________________
त्रिमंत्र
29
प्रश्नकर्ता : तर मग तीर्थंकरांना मागच्या अवतारात कसे ओळखता येते?
दादाश्री : तीर्थंकर तर सरळसोट असतात. त्यांची लाइनच सरळ असते. त्यांचे दोष होतच नाहीत. त्यांच्या लाइनीत दोष येतच नाहीत आणि दोष आलेच तर कोणत्याही तहेने (ज्ञानाने) पुन्हा मूळ स्थितीस येतात. ती लाइनच वेगळी आहे, परंतु वासुदेव किंवा प्रतिवासुदेव यांच्याबाबतीत तर कित्येक अवतारांच्या आधीपासूनच असे गुण असतात. वासुदेव होणे म्हणजे नराचा नारायण होणे, असे म्हटले जाते. नराचा नारायण म्हणजे कोणत्या फेजमुळे, जसे पाडवा होतो तेव्हापासूनच कळत नाही का, की आता पौर्णिमा होणार आहे. त्याचप्रमाणे कित्येक जन्माआधीच समजून येते की हे वासुदेव होणार आहेत.
कृष्ण किंवा रावण यांच्या विरुद्ध बोलू नये हे जे त्रेसष्ठ शलाका पुरुष म्हणतात ना, त्यांच्यावर भगवंतांनी मोहोर लावली की हे सगळे भगवंत होण्याच्या योग्यतेचे आहेत. म्हणून आम्ही फक्त अरिहंतांना भजले आणि या वासुदेवांना भजले नाही, तर वासुदेव भविष्यात अरिहंत होणारच आहेत. जर वासुदेवांच्या विरुद्ध बोलले तर आपले काय होणार? लोक म्हणातत ना, 'कृष्णास असे झाले आहे, तसे झाले आहे..' अरे, असे बोलू नये. त्यांच्या बाबतीत काहीही बोलू नका. त्यांची गोष्टच निराळी आहे आणि तू जे ऐकून आला आहेस ती गोष्ट निराळी आहे. जोखीमदारी का अंगावर घ्यावी? जे कृष्ण भगवंत येत्या चोवीसीत तीर्थंकर होणार आहेत, जे रावण येत्या चोवीसीत तीर्थंकर होणार आहेत, त्यांच्या विषयी बोलून का जोखीमदारी ओढवून घ्यावी?
त्रेसष्ठ शलाका पुरुष शलाका पुरुष म्हणजे मोक्षास जाण्यास योग्य श्रेष्ठ पुरुष. मोक्षास तर दुसरे लोक सुद्धा जातील परंतु हे श्रेष्ठ पुरुष म्हटले जातात. म्हणून