________________
34
त्रिमंत्र
दादाश्री : 'तो मी आहे.' असे बोलू शकतो परंतु शिवोहम् नाही बोलू शकत. 'तो मी आहे' म्हणजेच जो आत्मा आहे किंवा भगवंत आहे, तो मी आहे. असे बोलू शकतो, 'तूच, तूच' बोलू शकतो, परंतु 'मीच, मीच' बोलू शकत नाही. 'तूही, तूही' बोलू शकतो, कारण तेव्हा अज्ञानतेत सुद्धा 'मी' आणि 'तू' हे दोन्ही वेगळेच आहेत, पहिल्यापासूनच. आणि असे बोलतात त्यात चुकीचे तरी काय आहे ? ते दोन्ही तर वेगळेच आहेत.
प्रश्नकर्ता : शिवोहम् म्हणजे काय?
दादाश्री : 'मला शिव व्हायचे आहे, या लक्ष्यापर्यंत पोहोचायचे आहे' असे ज्याला वाटत आहे तोच म्हणतो की मी शिवोहम् आहे ! शिव म्हणजे स्वतःच कल्याणस्वरुप झाला, तो स्वत:च महादेव झाला.
फरक आहे शिव आणि शंकर यामध्ये प्रश्नकर्ता : शिव आणि शंकर यात काय फरक आहे ? शिवास कल्याण पुरुष म्हटले, तर शंकर देवलोकात आहे का?
दादाश्री : शंकर एकच नाही, तर अनेक शंकर आहेत. जेव्हापासून समतेत आला ना, तेव्हापासून 'सम् कर' म्हणजे शंकर म्हणवला! अर्थात् पुष्कळ शंकर आहेत, परंतु ते सर्व उच्चगतीत आहेत. जो 'सम्' करतो तो शंकर.
ॐ नमः शिवाय' बोलल्यावर एका बाजूस शिवस्वरुप डोळ्यासमोर यावे आणि दुसऱ्या बाजूस आम्ही बोलत रहावे.
ही आहे परोक्षभक्ती तुम्ही महादेवास भजता. परंतु महादेव तुमच्या आत बसलेल्या शुद्धात्म्यास पत्र लिहितात की, घ्या, हे आपले सामान आहे माझे नाही. ही परोक्ष भक्ती म्हटली जाते. अशा प्रकारे कृष्णाची भजना केली किंवा दुसऱ्या कोणाची भजना केली, ती परोक्ष भक्ती म्हटली जाते, म्हणून