________________
त्रिमंत्र
39
प्रश्नकर्ता : नवकार मंत्राचा जप कोणते लक्ष्य ठेऊन केला पाहिजे ?
दादाश्री : तो तर केवळ मोक्षाचे लक्ष्य ठेवूनच केला पाहिजे. दुसरे कोणतेही लक्ष्य असता कामा नये. 'माझ्या मोक्षासाठी करत आहे' अशा मोक्षाच्या हेतुने कराल तर सर्व प्राप्त होईल. आणि सुखाच्या हेतुने कराल तर फक्त सुख प्राप्त होईल, मोक्षाची प्राप्ति होणार नाही. नवकार मंत्र तर मदत करणारा आहे, मोक्षासाठी. नवकार मंत्र व्यवहाराने आहे, निश्चयाने नाही.
हा नवकार मंत्र का भजावा ? तर हे पंच परमेष्ठि भगवंतच मोक्षाचे साधन आहेत. हे पाची सर्वश्रेष्ठ पद आहे. हाच तुझा ध्येय ठेव. यांचीच भजना कर. यांच्याजवळच बसून रहा आणि मरायचे असेल तरी तेथेच मर. हो, इतर कुठे मरु नकोस. माथी पडायचे असेल तर यांच्याच माथी पड. नाहीतर अक्करमींच्या माथी पडलो तर कायचे काय होईल ? मंत्र देणाऱ्याची योग्यता
प्रश्नकर्ता : आजच्या युगात मंत्र साधना शीघ्र फळ का देत नाही ? मंत्रात क्षति आहे की साधकाची असमर्थता आहे ?
दादाश्री : मंत्रात क्षति नाही, परंतु मंत्राच्या व्यवस्थेत क्षति आहे. सर्व मंत्र निष्पक्षपाती असायला हवेत, पक्षपाती मंत्र फळ देणार नाहीत. निष्पक्षपाती मंत्र एकत्र असले पाहिजे, कारण मन स्वतःच निष्पक्षता शोधत आहे. तरच त्यास शांति मिळेल. भगवंत निष्पक्षपाती असतात. म्हणजे मंत्राची साधना तरच फळ देईल जर तो मंत्र देणारा शीलवान असेल. मंत्र देणारा असा-तसा नसावा. लोकपूज्य असले पाहिजे. लोकांच्या हृदयात विराजमान झालेले हवे.
तर मंत्राने आत्मशुद्धि शक्य आहे ?
प्रश्नकर्ता : संसारात नवकार मंत्र साथ देतो का नाही ?
दादाश्री : नवकार मंत्र साथ देईलच ना, ती तर चांगली गोष्ट आहे.