंतर वासुदेव अवतरणार असतील, त्यांचे संकेत आजपासूनच मिळण्यास सुरुवात होते. तीर्थंकर ओळखू येत नाहीत, परंतु वासुदेव ओळखता येतात, कारण त्यांची लक्षणेच निराळ्या त-हेची असतात. प्रतिवासुदेव सुद्धा असेच असतात. Page #38 -------------------------------------------------------------------------- ________________ त्रिमंत्र 29 प्रश्नकर्ता : तर मग तीर्थंकरांना मागच्या अवतारात कसे ओळखता येते? दादाश्री : तीर्थंकर तर सरळसोट असतात. त्यांची लाइनच सरळ असते. त्यांचे दोष होतच नाहीत. त्यांच्या लाइनीत दोष येतच नाहीत आणि दोष आलेच तर कोणत्याही तहेने (ज्ञानाने) पुन्हा मूळ स्थितीस येतात. ती लाइनच वेगळी आहे, परंतु वासुदेव किंवा प्रतिवासुदेव यांच्याबाबतीत तर कित्येक अवतारांच्या आधीपासूनच असे गुण असतात. वासुदेव होणे म्हणजे नराचा नारायण होणे, असे म्हटले जाते. नराचा नारायण म्हणजे कोणत्या फेजमुळे, जसे पाडवा होतो तेव्हापासूनच कळत नाही का, की आता पौर्णिमा होणार आहे. त्याचप्रमाणे कित्येक जन्माआधीच समजून येते की हे वासुदेव होणार आहेत. कृष्ण किंवा रावण यांच्या विरुद्ध बोलू नये हे जे त्रेसष्ठ शलाका पुरुष म्हणतात ना, त्यांच्यावर भगवंतांनी मोहोर लावली की हे सगळे भगवंत होण्याच्या योग्यतेचे आहेत. म्हणून आम्ही फक्त अरिहंतांना भजले आणि या वासुदेवांना भजले नाही, तर वासुदेव भविष्यात अरिहंत होणारच आहेत. जर वासुदेवांच्या विरुद्ध बोलले तर आपले काय होणार? लोक म्हणातत ना, 'कृष्णास असे झाले आहे, तसे झाले आहे..' अरे, असे बोलू नये. त्यांच्या बाबतीत काहीही बोलू नका. त्यांची गोष्टच निराळी आहे आणि तू जे ऐकून आला आहेस ती गोष्ट निराळी आहे. जोखीमदारी का अंगावर घ्यावी? जे कृष्ण भगवंत येत्या चोवीसीत तीर्थंकर होणार आहेत, जे रावण येत्या चोवीसीत तीर्थंकर होणार आहेत, त्यांच्या विषयी बोलून का जोखीमदारी ओढवून घ्यावी? त्रेसष्ठ शलाका पुरुष शलाका पुरुष म्हणजे मोक्षास जाण्यास योग्य श्रेष्ठ पुरुष. मोक्षास तर दुसरे लोक सुद्धा जातील परंतु हे श्रेष्ठ पुरुष म्हटले जातात. म्हणून Page #39 -------------------------------------------------------------------------- ________________ त्रिमंत्र ते ख्यातिसहीत आहेत. संपूर्ण ख्यातनाम होऊन मोक्षास जातात. हो, त्यामध्ये चोवीस तीर्थंकर असतात, बारा चक्रवर्ती असतात, नऊ वासुदेव असतात, नऊ प्रति-वासुदेव असतात आणि नऊ बलदेव असतात. बलदेव वासुदेवांचे मोठे भाऊ! ते नेहमी सोबतच असतात. ही नॅचरल अॅडजेस्टमेन्ट आहे. त्यात फरक होत नाही. नॅचरलमध्ये कधीच फेरफार होत नाही. जसे की पाण्यासाठी 2H आणि O च पाहिजे, त्यासारखीच गोष्ट आहे ही! ही सायन्टिफिक वस्तू आहे. नाहीतर त्रेसष्ठ हा माझा शब्द नाही, त्रेसष्ठच्या ऐवजी चोसष्ठ सुद्धा ठेवला असता; परंतु ही निसर्गाची रचना किती सुंदर व व्यवस्थित आहे. बोलतेवेळी उपयोग... आम्ही ॐ नमो भगवते वासुदेवाय बोलू, तेव्हा कृष्ण भगवंत सुद्धा दिसतील आणि शब्द बोलू आम्ही. आता कृष्ण भगवंत, जे भलेही आपल्या दर्शनात आलेले असतील, त्यांचे कोणतेही चित्र डोळ्यांसमोर उमटले असेल, मग ते मुरलीवाले असोत किंवा दुसऱ्या कुठल्या रुपात असोत पण या उच्चाराबरोबर लगेच ते दिसले पाहिजेत, बोलताक्षणीच दिसले पाहिजेत. बोलते वेळी दिसले नाही, तर त्याचा अर्थच काय? फक्त नाव घेतले तर फक्त नाव घेण्याचे फळ मिळेल, परंतु त्याबरोबर त्यांची मूर्ती दिसली, तर दोघांचेही फळ मिळेल. नाव आणि स्थापना असे दुहेरी फळ मिळाले तर फार झाले. प्रश्नकर्ता : 'नमो अरिहंताणं'चा जप करतेवेळी मनात कोणत्या रंगाचे चिंतन केले पाहिजे? दादाश्री : 'नमो अरिहंताणं'चा जप करताना कोणत्याही रंगाचे चिंतन करण्याची काहीच आवश्यकता नाही. आणि जर चिंतन करायचे असेल तर डोळे मिळून न..मो..अ..रि..हं..ता..णं असे एक एक शब्द नजरेसमोर यायला हवेत. त्यामुळे पुष्कळ चांगले फळ प्राप्त होते, तुम्ही Page #40 -------------------------------------------------------------------------- ________________ त्रिमंत्र डोळे बंद करुन म्हणा बघू, न..मो..अ..री.. हं..