________________
त्रिमंत्र
जे नराचे नारायण झाले, त्या पदाला वासुदेव म्हणतात. तप-त्याग काहीच नाही. त्यांचे तर मारझोड-भांडणतंटे सगळे काही त्यांच्या प्रतिपक्षीशी होतात. म्हणून तर त्यांच्या प्रतिपक्षाच्या रुपात प्रतिवासुदेव जन्म घेतात, ते प्रतिनारायण म्हटले जातात. त्या दोघांची भांडणे होत राहतात. आणि त्यावेळी नऊ बलदेव सुद्धा असतात. कृष्ण वासुदेव म्हटले जातात आणि बलराम (श्रीकृष्णाचे वडीलबंधू) यांना बलदेव म्हटले जाते. भगवान रामचंद्रांना वासुदेव म्हटले जात नाही, रामचंद्राना बलराम म्हटले जाते. लक्ष्मण वासुदेव म्हटले जातात आणि रावण प्रतिवासुदेव म्हटले जातात. रावण पूज्य आहेत. रावण खास पूजा करण्याच्या योग्य आहेत. लोक त्यांचे पुतळे जाळतात. भयंकर रीतीने जाळतात ना! पहा ना! असे उलटे ज्ञान जेथे पसरले आहे, त्या देशाचे कसे भले होईल? रावणाचे पुतळे जाळू नये.
या काळाचे वासुदेव कोण? तर कृष्ण भगवंत, त्यामुळे हे नमस्कार कृष्ण भगवंतांना पोहोचतात. त्यांचे जे शासनदेव असतील, त्यांना पोहोचतात!
वासुदेव पद, अलौकिक वासुदेव तर कसे असतात? त्यांच्या एका डोळ्यानेच लाखो लोक घाबरतील असे तर वासुदेवांचे डोळे असतात. त्यांचे डोळे पाहूनच घाबरतात. वासुदेव पदाचे बीज कधी पडेल? वासुदेव होणार असतील तर कितीतरी जन्माआधी त्यांचा प्रभाव असतो. वासुदेव जेव्हा चालतात तेव्हा धरणीमाता कापते ! हो, धरणीखालून आवाज येतो. अर्थात् ते बीजच निराळ्या त-हेचे असते. त्यांच्या उपस्थितीनेच लोक इकडे-तिकडे होऊन जातात. त्यांची गोष्टच निराळी आहे. वासुदेव तर मुळात जन्मापासून ओळखले जातात की ते वासुदेव होणार आहेत. कित्येक अवतारानंतर वासुदेव अवतरणार असतील, त्यांचे संकेत आजपासूनच मिळण्यास सुरुवात होते. तीर्थंकर ओळखू येत नाहीत, परंतु वासुदेव ओळखता येतात, कारण त्यांची लक्षणेच निराळ्या त-हेची असतात. प्रतिवासुदेव सुद्धा असेच असतात.