________________
त्रिमंत्र
तो खोटा, नकली माल देईल. शब्द तसेच्या तसेच असतील पण माल नकली असेल. तुम्हाला नकली माल पसंत आहे की असली माल पसंत आहे?
नवकार मंत्र समजून बोलला पाहिजे, समजून बोलल्यावर सर्व भगवंताना पोहोचेल आणि आपला नमस्कार त्वरीत स्वीकार होईल. ह्या 'दादा भगवान' श्रु बोलल्यावर पोहोचतोच आणि फळप्राप्ती होते. हे तर पाहिल्या वर्षी व्यापार केला आणि इतकी फळप्राप्ती झाली, तर दहा वर्षे व्यापार चालू राहीला तर? दुकानाचा जम कसा बसेल?
'नमो अरिहंताणं' म्हटल्याबरोबरच सीमंधर स्वामी नजरेसमोर यायला हवेत. नंतर 'नमो सिद्धाणं' म्हणताना ते दिसणार नाहीत परंतु तेव्हा लक्षात हे ठेवावे की मी अनंत ज्ञानवाला आहे, मी अनंत दर्शनवाला आहे (केवळज्ञान, केवळदर्शन तेच परम ज्योतिस्वरुप भगवंत आहेत.) हे गुण लक्षात ठेवावे. 'नमो आयरियाणं' ते आचार्य भगवंत जे स्वतः आचार पालन करतात आणि दुसऱ्यांकडून पालन करवून घेतात, ते सर्व लक्षात राहिले पाहिजे.
प्राप्त करविते यथार्थ फळ हे सर्व नवकार मंत्र भजतात, त्याचे एक तर प्राकृतिक फळ येईल, भौतिक फळ सुंदर येईल, पण मी तर ह्या सगळ्यांकडून 'प्रत्यक्ष दादा भगवानांच्या साक्षीने, वर्तमानात महाविदेह क्षेत्रात विचारणारे......' बोलावून घेतो ना, ते नमस्कार ह्या नवकार मंत्रातूनच येथे घेतले आहेत. हे जे नमस्कार बोलावून घेतो, ते एक्ॉक्ट त्यांनाच पोहोचतात आणि त्याचे लगेच एक्ॉक्ट (यथार्थ) फळ मिळते. आणि नवकार मंत्राचे फळ तर जेव्हा येईल तेव्हा खरे.
लाखो लोक हा नवकार मंत्र बोलतात, तो कोणाला पोहचतो? निसर्गाचा नियम असा आहे की, ज्याचा असेल त्यालाच पोहोचतो, पण जर खऱ्या भावाने बोलाल तर.