ता.. णं, ही अक्षरे म्हणत असताना मनात वाचू शकत नाही का ? अभ्यास करा, तर मग तुम्ही वाचू शकाल. 31 मग ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय' यास पण तुम्ही डोळे मिटून म्हणाल तर प्रत्येक अक्षर तुम्हाला दिसेल. अक्षरांसोबत म्हणू शकाल. तुम्ही दोन दिवस अभ्यास करा, तीसऱ्या दिवशी तुम्हांस खूपच सुंदर दिसेल. मंत्राचे अशा तऱ्हेने चिंतन करायचे असते. त्यालाच ध्यान म्हणतात. जर या त्रिमंत्राचे असे ध्यान केले ना, तर फारच उत्तम ध्यान होईल. ॐ नमः शिवाय.... प्रश्नकर्ता : 'ॐ नमः शिवाय'चा अर्थ विस्ताराने सांगा. दादाश्री : ह्या जगात जे कल्याण स्वरुप झालेले आहेत आणि जे जिवंत आहेत, ज्यांचा अहंकार लोप पावला आहे, त्या सगळ्यांना शिव म्हणतात. शिव नावाचा कोणी मनुष्य नाही. शिव तर स्वतः कल्याण स्वरुपच आहेत. म्हणून जे स्वतः कल्याणस्वरुप झालेले आहेत आणि दुसऱ्यांना कल्याणाचा मार्ग दाखवितात, त्यांना मी नमस्कार करतो. जे कल्याणस्वरुप झालेले आहेत, ते भले हिंदुस्तानात असो किंवा कोठेही असो त्यांना मी नमस्कार करतो. कल्याणस्वरुप झालेत असे कोणास म्हणता येईल ? ज्यांच्यासाठी मोक्षलक्ष्मी माळ घेऊन तयार आहे. मोक्षलक्ष्मी विवाहासाठी तयार आहे, त्यांना कल्याणस्वरुप झालेत असे म्हणता येईल. शंकर निळकंठ का ? आपण शंकाराच्या देवळात जाऊन म्हणतो ना, 'त्रिशूळ असूनही जगतातील विष पिणारा, शंकर पण मीच आणि निळकंठ पण मीच आहे. ' Page #41 -------------------------------------------------------------------------- ________________ त्रिमंत्र कशामुळे मीच शंकर आणि मीच निळकंठ म्हटले? तर या जगतात ज्यांनी ज्यांनी विष पाजले, ते सर्वच पिऊन टाकले. आणि तुम्ही जर ते प्यालात तर तुम्ही पण शंकर व्हाल. कुणी शीवी दिली, कोणी अपमान केला तर आशीर्वाद देऊन, समभावाने सर्वच विष पिऊन टाका तर शंकर व्हाल. तसे समभाव राहू शकत नाही, पण जेव्हा आशीर्वाद देतो तेव्हा तर समभाव येतो. नुसताच समभाव ठेवायला गेलो तर विषम भाव होऊन जाईल. 32 महादेव विषाचे सर्व पेले प्यायले होते, ज्यांनी विषाचे पेले दिले त्यांचे घेऊन पिऊन टाकले, आम्ही पण असे विषाचे पेले पिऊन महादेवजी झालो. तुम्हाला सुद्धा महादेव व्हायचे असेल तर असे करा . अजूनही वेळ निघून गेली नाही. पाच दहा वर्षे प्यायले तरी पुष्कळ आहे. तर तुम्ही सुद्धा महादेव व्हाल. पण तुम्ही तर तो विषाचा पेला पाजेल त्याआधी तुम्हीच त्याला पाजता ! 'घे, मला महादेव व्हायचे नाही, तू महादेव हो' असे म्हणता ! शिवोहम् केव्हा म्हणू शकतो ? प्रश्नकर्ता: काही लोक 'शिवोहम् शिवोहम्' असे म्हणतात, ते काय आहे? दादाश्री : असे आहे ना, या काळात नाही परंतु पूर्वी जे शिवस्वरुप झाले आहेत, मागच्या काळात जे शिवस्वरुप झाले असतील, ते ‘शिवोहम्’ बोलू शकतात, त्यांचीच नक्कल त्यानंतर त्यांच्या शिष्यांनी, या लोकांनी केली, आणि मग त्यांची नक्कल त्या शिष्यांच्या शिष्यांनी आणि त्यांच्याही शिष्यांनी केली. अशा तऱ्हेने सर्व नक्कलच करतात. असे करुन थोडेच शिव होणार आहेत ? घरात दररोज बायकोसोबत भांडणे होतात आणि तेथे 'शिवोहम् शिवोहम्' करतात, अरे, शिवाला का दोष देता? बायकोसोबत भांडण करत असेल आणि 'शिवोहम् ' म्हणत असेल तर शिवाची नालस्ती होणार की नाही ? Page #42 -------------------------------------------------------------------------- ________________ त्रिमंत्र प्रश्नकर्ता : जेवढा वेळ 'शिवोहम्' बोलणार तेवढा वेळ तरी बायकोसोबत भांडत नाही ना? दादाश्री : नाही, 'शिवोहम्' बोलूच नये. मग तर त्याला पुढे जाण्यासाठी मार्गदर्शनाची गरजच राहिली नाही, कारण ही शेवटच्या स्टेशनची गोष्ट निघाली, म्हणून मग अन्य स्टेशनवर जाण्याची गरजच उरली नही ना! म्हणून असे बोलू शकत नाही. जोपर्यंत स्वत:जवळ शेवटच्या स्टेशनचे लायसन्स येत नाही, तोपर्यंत 'शिवोहम्' बोलू शकत नाही. 'मी शुद्धात्मा आहे' असे सुद्धा बोलू शकत नाही. याचे भान हवे. जे काही बोलाल त्याचे भान असले पाहिजे. बेभान होऊन तर काही लोक असे बोलतात की, 'अहम् ब्रह्मास्मि.' अरे, पण कोठला? ब्रह्म काय आणि ब्रह्मास्मि काय? असे तू काय समजलास, की सारखे सारखे असे बोलत असतोस? त्या लोकांनी असेच शिकवले होते, 'अहं ब्रह्मास्मि;' परंतु त्याचा अनुभव असायला हवा, तुम्ही शुद्धात्मा आहात, परंतु स्वत:ला शुद्धातम्याचा अनुभव असायला हवा. असेच काही बोल शकत नाही. शिवोहम् बोलू शकतो का? तुम्हाला काय वाटते? अनुभव झाल्याशिवाय बोलू शकत नाही. हे तर आपल्याला समजायचे आहे की शेवटी आपले स्वरुप शिवाचे आहे. परंतु असे म्हणू शकत नाही. नाहीतर असे बोलण्याने मधली दुसरी सर्व स्टेशन्स राहून जातील. प्रश्नकर्ता : 'शिवोहम्' बोलतो पण तो अज्ञानतेमुळेच बोलतो ना? समजत नाही म्हणून बोलतो. दादाश्री : हो, अज्ञानतेमुळेच बोलतो, पण मनात तर त्याचा असाच भाव राहतो ना, की 'मी शिवोहम्' म्हणजे 'मीच शीव आहे' म्हणून मग आता काही प्रगति करायची शिल्लक राहिली नाही. असे आतल्या आत समजतो. आणि जे लोक 'सोहम् सोहम्' बोलतात तसे बोलू शकतात, कारण सोहम्चे मराठी रुपांतर काय असेल? प्रश्नकर्ता : 'तो मी आहे.' Page #43 -------------------------------------------------------------------------- ________________ 34 त्रिमंत्र दादाश्री : 'तो मी आहे.' असे बोलू शकतो परंतु शिवोहम् नाही बोलू शकत. 