________________
त्रिमंत्र
बोला. मी मोठ्याने बोललो नाही तरी चालेल पण तुम्हाला खूप मोठ्या आवाजात बोलले पाहिजे. आमचे तर मनच निराळ्या तऱ्हेचे आहे ना !
36
आता अशा एकांत जागी जाल तर तेथे हा त्रिमंत्र खूप मोठ्याने म्हणा. नदी-नाल्यांपाशी फिरायला जाल तर तेथे जोराने बोला, डोक्यात घमघमाट होईल असे !
प्रश्नकर्ता : मोठ्याने बोलल्यामुळे जो विस्फोट होतो त्याचा परिणाम सर्वदूर जाणवतो, म्हणून हा विचार येतो की मोठ्याने बोलण्याचे प्रयोजन काय आहे ?
दादाश्री : मोठ्याने बोलण्यात खूपच फायदा आहे. कारण जोपर्यंत मोठ्या आवाजात बोलणार नाही, तोपर्यंत मनुष्यांची आतली मशीनरी (अंत:करण) बंद होत नाही. ही गोष्ट प्रत्येक मनुष्यासाठी आहे, आमची तर आतली मशीनरी बंदच असते. पण बाकीचे लोक मोठ्याने बोलले नाही, तर त्यांची आतली मशीनरी बंद होणार नाही, आणि तोपर्यंत एकत्वाची प्राप्ती होत नाही. म्हणून आम्ही सांगतो की मोठ्या आवाजात बोला. कारण मोठ्याने बोलण्यामुळे मग मन शांत झाले, बुद्धि संपून गेली आणि जर हळूहळू बोललात ना, तर मन आत चूळबूळ करते, असे होते की नाही ?
प्रश्नकर्ता : होते.
दादाश्री : बुद्धि सुद्धा मधेच येऊन हस्तक्षेप करते, म्हणून आम्ही सांगतो की मोठ्याने बोलले पाहिजे आणि एकांतात जाल तेव्हा इतक्या मोठ्या आवाजात बोला जणू काही आभाळ उडवून टाकायचे असेल, असे बोला. कारण मोठ्या आवाजात बोलण्याने आत सर्व ( सारे अत:करण) बंद होऊन जाते.
मंत्रानी नाही होत आत्मज्ञान
प्रश्नकर्ता : गुरुने दिलेल्या मंत्राच्या जपामुळे आत्मज्ञान लवकर
होते का ?