________________
त्रिमंत्र
सांसारिक जबाबदारी आणि कर्तव्ये पार पाडायची आहेत, त्यांना सर्व मंत्र बोलावे लागतील. अरे, निष्पक्षपाती मंत्र बोल ना ! पक्षपातामध्ये का पडतोस ?
46
हा नवकार मंत्र कोणाच्या मालकीचा आहे का ? नवकार मंत्र तर जो भजेल त्याचा आहे. जो मनुष्य पुनर्जन्माला समजू लागला आहे त्याच्यासाठी हा उपयोगी आहे. जे पुनर्जन्म समजत नाहीत त्यांच्यासाठी काही उपयोगाचा नाही. हिंदूस्तानातील लोकांसाठी हा मंत्र उपयोगी आहे. सर्व मंत्र क्रमिक आहेत
प्रश्नकर्ता : हा जो नवकार मंत्र आहे, तो क्रमिक ( मार्गाचा ) मंत्र आहे ना ?
दादाश्री : हो, सर्व क्रमिक आहेत.
प्रश्नकर्ता : तर मग येथे अक्रम मार्गात त्याला इतके स्थान का देण्यात आले आहे ?
दादाश्री : त्याचे स्थान तर व्यवहारिक पद्धतीने आहे. आता तुम्ही व्यवहारात जगत आहात ना ? आणि व्यवहार शुद्ध करायचा आहे ना ? तर हा मंत्र तुम्हाला व्यवहारात अडचण येऊ देणार नाही. तुम्हाला जर व्यवहारात अडचणी येत असतील तर ह्या मंत्राने सर्व अडचणी कमी होतील.
यासाठीच तुम्हाला या मंत्राचे गुपीत, सांगितले. याहून पुढे विशेष काही समजण्याची गरज भासत नाही ना ? !