'तो मी आहे' म्हणजेच जो आत्मा आहे किंवा भगवंत आहे, तो मी आहे. असे बोलू शकतो, 'तूच, तूच' बोलू शकतो, परंतु 'मीच, मीच' बोलू शकत नाही. 'तूही, तूही' बोलू शकतो, कारण तेव्हा अज्ञानतेत सुद्धा 'मी' आणि 'तू' हे दोन्ही वेगळेच आहेत, पहिल्यापासूनच. आणि असे बोलतात त्यात चुकीचे तरी काय आहे ? ते दोन्ही तर वेगळेच आहेत. प्रश्नकर्ता : शिवोहम् म्हणजे काय? दादाश्री : 'मला शिव व्हायचे आहे, या लक्ष्यापर्यंत पोहोचायचे आहे' असे ज्याला वाटत आहे तोच म्हणतो की मी शिवोहम् आहे ! शिव म्हणजे स्वतःच कल्याणस्वरुप झाला, तो स्वत:च महादेव झाला. फरक आहे शिव आणि शंकर यामध्ये प्रश्नकर्ता : शिव आणि शंकर यात काय फरक आहे ? शिवास कल्याण पुरुष म्हटले, तर शंकर देवलोकात आहे का? दादाश्री : शंकर एकच नाही, तर अनेक शंकर आहेत. जेव्हापासून समतेत आला ना, तेव्हापासून 'सम् कर' म्हणजे शंकर म्हणवला! अर्थात् पुष्कळ शंकर आहेत, परंतु ते सर्व उच्चगतीत आहेत. जो 'सम्' करतो तो शंकर. ॐ नमः शिवाय' बोलल्यावर एका बाजूस शिवस्वरुप डोळ्यासमोर यावे आणि दुसऱ्या बाजूस आम्ही बोलत रहावे. ही आहे परोक्षभक्ती तुम्ही महादेवास भजता. परंतु महादेव तुमच्या आत बसलेल्या शुद्धात्म्यास पत्र लिहितात की, घ्या, हे आपले सामान आहे माझे नाही. ही परोक्ष भक्ती म्हटली जाते. अशा प्रकारे कृष्णाची भजना केली किंवा दुसऱ्या कोणाची भजना केली, ती परोक्ष भक्ती म्हटली जाते, म्हणून Page #44 -------------------------------------------------------------------------- ________________ त्रिमंत्र ह्या मूर्त्या नसत्या तर काय झाले असते ? त्या खऱ्या भगवंताचा विसर पडला असता आणि मूर्तिलासुद्धा विसरले असते, म्हणून त्या लोकांनी जागो-जागी मूर्त्या ठेवल्या. महादेवाचे देऊळ आले की दर्शन करतात. पाहिले तर दर्शन होईल ना! पाहिले तर आठवण होईल का नाही होणार? आणि आठवण आली म्हणजे दर्शन करतात. म्हणून या मूर्त्यांची स्थापना केली आहे, परंतु शेवटी गोळा बेरीज तर आत बसलेल्याला ओळखण्यासाठीचाच हा सारा खटाटोप आहे. सच्चिदानंदमध्ये सामावले सर्व मंत्र हा त्रिमंत्र आहे त्यामध्ये प्रथम जैनांचा मंत्र आहे, नंतर वासुदेवांचा आणि शिवांचा मंत्र आहे. आणि या सच्चिदानंदमध्ये तर हिन्दु, मुस्लीम, युरोपियन सर्वच आले. म्हणजे सच्चिदानंदमध्ये सर्व लोकांचे मंत्र येतात. 35 हे सर्व मंत्र एकत्र म्हटले, हे मंत्र निष्पक्षपातीपणाने म्हटले तर भगवंत आपल्यावर खुश होतात. एका व्यक्तिची बाजू घेतली की, 'ॐ नमः शिवाय, ॐ नमः शिवाय' फक्त हेच बोलत राहिलो, तर ते सर्व खुश होणार नाहीत. पण ह्यामुळे तर सर्व देव खुश होतात. जे मतमतांतरात पडले आहेत त्यांचे इथे काम नाही. मतांच्या बाहेर निघतील, तेव्हा काम होईल. कशी - कशी माणसे हिंदुस्तानात आहेत, अजूनही ! हिंदूस्तान काही खलास झालेला नाही. हा हिंदुस्तान खलास होणारही नाही. ही तर मुळात आर्यभूमी आहे. आणि ज्या भूमीवर तीर्थंकरांचा जन्म झाला. फक्त तीर्थंकरच नाही, त्रेसष्ठ शलाका पुरुष ज्या देशात जन्म घेतात, तो देश आहे हा ! बोला पहाडी आवाजात...... हे मनात ‘नमो अरिहंताणं' वगैर सर्वकाही म्हणतात पण आत मनात तर काही उलट-सुलट चालत असते, त्यामुळे काही निष्पत्ती होणार नाही. म्हणून सांगितले होते की एकांतात जाऊन खूपच मोठ्याने, पहाडी आवाजात Page #45 -------------------------------------------------------------------------- ________________ त्रिमंत्र बोला. मी मोठ्याने बोललो नाही तरी चालेल पण तुम्हाला खूप मोठ्या आवाजात बोलले पाहिजे. आमचे तर मनच निराळ्या तऱ्हेचे आहे ना ! 