________________
संपादकीय अनादि काळापासून प्रत्येक धर्मांचे मूळपुरुष, जसे की महावीर भगवान, राम भगवान इत्यादी जेव्हा विद्यमान असतात, तेव्हा ते लोकांना सर्व धर्मांच्या मतमतांतरातन बाहेर काढून आत्मधर्मामध्ये स्थिर करतात आणि मूळपुरुष जेव्हा नसतील तेव्हा जगातील लोक काळाच्या ओघात हळूहळू मतमतांतरात पडून धर्म-पंथ-संप्रदाय यामध्ये विभक्त होतात, परिणामी हळूहळू सुख शांति क्षीण होत जाते.
धर्मात माझे-तुझे करुन भांडणे होतात. ती भांडणे मिटविण्यासाठी निष्पक्षपाती त्रिमंत्र आहे. या त्रिमंत्राचा मूळ अर्थ जर समजला तर त्याचा कोणत्याही व्यक्ति, संप्रदाय किंवा कोणत्याही पंथाशी काहीही संबंध नाही. आत्मज्ञानीपासून ते अंततः केवळज्ञानी आणि निर्वाणप्राप्तिने मोक्षगती प्राप्त करणाऱ्या उच्च जागृत आत्म्यांनाच नमस्कार निर्दिष्टत आहे. आणि त्यांना नमस्कार केल्याने संसारी विघ्ने दूर होतात, अडचणींमध्ये शांती राहते आणि मोक्षाच्या ध्येयाकडे लक्ष्य बांधले जाते.
कृष्ण भगवंतांनी त्यांच्या संपूर्ण आयुष्यात कधीच म्हटले नाही की 'मी वैष्णव आहे,' 'माझा वैष्णव धर्म आहे.' भगवान महावीरांनी त्यांच्या आयुष्यात कधीच म्हटले नाही की 'मी जैन आहे,' 'माझा जैन धर्म आहे.' भगवान रामचंद्रांनी सुद्धा कधीही म्हटले नाही की 'माझा सनातन धर्म' आहे. सर्वांनी आत्म्याची ओळख करुन मोक्षाला जाण्याचीच गोष्ट केली आहे. जसे की भगवत गीतेमध्ये भगवान कृष्णांनी, आगमामध्ये तीर्थंकरांनी आणि योगवशिष्ठमध्ये वशिष्ठ मुनींनी रामास आत्म्याची ओळख करुन घेण्यास सांगितले आहे. जीव म्हणजे अज्ञान दशा. शिव म्हणजे कल्याण स्वरुप. आत्मज्ञान प्राप्तीनंतर त्याच जीवमघून शिवची प्राप्ती होते. शिव म्हणजे कोणत्या व्यक्तिची बाब नाही. जे कल्याणस्वरुप सिद्ध झाले त्यांचीच ही बाब आहे.
आत्मज्ञानी परम पूज्यश्री दादा भगवानांनी निष्पक्षपाती त्रिमंत्र प्रदान