________________
त्रिमंत्र
डोळे बंद करुन म्हणा बघू, न..मो..अ..री.. हं..ता.. णं, ही अक्षरे म्हणत असताना मनात वाचू शकत नाही का ? अभ्यास करा, तर मग तुम्ही वाचू शकाल.
31
मग ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय' यास पण तुम्ही डोळे मिटून म्हणाल तर प्रत्येक अक्षर तुम्हाला दिसेल. अक्षरांसोबत म्हणू शकाल. तुम्ही दोन दिवस अभ्यास करा, तीसऱ्या दिवशी तुम्हांस खूपच सुंदर दिसेल.
मंत्राचे अशा तऱ्हेने चिंतन करायचे असते. त्यालाच ध्यान म्हणतात. जर या त्रिमंत्राचे असे ध्यान केले ना, तर फारच उत्तम ध्यान होईल. ॐ नमः शिवाय....
प्रश्नकर्ता : 'ॐ नमः शिवाय'चा अर्थ विस्ताराने सांगा.
दादाश्री : ह्या जगात जे कल्याण स्वरुप झालेले आहेत आणि जे जिवंत आहेत, ज्यांचा अहंकार लोप पावला आहे, त्या सगळ्यांना शिव म्हणतात. शिव नावाचा कोणी मनुष्य नाही. शिव तर स्वतः कल्याण स्वरुपच आहेत. म्हणून जे स्वतः कल्याणस्वरुप झालेले आहेत आणि दुसऱ्यांना कल्याणाचा मार्ग दाखवितात, त्यांना मी नमस्कार करतो.
जे कल्याणस्वरुप झालेले आहेत, ते भले हिंदुस्तानात असो किंवा कोठेही असो त्यांना मी नमस्कार करतो. कल्याणस्वरुप झालेत असे कोणास म्हणता येईल ? ज्यांच्यासाठी मोक्षलक्ष्मी माळ घेऊन तयार आहे. मोक्षलक्ष्मी विवाहासाठी तयार आहे, त्यांना कल्याणस्वरुप झालेत असे म्हणता येईल.
शंकर निळकंठ का ?
आपण शंकाराच्या देवळात जाऊन म्हणतो ना,
'त्रिशूळ असूनही जगतातील विष पिणारा, शंकर पण मीच आणि निळकंठ पण मीच आहे. '