36 आता अशा एकांत जागी जाल तर तेथे हा त्रिमंत्र खूप मोठ्याने म्हणा. नदी-नाल्यांपाशी फिरायला जाल तर तेथे जोराने बोला, डोक्यात घमघमाट होईल असे ! प्रश्नकर्ता : मोठ्याने बोलल्यामुळे जो विस्फोट होतो त्याचा परिणाम सर्वदूर जाणवतो, म्हणून हा विचार येतो की मोठ्याने बोलण्याचे प्रयोजन काय आहे ? दादाश्री : मोठ्याने बोलण्यात खूपच फायदा आहे. कारण जोपर्यंत मोठ्या आवाजात बोलणार नाही, तोपर्यंत मनुष्यांची आतली मशीनरी (अंत:करण) बंद होत नाही. ही गोष्ट प्रत्येक मनुष्यासाठी आहे, आमची तर आतली मशीनरी बंदच असते. पण बाकीचे लोक मोठ्याने बोलले नाही, तर त्यांची आतली मशीनरी बंद होणार नाही, आणि तोपर्यंत एकत्वाची प्राप्ती होत नाही. म्हणून आम्ही सांगतो की मोठ्या आवाजात बोला. कारण मोठ्याने बोलण्यामुळे मग मन शांत झाले, बुद्धि संपून गेली आणि जर हळूहळू बोललात ना, तर मन आत चूळबूळ करते, असे होते की नाही ? प्रश्नकर्ता : होते. दादाश्री : बुद्धि सुद्धा मधेच येऊन हस्तक्षेप करते, म्हणून आम्ही सांगतो की मोठ्याने बोलले पाहिजे आणि एकांतात जाल तेव्हा इतक्या मोठ्या आवाजात बोला जणू काही आभाळ उडवून टाकायचे असेल, असे बोला. कारण मोठ्या आवाजात बोलण्याने आत सर्व ( सारे अत:करण) बंद होऊन जाते. मंत्रानी नाही होत आत्मज्ञान प्रश्नकर्ता : गुरुने दिलेल्या मंत्राच्या जपामुळे आत्मज्ञान लवकर होते का ? Page #46 -------------------------------------------------------------------------- ________________ त्रिमंत्र दादाश्री : नाही. पण संसारातील अडचणी कमी होतील, पण जर हे तीन मंत्र (त्रिमंत्र) एकत्र म्हटले तर. प्रश्नकर्ता : म्हणजे हे मंत्र अज्ञानता दूर करण्यासाठीच आहेत ना? दादाश्री : नाही, त्रिमंत्र हे तुमच्या संसारातील अडचणी दूर करण्यासाठी आहेत, अज्ञानता दूर करण्यासाठी तर मी जे आत्मज्ञान तुम्हाला दिले आहे, (ज्ञानविधि द्वारे) ते आहे. त्रिमंत्राने सुळीचा घाव सुईने सरतो ज्ञानी पुरुष उगाच मेहनत करायला लावत नाहीत. ते कमीत कमी मेहनत करवितात, म्हणून तुम्हाला हे त्रिमंत्र सकाळ संध्याकाळ पाच-पाच वेळा बोलण्यास सांगितले आहे. हे त्रिमंत्र कशासाठी बोलण्या योग्य आहे, तर ज्ञान घेतल्यानंतर तुम्ही तर शुद्धात्मा झालात, पण शेजारी कोण राहिले? चंदुभाऊ (वाचकानी चंदुभाऊच्या जागी स्वत:ला समजायचे) आता चंदुभाऊला काही अडचण आली म्हणजे आपण म्हणायचे की 'चंदुभाऊ, एक वेळा हे तीन मंत्र म्हणा ना, काही अडचण असेल तर याच्याने कमी होईल ना.' कारण ते संसार व्यवहारात आहे, त्यांना लक्ष्मी, देणे-घेणे हे सर्व आहे सगळ्याच प्रकारच्या व्यवहारात आहे. हे तीन मंत्र बोलण्याने येणारी उपाधी कमी होते, तरी पण उपाधी नैमित्तिक प्रभाव दाखवेल, पण एवढा मोठा दगड लागणार असेल तो खड्यासारखा लागतो. म्हणून हा त्रिमंत्र येथे दिला आहे. जर कोणते विघ्न येणार असेल, तर हा त्रिमंत्र अर्धा तास, एक तासापर्यंत बोलावा. एक अख्खा गुणस्थान पूर्ण करा (एक गुणस्थान अठेचाळीस मिनीटाचे असते). नाहीतर दररोज हे त्रिमंत्र पाच वेळा म्हणा, पण हे सर्व मंत्र एकत्र म्हणा आणि सोबत सच्चिदानंद सुद्धा म्हणा. सच्चिदानंदामध्ये सर्व लोकांचे मंत्र आले. Page #47 -------------------------------------------------------------------------- ________________ 38 त्रिमंत्र त्रिमंत्राचे रहस्य हे आहे की तुमच्या सर्व संसारीक अडचणींचा नाश होतो. आपण रोज सकाळी बोललात तर संसारातील साऱ्या अडचणी दूर होतात. आपणास (त्रिमंत्र) बोलण्यासाठी पुस्तक पाहिजे असेल तर एक पुस्तक देतो, त्यात हा त्रिमंत्र लिहीला आहे, ते पुस्तक येथून घेऊन जा. प्रश्नकर्ता : या त्रिमंत्रामुळे चक्र शीघ्रतेने चालतील? दादाश्री : त्रिमंत्र बोलण्याने दुसरी नवी पापं बांधली जात नाहीत, इकडे-तिकडे उलट्या मार्गावर भटकणे होत नाही आणि जुनी कर्म पुरी होतात. हा त्रिमंत्र तर असा आहे ना की समजल्याशिवाय बोलला तरी फायदा होतो आणि समजून-उमजून बोलला तरी फायदा होतो, परंतु समजून बोलणाऱ्याला अधिक फायदा होतो आणि न समजणाऱ्याला तोंडाने बोलण्या इताकाच फायदा होतो. एक मात्र हे टेपरेकॉर्ड (मशीन) बोलते ना, त्यास फायदा होत नाही, पण ज्याच्यात आत्मा आहे, तो बोलला तर त्यास फायदा होईलच. हे जग शब्दानीच उत्पन्न झाले आहे. उत्तम व्यक्तिचे शब्द बोलण्याने तुमचे कल्याण होईल अणि वाईट व्यक्तिचे बोलण्याने उलटे होईल. म्हणून हे सर्व समजले पाहिजे. लक्ष्य तर असावे मोक्षाचेच काही विचारायचे असेल विचारा, हं. येथे सगळे काही विचारु शकता, मोक्षाला जायचे आहे ना? मोक्षाला जाता येईल, असे सर्वकाही येथे विचारु शकता, जर विचारायचेच असेल तर. मनाचे समाधान झाले तर मोक्षाला जाता येईल ना? नाहीतर मोक्षाला कसे जाता येईल? भगवंताची शास्त्रे तर आहेत सर्व, पण शास्त्र समजली पाहिजे ना? अनुभवी ज्ञानीपुरुषाशिवाय ते समजणारही नाही आणि उलट चुकीच्या मार्गावर चालू लागेल. Page #48 -------------------------------------------------------------------------- ________________ त्रिमंत्र 39 प्रश्नकर्ता : नवकार मंत्राचा जप कोणते लक्ष्य ठेऊन केला पाहिजे ? दादाश्री : तो तर केवळ मोक्षाचे लक्ष्य ठेवूनच केला पाहिजे. दुसरे कोणतेही लक्ष्य असता कामा नये. 