________________
त्रिमंत्र
ह्या मूर्त्या नसत्या तर काय झाले असते ? त्या खऱ्या भगवंताचा विसर पडला असता आणि मूर्तिलासुद्धा विसरले असते, म्हणून त्या लोकांनी जागो-जागी मूर्त्या ठेवल्या. महादेवाचे देऊळ आले की दर्शन करतात. पाहिले तर दर्शन होईल ना! पाहिले तर आठवण होईल का नाही होणार? आणि आठवण आली म्हणजे दर्शन करतात. म्हणून या मूर्त्यांची स्थापना केली आहे, परंतु शेवटी गोळा बेरीज तर आत बसलेल्याला ओळखण्यासाठीचाच हा सारा खटाटोप आहे.
सच्चिदानंदमध्ये सामावले सर्व मंत्र
हा त्रिमंत्र आहे त्यामध्ये प्रथम जैनांचा मंत्र आहे, नंतर वासुदेवांचा आणि शिवांचा मंत्र आहे. आणि या सच्चिदानंदमध्ये तर हिन्दु, मुस्लीम, युरोपियन सर्वच आले. म्हणजे सच्चिदानंदमध्ये सर्व लोकांचे मंत्र येतात.
35
हे सर्व मंत्र एकत्र म्हटले, हे मंत्र निष्पक्षपातीपणाने म्हटले तर भगवंत आपल्यावर खुश होतात. एका व्यक्तिची बाजू घेतली की, 'ॐ नमः शिवाय, ॐ नमः शिवाय' फक्त हेच बोलत राहिलो, तर ते सर्व खुश होणार नाहीत. पण ह्यामुळे तर सर्व देव खुश होतात.
जे मतमतांतरात पडले आहेत त्यांचे इथे काम नाही. मतांच्या बाहेर निघतील, तेव्हा काम होईल.
कशी - कशी माणसे हिंदुस्तानात आहेत, अजूनही ! हिंदूस्तान काही खलास झालेला नाही. हा हिंदुस्तान खलास होणारही नाही. ही तर मुळात आर्यभूमी आहे. आणि ज्या भूमीवर तीर्थंकरांचा जन्म झाला. फक्त तीर्थंकरच नाही, त्रेसष्ठ शलाका पुरुष ज्या देशात जन्म घेतात, तो देश आहे हा !
बोला पहाडी आवाजात......
हे मनात ‘नमो अरिहंताणं' वगैर सर्वकाही म्हणतात पण आत मनात तर काही उलट-सुलट चालत असते, त्यामुळे काही निष्पत्ती होणार नाही. म्हणून सांगितले होते की एकांतात जाऊन खूपच मोठ्याने, पहाडी आवाजात