________________
त्रिमंत्र
प्रश्नकर्ता : जेवढा वेळ 'शिवोहम्' बोलणार तेवढा वेळ तरी बायकोसोबत भांडत नाही ना?
दादाश्री : नाही, 'शिवोहम्' बोलूच नये. मग तर त्याला पुढे जाण्यासाठी मार्गदर्शनाची गरजच राहिली नाही, कारण ही शेवटच्या स्टेशनची गोष्ट निघाली, म्हणून मग अन्य स्टेशनवर जाण्याची गरजच उरली नही ना! म्हणून असे बोलू शकत नाही. जोपर्यंत स्वत:जवळ शेवटच्या स्टेशनचे लायसन्स येत नाही, तोपर्यंत 'शिवोहम्' बोलू शकत नाही. 'मी शुद्धात्मा आहे' असे सुद्धा बोलू शकत नाही. याचे भान हवे. जे काही बोलाल त्याचे भान असले पाहिजे. बेभान होऊन तर काही लोक असे बोलतात की, 'अहम् ब्रह्मास्मि.' अरे, पण कोठला? ब्रह्म काय आणि ब्रह्मास्मि काय? असे तू काय समजलास, की सारखे सारखे असे बोलत असतोस? त्या लोकांनी असेच शिकवले होते, 'अहं ब्रह्मास्मि;' परंतु त्याचा अनुभव असायला हवा, तुम्ही शुद्धात्मा आहात, परंतु स्वत:ला शुद्धातम्याचा अनुभव असायला हवा. असेच काही बोल शकत नाही. शिवोहम् बोलू शकतो का? तुम्हाला काय वाटते? अनुभव झाल्याशिवाय बोलू शकत नाही. हे तर आपल्याला समजायचे आहे की शेवटी आपले स्वरुप शिवाचे आहे. परंतु असे म्हणू शकत नाही. नाहीतर असे बोलण्याने मधली दुसरी सर्व स्टेशन्स राहून जातील.
प्रश्नकर्ता : 'शिवोहम्' बोलतो पण तो अज्ञानतेमुळेच बोलतो ना? समजत नाही म्हणून बोलतो.
दादाश्री : हो, अज्ञानतेमुळेच बोलतो, पण मनात तर त्याचा असाच भाव राहतो ना, की 'मी शिवोहम्' म्हणजे 'मीच शीव आहे' म्हणून मग आता काही प्रगति करायची शिल्लक राहिली नाही. असे
आतल्या आत समजतो. आणि जे लोक 'सोहम् सोहम्' बोलतात तसे बोलू शकतात, कारण सोहम्चे मराठी रुपांतर काय असेल?
प्रश्नकर्ता : 'तो मी आहे.'