'माझ्या मोक्षासाठी करत आहे' अशा मोक्षाच्या हेतुने कराल तर सर्व प्राप्त होईल. आणि सुखाच्या हेतुने कराल तर फक्त सुख प्राप्त होईल, मोक्षाची प्राप्ति होणार नाही. नवकार मंत्र तर मदत करणारा आहे, मोक्षासाठी. नवकार मंत्र व्यवहाराने आहे, निश्चयाने नाही. हा नवकार मंत्र का भजावा ? तर हे पंच परमेष्ठि भगवंतच मोक्षाचे साधन आहेत. हे पाची सर्वश्रेष्ठ पद आहे. हाच तुझा ध्येय ठेव. यांचीच भजना कर. यांच्याजवळच बसून रहा आणि मरायचे असेल तरी तेथेच मर. हो, इतर कुठे मरु नकोस. माथी पडायचे असेल तर यांच्याच माथी पड. नाहीतर अक्करमींच्या माथी पडलो तर कायचे काय होईल ? मंत्र देणाऱ्याची योग्यता प्रश्नकर्ता : आजच्या युगात मंत्र साधना शीघ्र फळ का देत नाही ? मंत्रात क्षति आहे की साधकाची असमर्थता आहे ? दादाश्री : मंत्रात क्षति नाही, परंतु मंत्राच्या व्यवस्थेत क्षति आहे. सर्व मंत्र निष्पक्षपाती असायला हवेत, पक्षपाती मंत्र फळ देणार नाहीत. निष्पक्षपाती मंत्र एकत्र असले पाहिजे, कारण मन स्वतःच निष्पक्षता शोधत आहे. तरच त्यास शांति मिळेल. भगवंत निष्पक्षपाती असतात. म्हणजे मंत्राची साधना तरच फळ देईल जर तो मंत्र देणारा शीलवान असेल. मंत्र देणारा असा-तसा नसावा. लोकपूज्य असले पाहिजे. लोकांच्या हृदयात विराजमान झालेले हवे. तर मंत्राने आत्मशुद्धि शक्य आहे ? प्रश्नकर्ता : संसारात नवकार मंत्र साथ देतो का नाही ? दादाश्री : नवकार मंत्र साथ देईलच ना, ती तर चांगली गोष्ट आहे. Page #49 -------------------------------------------------------------------------- ________________ त्रिमंत्र प्रश्नकर्ता : ते म्हणण्याने हळूहळू आत्म्याची शुद्धी होते का ? दादाश्री : पण आम्हाला आत्म्याची शुद्धी करायची नाही. आत्मा तर शुद्धच आहे. नवकार मंत्र तर चांगल्या माणसांना नमस्कार केल्याने, दर्शन केल्याने तुम्हाला उच्च पातळीवर नेतो. परंतु समजून बोललात तर! म्हणून नवकार मंत्राचा अर्थ समजून घ्यावा लागेल. हे तर पोपट राम राम बोलतो, म्हणून काय तो रामाला समजू शकेल ? पोपट 'राम राम' नाही का बोलत ? अशा प्रकारे हे लोक नवकार मंत्र बोलतात. त्याचा काय अर्थ? नवकार मंत्र तर ज्ञानी पुरुषांकडून समजून घेतला पाहिजे. कोणत्या समजूतीने नवकाराची भजना करावी ? नवकार मंत्र काय आहे, त्यास समजणारे किती असतील ? नाहीतर हा नवकार मंत्र तर असा मंत्र आहे की एकच वेळा नवकार मंत्र म्हटला तरी त्याचे फळ येणाऱ्या कितीतरी दिवसांपर्यंत मिळत राहते. म्हणजे ज्यापासून रक्षण मिळते, असे नवकार मंत्राचे फळ आहे, परंतु कोणीही एकदा सुद्धा नवकार मंत्र खऱ्या रुपात समजून म्हटला नाही. हे तर जाप जपत राहतात, परंतु खरा जप कोणी जपलाच नाही ना! 40 शिवाय नवकार मंत्र तर तुम्हास म्हणता तरी कुठे येतो? असेच आपले बोलत राहता. नवकार मंत्र बोलणाऱ्याला चिंता ग्रासत नाही. नवकार मंत्र इतका सुंदर आहे की, फक्त चिंताच नाही, परंतु होणारा क्लेश सुद्धा निघून जातो त्याच्या घरातून. पण बोलताच येत नाही ना ! जर बोलता आले असते तर असे झाले नसते. कोणी पण नवकार मंत्र दिला आणि आम्ही बोलू लागलो त्याला अर्थ नाही. प्रश्नकर्ता : ते तर आम्ही आपणाकडून घेणार. दादाश्री : लायसन्सवाले दुकान असेल आणि तेथून घेतला असेल तर चालेल, जर बिन लायसन्सवाल्याकडून घेतला तर काय होईल ? Page #50 -------------------------------------------------------------------------- ________________ त्रिमंत्र तो खोटा, नकली माल देईल. शब्द तसेच्या तसेच असतील पण माल नकली असेल. तुम्हाला नकली माल पसंत आहे की असली माल पसंत आहे? नवकार मंत्र समजून बोलला पाहिजे, समजून बोलल्यावर सर्व भगवंताना पोहोचेल आणि आपला नमस्कार त्वरीत स्वीकार होईल. ह्या 'दादा भगवान' श्रु बोलल्यावर पोहोचतोच आणि फळप्राप्ती होते. हे तर पाहिल्या वर्षी व्यापार केला आणि इतकी फळप्राप्ती झाली, तर दहा वर्षे व्यापार चालू राहीला तर? दुकानाचा जम कसा बसेल? 'नमो अरिहंताणं' म्हटल्याबरोबरच सीमंधर स्वामी नजरेसमोर यायला हवेत. नंतर 'नमो सिद्धाणं' म्हणताना ते दिसणार नाहीत परंतु तेव्हा लक्षात हे ठेवावे की मी अनंत ज्ञानवाला आहे, मी अनंत दर्शनवाला आहे (केवळज्ञान, केवळदर्शन तेच परम ज्योतिस्वरुप भगवंत आहेत.) हे गुण लक्षात ठेवावे. 