________________
त्रिमंत्र
आपल्याला काय वाटते? जास्त विचार करुन हे समजणार नाही, आपोआप सहजपणे बोला ना !
12
प्रश्नकर्ता : सर्व एक समान. नमस्कार केला म्हणून सर्व एक समान. आता त्यांच्यात श्रेष्ठता किंवा कनिष्ठता हे आम्ही कशी ठरवू शकू ?
दादाश्री : परंतु ह्या लोकांनी पहिला नंबर अरिहंताणंचा लिहिला आणि सिद्धाणंचा दुसरा नंबर लिहिला, याचे कारण आपल्या लक्षात आले का?
ते काय म्हणतात की जे सिद्ध झाले ते संपूर्ण आहेत, ते तिथे सिद्धगतित विराजमान झालेत पण ते आमच्या कोणत्याच कामी येत नाहीत, आम्हाला तर 'हे' (अरिहंत) कामी येतात, त्यामुळे त्यांचा पहिला नंबर आणि सिद्ध भगवंतांचा दुसरा नंबर आहे.
आणि जेथे सिद्ध भगवंत आहेत, तेथे आपणास जायचे आहे, म्हणून ते आपले लक्ष्य आहे, परंतु उपकारकर्ते कोण ? तर अरिहंत. त्यांनी स्वतः ‘सहा शत्रुंना जिंकले आहे आणि आपणांस जिकंण्याचा मार्ग दाखवितात, अशीर्वाद देतात. त्यासाठी त्यांना प्रथम स्थानावर ठेवले. त्यांना पुष्कळ उपकारी मानले. अर्थात आपले लोक जे प्रकट असतात त्यांना उपकारकर्ते मानतात.
फरक, अरिहंत आणि सिद्धांमधील
प्रश्नकर्ता : सिद्ध भगवंत कोणत्याही प्रकारे मानवजीवनाच्या कल्याणासाठी प्रवृत्त होतात का ?
दादाश्री : नाही 'सिद्ध' हे तर आपले ध्येय आहे, तरीसुद्धा ते तुम्हाला काही मदत करणार नाहीत. ते तर इथे जेव्हा ज्ञानी असतील किंवा तीर्थंकर असतील तर ते तुम्हाला मदत करतील, हेल्प करतील, तुमची चूक दाखवतील, तुम्हाला मार्ग दाखवतील, तुम्हाला तुमच्या स्वरुपाची ओळख करुन देतील.