________________
त्रिमंत्र
असेल तेथे चिंता का असावी? पण आता नवकार मंत्र काय करणार बिचारा? आराधना करणाराच जिथे वाकडा!
ती एक म्हण आहे ना की 'माळ बिचारी काय कारणार, जपणाराच करंटा?! असे आहे ना?
हा मंत्र सर्व लोक बोलतात, त्यातले किती जण उपयोगपूर्वक बोलतात, हे जरा विचारुन या? माळ जपतात, तेव्हा किती जण उपयोगपूर्वक जपतात? मग लवकर आटोपण्यासाठी पळ मणी, मणी आला; पळ मणी, मणी आला' असे करतात. आणि म्हणून पिशव्या बनवल्या. उघडपणे तर घोटाळा करु शकत नाही ना?
__ भगवंतांनी काय सांगितले आहे की, 'तू जे काही करशील, माळ जपशील, नवकार मंत्र बोलशील, ते उपयोगपूर्वक करशील तर त्याचे फळ मिळेल, नाहीतर समजल्याशिवाच केले तर 'काच' घेऊनच घरी जाशील आणि अस्सल हीरा तुझ्या हाती लागणार नाही. उपयोगपूर्वक करणाऱ्यास हीरा आणि उपयोगपूर्वक न करणाऱ्यास काच. आणि आज उपयोगपूर्वक करणारे किती आहेत, त्याचा तुम्हीच शोध घ्या.
द्रव्यपूजा आणि भावपूजा करणाऱ्यांसाठी हे साधू-आचार्य विचारतात की, हा नवकार मंत्र आणि इतर मंत्र एकत्र बोलण्याचे कारण काय? फक्त नवकारच बोलला तर काय हरकत आहे? मी म्हटले, 'जैन लोक फक्त नवकार मंत्र नाही बोलू शकत, फक्त नवकार मंत्र कोण बोलू शकतो? जो त्यागी आहे, ज्याला जगाशी काही देणे-घेणे नाही, मुलींची लग्ने करायची नाहीत, मुलांचे लग्न करायचे नाहीत, ते फक्त नवकार बोलू शकतात.'
लोक दुहेरी हेतुने मंत्र बोलतात. जे भावपूजावाले आहेत ते प्रगतिसाठी (मंत्र) बोलतात, आणि दुसरे लोक ह्या संसारातिल ज्या अडचणी आहेत त्या कमी व्हाव्यात यासाठी बोलतात. अर्थात् जे सांसारिक अडचणीवाले आहेत त्या सर्वांना देवतांची कृपा पाहिजे. म्हणून जे फक्त