'नमो आयरियाणं' ते आचार्य भगवंत जे स्वतः आचार पालन करतात आणि दुसऱ्यांकडून पालन करवून घेतात, ते सर्व लक्षात राहिले पाहिजे. प्राप्त करविते यथार्थ फळ हे सर्व नवकार मंत्र भजतात, त्याचे एक तर प्राकृतिक फळ येईल, भौतिक फळ सुंदर येईल, पण मी तर ह्या सगळ्यांकडून 'प्रत्यक्ष दादा भगवानांच्या साक्षीने, वर्तमानात महाविदेह क्षेत्रात विचारणारे......' बोलावून घेतो ना, ते नमस्कार ह्या नवकार मंत्रातूनच येथे घेतले आहेत. हे जे नमस्कार बोलावून घेतो, ते एक्ॉक्ट त्यांनाच पोहोचतात आणि त्याचे लगेच एक्ॉक्ट (यथार्थ) फळ मिळते. आणि नवकार मंत्राचे फळ तर जेव्हा येईल तेव्हा खरे. लाखो लोक हा नवकार मंत्र बोलतात, तो कोणाला पोहचतो? निसर्गाचा नियम असा आहे की, ज्याचा असेल त्यालाच पोहोचतो, पण जर खऱ्या भावाने बोलाल तर. Page #51 -------------------------------------------------------------------------- ________________ 42 त्रिमंत्र तेव्हा कोणाचे निदिध्यासन करावे ? प्रश्नकर्ता : त्रिमंत्र बोलताना प्रत्येक ओळीपाशी कोणाचे निदिध्यासन करावे. ते विस्तारानी सांगा. दादाश्री : अध्यात्माच्या बाबतीत तुम्हाला कोणावर प्रेम वाटले आहे ? तुम्हास कोणावर प्रेमाचे भरते आले आहे ? कोणावर आले आहे ? प्रश्नकर्ता : आपल्यावरच, दादा. दादाश्री : तर त्याचेच ध्यान करा. ज्याच्यावर प्रेमाचे भरते येते ना, त्याचेच ध्यान करा. उपयोगपूर्वक केल्याने फळ पुरेपूर लोकांनी नवकार मंत्र तर आपपल्या भाषेत घेतला. महावीर भगवानांनी असे सांगितले होते की, यास कोणत्याही प्राकृत भाषेत घेऊ नका, अर्धमागधी भाषेतच राहू द्या. त्याचा ह्या लोकांनी काय अर्थ घेतला की, प्रतिक्रमण अर्धमागधी भाषेतच राहू दिले आणि ह्या मंत्राच्या शब्दांचे अर्थ काढू लागले ! प्रतिक्रमणात तर 'क्रमण' आहे आणि हा तर मंत्र आहे. प्रतिक्रमण हे जर यथार्थपणे समजता आले नाही तर ते (एका बाजूने) शिव्या देत राहातात आणि (दुसऱ्या बाजूने) त्याचे प्रतिक्रमण करतात. गोष्ट समजत नाही आणि कसे - कसे दुराग्रह घरुन बोलतात. हा त्रिमंत्र आहे, त्यास कसाही वेडा माणूस बोलेल तर त्याला सुद्धा फळ मिळेल. तरीसुद्धा त्याचा अर्थ समजून वाचाल तर योग्य होईल. हा नवकार मंत्र सुद्धा भगवानांच्या काळापासून आहे आणि अगदी योग्य आहे, परंतु नवकार मंत्र समजला तर ना? त्याचा अर्थ समजत नाही आणि गात राहतात. त्यामुळे त्याचा जसा लाभ मिळायला हवा तसा मिळत नाही. पण तरीसुद्धा घसरुन पडले नाहीत, ही चांगली गोष्ट आहे. नाहीतर नवकार मंत्र तर त्यास म्हणता येईल की नवकार मंत्र Page #52 -------------------------------------------------------------------------- ________________ त्रिमंत्र असेल तेथे चिंता का असावी? पण आता नवकार मंत्र काय करणार बिचारा? आराधना करणाराच जिथे वाकडा! ती एक म्हण आहे ना की 'माळ बिचारी काय कारणार, जपणाराच करंटा?! असे आहे ना? हा मंत्र सर्व लोक बोलतात, त्यातले किती जण उपयोगपूर्वक बोलतात, हे जरा विचारुन या? माळ जपतात, तेव्हा किती जण उपयोगपूर्वक जपतात? मग लवकर आटोपण्यासाठी पळ मणी, मणी आला; पळ मणी, मणी आला' असे करतात. आणि म्हणून पिशव्या बनवल्या. उघडपणे तर घोटाळा करु शकत नाही ना? __ भगवंतांनी काय सांगितले आहे की, 'तू जे काही करशील, माळ जपशील, नवकार मंत्र बोलशील, ते उपयोगपूर्वक करशील तर त्याचे फळ मिळेल, नाहीतर समजल्याशिवाच केले तर 'काच' घेऊनच घरी जाशील आणि अस्सल हीरा तुझ्या हाती लागणार नाही. उपयोगपूर्वक करणाऱ्यास हीरा आणि उपयोगपूर्वक न करणाऱ्यास काच. आणि आज उपयोगपूर्वक करणारे किती आहेत, त्याचा तुम्हीच शोध घ्या. द्रव्यपूजा आणि भावपूजा करणाऱ्यांसाठी हे साधू-आचार्य विचारतात की, हा नवकार मंत्र आणि इतर मंत्र एकत्र बोलण्याचे कारण काय? फक्त नवकारच बोलला तर काय हरकत आहे? मी म्हटले, 'जैन लोक फक्त नवकार मंत्र नाही बोलू शकत, फक्त नवकार मंत्र कोण बोलू शकतो? जो त्यागी आहे, ज्याला जगाशी काही देणे-घेणे नाही, मुलींची लग्ने करायची नाहीत, मुलांचे लग्न करायचे नाहीत, ते फक्त नवकार बोलू शकतात.' लोक दुहेरी हेतुने मंत्र बोलतात. जे भावपूजावाले आहेत ते प्रगतिसाठी (मंत्र) बोलतात, आणि दुसरे लोक ह्या संसारातिल ज्या अडचणी आहेत त्या कमी व्हाव्यात यासाठी बोलतात. अर्थात् जे सांसारिक अडचणीवाले आहेत त्या