________________
त्रिमंत्र
असतात, परंतु ते आचार्य महाराजांसमोर 'बापजी, बापजी' असे करत राहतात. ज्यांच्या डरकाळीमुळे साधु व उपाध्याय मांजारासारखे होतात, ते आचार्य ! आणि साधुने जरी कितीही जोरात डरकाळी फोडली तरीसुद्धा आचार्य महाराज त्याची दखल सुद्धा घेत नाहीत.
17
आचार्य असे असतात की, शिष्याच्या हातून काही चूक झाली तर त्यांच्यासमोर (शिष्यास) उलटी होते, कारण तो आत सहन करु शकत नाही. आचार्यांचा इतका ताप असतो तरीसुद्धा ते कडक नसतात, ते क्रोध करत नाहीत. तरीपण त्यांचा कडकपणा जाणवतो, खूप ताप जाणवतो.
जसा हा हिम (बर्फ) पडतो ना, त्या हिमाचा ताप किती अधिक असतो? असे हिमताप म्हटले जातात, पण तरी त्यांच्यात क्रोध नसतो. क्रोध- मान-माया-लोभ जर असतील तर त्यांना आचार्य म्हणता येणारच नाही ना !
नाहीतर आचार्य महाराज तर कसे असतात ? त्यांचे तर काय सांगावे! त्यांची वाणी ऐकून तेथून उठायचे मनच होत नाही! आचार्यांना तर भगवंतच म्हटले जाते ! ते कोणी असे तसे नाही म्हटले जात.
दादा, खटपटी वीतराग
आमचे हे आचार्यपद म्हटले जाते, परंतु संपूर्ण वीतरागपद म्हटले जात नाही. पण आम्हाला वीतराग म्हणायचे असेल तर खटपटी वीतराग (कल्याण हेतू खटपट करणारे) म्हणा. अशी खटपट की 'तुम्ही या, आपण सत्संग करु आणि आपणासाठी असे करीन, तसे करीन.' संपूर्ण वीतरागमध्ये असे नसते. ढवळाढवळ सुद्धा नाही आणि दखल सुद्धा नाही. आपले हित होत आहे किंवा अहित होत आहे, हे सगळे ते पाहत बसत नाहीत. ते स्वतःच हितकारी आहेत. त्यांची हवा हितकारी आहे, त्यांची वाणी हितकारी आहे, त्यांचे दर्शन हितकारी आहे, परंतु ते तुम्हाला असे म्हणणार नाही की 'तुम्ही असे करा' आणि मी तर तुम्हाला सांगतो की, 'तुमच्यासोबत मी सत्संग करीन आणि तुम्ही