________________
त्रिमंत्र
दादाश्री : नाही. पण संसारातील अडचणी कमी होतील, पण जर हे तीन मंत्र (त्रिमंत्र) एकत्र म्हटले तर.
प्रश्नकर्ता : म्हणजे हे मंत्र अज्ञानता दूर करण्यासाठीच आहेत ना?
दादाश्री : नाही, त्रिमंत्र हे तुमच्या संसारातील अडचणी दूर करण्यासाठी आहेत, अज्ञानता दूर करण्यासाठी तर मी जे आत्मज्ञान तुम्हाला दिले आहे, (ज्ञानविधि द्वारे) ते आहे.
त्रिमंत्राने सुळीचा घाव सुईने सरतो ज्ञानी पुरुष उगाच मेहनत करायला लावत नाहीत. ते कमीत कमी मेहनत करवितात, म्हणून तुम्हाला हे त्रिमंत्र सकाळ संध्याकाळ पाच-पाच वेळा बोलण्यास सांगितले आहे.
हे त्रिमंत्र कशासाठी बोलण्या योग्य आहे, तर ज्ञान घेतल्यानंतर तुम्ही तर शुद्धात्मा झालात, पण शेजारी कोण राहिले? चंदुभाऊ (वाचकानी चंदुभाऊच्या जागी स्वत:ला समजायचे) आता चंदुभाऊला काही अडचण आली म्हणजे आपण म्हणायचे की 'चंदुभाऊ, एक वेळा हे तीन मंत्र म्हणा ना, काही अडचण असेल तर याच्याने कमी होईल ना.' कारण ते संसार व्यवहारात आहे, त्यांना लक्ष्मी, देणे-घेणे हे सर्व आहे सगळ्याच प्रकारच्या व्यवहारात आहे. हे तीन मंत्र बोलण्याने येणारी उपाधी कमी होते, तरी पण उपाधी नैमित्तिक प्रभाव दाखवेल, पण एवढा मोठा दगड लागणार असेल तो खड्यासारखा लागतो. म्हणून हा त्रिमंत्र येथे दिला आहे.
जर कोणते विघ्न येणार असेल, तर हा त्रिमंत्र अर्धा तास, एक तासापर्यंत बोलावा. एक अख्खा गुणस्थान पूर्ण करा (एक गुणस्थान अठेचाळीस मिनीटाचे असते). नाहीतर दररोज हे त्रिमंत्र पाच वेळा म्हणा, पण हे सर्व मंत्र एकत्र म्हणा आणि सोबत सच्चिदानंद सुद्धा म्हणा. सच्चिदानंदामध्ये सर्व लोकांचे मंत्र आले.