सर्वांना देवतांची कृपा पाहिजे. म्हणून जे फक्त Page #53 -------------------------------------------------------------------------- ________________ 44 त्रिमंत्र भावपूजा करतात, द्रव्यपूजा करत नाहीत, ते फक्त हा एकच मंत्र बोलू शकतात. आणि जे द्रव्यपूजा आणि भावपूजा दोन्ही करतात, त्यांनी सर्व मंत्र एकत्र बोलले पाहिजे. मूर्तिचे भगवंत द्रव्य भगवंत आहेत, द्रव्य महावीर आहे आणि हा आत भाव महावीर आहे. त्यांना तर आम्ही सुद्धा नमस्कार करतो. मनाला तर करतो मंत्र ____ जोपर्यंत मन आहे, तोपर्यंत मंत्राची आवश्यकता आहे आणि मन शेवटपर्यंत राहणार आहे. जोपर्यंत शरीर आहे तोपर्यंत मन आहे. मंत्र इटसेल्फ (स्वयं) म्हणतो की मनाला तर (खुश) करायचे असेल तर मंत्र म्हणा. हो, मनाला खुश करण्यासाठी हा सुंदर मार्ग आहे. अर्थात त्याची रचनाच इतकी चांगली, पद्धतशीर आहे की तुम्ही मंत्र म्हणाल तर त्याचे फळ प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. त्रिमंत्राची भजना कोठेही प्रश्नकर्ता : त्रिमंत्र मानसिक रित्या कोणत्याही वेळी आणि कोणत्याही जागी करु (बोलू) शकतो की नाही? । दादाश्री : नक्कीच, कोणत्याही वेळी बोलू शकतो. त्रिमंत्र तर संडासातसुद्धा बोलू शकतो, पण असे म्हटल्याने लोक दुरुपयोग करतील आणि मग ते संडासातच बोलत राहतील. असे समजणार नाहीत की एखादे दिवशी काही अडचण असेल आणि वेळ मिळाला नाही, तर संडासात बोललो तर ती गोष्ट निराळी आहे. पण मग लोक या विधानाचा उलटा अर्थ घेतील, म्हणून अशा लोकांसाठी नियम ठेवावे लागतात, पण तरीसुद्धा आम्ही कोणतेही नियम ठेवत नाही. नवकार मंत्राचा सर्जनकर्ता कोण? प्रश्नकर्ता : नवकार मंत्राचे सर्जनकर्ता कोण? Page #54 -------------------------------------------------------------------------- ________________ त्रिमंत्र दादाश्री : हा काही आजचा प्रोजेक्ट नाही. हा तर आधीपासूनचाच आहे, परंतु दुसऱ्या रुपात होता. दुसऱ्या रुपात म्हणजे भाषेत फक्त फरक असेल, परंतु अर्थ तर तो आणि तोच चालत आला आहे. त्रिमंत्रात कोणी मॉनिटर नाही प्रश्नकर्ता : या सगळ्या मंत्रांमध्ये कोणी अग्रेसर, मॉनिटर तर असेल ना? दादाश्री : कोणीच मॉनिटर नाही. मंत्रामध्ये मॉनिटर नसतो. मॉनिटर तर, लोक आपापला मॉनिटर ठरवून पुढे करतात की हा 'माझा मॉनिटर.' प्रश्नकर्ता : परंतु जर मी सगळ्यांना सांगितले की 'तुम्ही माझे काम करा', दुसऱ्यांना सांगितले की, 'तुम्ही माझे काम करा' तर माझे काम कोण करेल? दादाश्री : जेथे निष्पक्षपाती स्वभाव असतो तेथे सर्वजण काम करण्यास तयार असतात, सर्वच्या सर्व! एका पक्षाचा झाला तर दुसरे लोक लगेच विरोधी म्हणून समोर उभे राहतात, पण जर निष्पक्षपात असेल तर सर्व काम करण्यासाठी तयार होतात, कारण ते खूपच नोबल(मोठ्या मनाचे) असतात. हे तर आम्हीच आमच्या संकुचिततेच्या कारणाने त्यांना संकुचित बनवतो. निष्पक्षतेमुळे सर्व काम होतात. येथे तर कधीच अडचण आली नाही. आमच्या येथे चाळीस हजार माणसे हा त्रिमंत्र बोलतात, कोणालाही कुठलीही अडचण आली नाही. जरासुद्धा अडचण येत नाही. काम करेल असे हे औषध । प्रश्नकर्ता : तीन मंत्र एकत्र बोलले तर उत्तम. ते धर्माचा समभाव आणि सद्भावासाठी चांगली गोष्ट आहे. दादाश्री : त्यामध्ये, औषध निहित असते, काम करेल असे. ज्यांना मुलींची लग्ने करायची आहेत, मुलांचे लग्न करायचे आहेत, Page #55 -------------------------------------------------------------------------- ________________ त्रिमंत्र सांसारिक जबाबदारी आणि कर्तव्ये पार पाडायची आहेत, त्यांना सर्व मंत्र बोलावे लागतील. अरे, निष्पक्षपाती मंत्र बोल ना ! पक्षपातामध्ये का पडतोस ? 46 हा नवकार मंत्र कोणाच्या मालकीचा आहे का ? नवकार मंत्र तर जो भजेल त्याचा आहे. जो मनुष्य पुनर्जन्माला समजू लागला आहे त्याच्यासाठी हा उपयोगी आहे. जे पुनर्जन्म समजत नाहीत त्यांच्यासाठी काही उपयोगाचा नाही. हिंदूस्तानातील लोकांसाठी हा मंत्र उपयोगी आहे. सर्व मंत्र क्रमिक आहेत प्रश्नकर्ता : हा जो नवकार मंत्र आहे, तो क्रमिक ( मार्गाचा ) मंत्र आहे ना ? दादाश्री : हो, सर्व क्रमिक आहेत. प्रश्नकर्ता : तर मग येथे अक्रम मार्गात त्याला इतके स्थान का देण्यात आले आहे ? दादाश्री : त्याचे स्थान तर व्यवहारिक पद्धतीने आहे. आता तुम्ही व्यवहारात जगत आहात ना ? आणि व्यवहार शुद्ध करायचा आहे ना ? तर हा मंत्र तुम्हाला व्यवहारात अडचण येऊ देणार नाही. तुम्हाला जर व्यवहारात अडचणी येत असतील तर ह्या मंत्राने सर्व अडचणी कमी होतील. यासाठीच तुम्हाला या मंत्राचे गुपीत, सांगितले. याहून पुढे विशेष काही समजण्याची गरज भासत नाही ना ? ! Page #56 -------------------------------------------------------------------------- ________________ १. भोगतो त्याची चूक २. एडजेस्ट एव्हरीव्हेअर ३. जे घडले तोच न्याय ४. संघर्ष टाळा मी कोण आहे ? क्रोध चिंता प्रतिक्रमण भावना सुधारे जन्मोजन्म दादा भगवान फाउन्डेशनची प्रकाशित पुस्तके मराठी ११. पाप-पुण्य १२. आई - वडील आणि मुलांचा व्यवहार १३. पति - पत्नीचा दिव्य व्यवहार ५. ६. ७. ८. ९. १०. कर्माचे विज्ञान १. २. ३. ४. ज्ञानी पुरुष की पहचान सर्व दुःखों से मुक्ति कर्म का सिद्धांत आत्मबोध मैं कौन हूँ ? वर्तमान तीर्थकर श्री सीमंधर... ५. ६. ७. ८. ९. १०. हुआ सो न्याय ११. चिंता १२. क्रोध ★ भुगते उसी की भूल एडजस्ट एवरीव्हेयर टकराव टालिए १३. प्रतिक्रमण १४. दादा भगवान कौन ? १५. पैसों का व्यवहार १६. अंतः करण का स्वरूप १७. जगत कर्ता कौन ? १८. त्रिमंत्र १९. ★ १४. समजपूर्वक प्राप्त ब्रह्मचर्य १५. मानव धर्म १६. मृत्युवेळी, आधी आणि नंतर १७. सेवा - परोपकार १८. दान १९. त्रिमंत्र २०. वर्तमान तीर्थंकर श्री सीमंधर स्वामी हिन्दी २०. प्रेम २१. २२. समझ से प्राप्त ब्रह्मचर्य माता-पिता और बच्चों का व्यवहार २३. दान २४. २५. २६. २७. निजदोष दर्शन से... निर्दोष २८. पति-पत्नी का दिव्य व्यवहार २९. क्लेश रहित जीवन ३३. ३४. ३५. ३६. ३७. ३८. मानव धर्म सेवा - परोपकार मृत्यु समय, पहले और पश्चात ३०. ३१. ३२. सत्य-असत्य के रहस्य चमत्कार पाप-पुण्य वाणी, व्यवहार में... कर्म का विज्ञान गुरु-शिष्य अहिंसा आप्तवाणी - १ से ८ और १३ (पूर्वार्ध) भावना से सुधरे जन्मोजन्म समझ से प्राप्त ब्रह्मचर्य (पूर्वार्ध - उत्तरार्ध) दादा भगवान फाउन्डेशन द्वारे गुजराती, हिन्दी आणि इंग्रजी भाषेत सुद्धा बरीच पुस्तके प्रकाशित झाली आहे. प्रत्येक महिन्यात हिन्दी, गुजराती आणि इंग्रजी भाषेत दादावाणी मेगेझीन प्रकाशित होत आहे. Page #57 -------------------------------------------------------------------------- ________________ संपर्क सूत्र दादा भगवान परिवार अडालज : त्रिमंदिर, सीमंधर सिटी, अहमदाबाद-कलोल हाईवे, पोस्ट : अडालज, जि.-गांधीनगर, गुजरात - 382421, फोन : (079) 39830100 अहमदाबादः दादा दर्शन, ५, ममतापार्क सोसाइटी, नवगुजरात कॉलेजच्या मागे उस्मानपुरा, अहमदाबाद-380014. फोन : (079) 27540408 वडोदरा : दादा मंदिर, १७, मामाची पोल-मुहल्ला, रावपुरा पुलिस स्टेशन समोर, सलाटवाड़ा, वडोदरा. फोन : 9924343335 गोधरा : त्रिमंदिर, भामैया गाँव, एफसीआई गोडाउन समोर, गोधरा जि.-पंचमहाल. फोन : 9723707738 राजकोट : त्रिमंदिर, अहमदाबाद-राजकोट हाईवे, तरघड़िया चोकड़ी (सर्कल), पोस्ट : मालियासण, जि.-राजकोट. फोन : 9924343478 सुरेन्द्रनगर : त्रिमंदिर, लोकविद्यालय जवळ, सुरेन्द्रनगर-राजकोट हाईवे, मुळी रोड. फोन : 9737048322 अमरेली : त्रिमंदिर, लीलीया बायपास चोकडी, खारावाडी. फोन : 9924344460 मोरबी : त्रिमंदिर, पो-जेपुर (मोरबी), नवलखी रोड, जि.-मोरबी, फोन : 9924341188 भुज : त्रिमंदिर, हिल गार्डनच्या मागे, एयरपोर्ट रोड. फोन : 9924345588 अंजार : त्रिमंदिर, अंजार-मुंद्रा रोड, सीनोग्रा पाटीया जवळ, सीनोग्रा गाँव, ता.-अंजार. फोन : 9924346622 मुंबई : 9323528901 दिल्ली : 9810098564 कोलकता : 9830093230 चेन्नई : 9380159957 जयपुर : 8290333699 भोपाल : 9425024405 इन्दौर : 9039936173 जबलपुर : 9425160428 रायपुर : 9329644433 भिलाई : 9827481336 पटना : 7352723132 अमरावती : 9422915064 : 9590979099 हैदराबाद : 9885058771 : 7218473468 जालंधर : 9814063043 U.S.A. : +1877-505-DADA (3232) UAE : +971 557316937 U.K. : +44 330-111-DADA (3232) Singapore : +6581129229 Kenya: +254 722722063 Australia : +61 421127947 New Zealand : +64 210376434 Website : www.dadabhagwan.org Page #58 -------------------------------------------------------------------------- ________________ त्रिमंत्र नमो अरिहंताणं नमो सिद्धाणं नमो आयरियाणं नमो उव्वज्झायाणं नमो लोए सव्वसाहूणं एसो पंच नमुक्कारो, सव्व पावप्पणासणो मंगलाणं च सव्वेसिं, पढमं हवई मंगलम् // 1 // ॐ नमो भगवते वासुदेवाय // 2 // ॐ नमः शिवाय // 3 // जय सच्चिदानंद Printed in India dadabhagwan.org Price 10