________________
त्रिमंत्र
व्यवस्थितमध्ये असेल तरच जपले जाईल प्रश्नकर्ता : आपण म्हणता की त्रिमंत्र आमच्या साऱ्या अडचणी दर करतो, आपण हेही म्हणता की सर्व 'व्यवस्थित'च आहे, तर मग त्रिमंत्रामध्ये शक्ती कोठून आली?
दादाश्री : व्यवस्थित म्हणजे काय की जर अडचण दूर होणार नसेल तर तोपर्यंत आमच्याकडून त्रिमंत्र बोलले जात नाहीत, अशा प्रकारे 'व्यवस्थित शक्ती' आहे, असे समजावे?
प्रश्नकर्ता : परंतु त्रिमंत्र म्हटल्यावर सुद्धा अडचण दूर झाली नाही, तर काय समजावे?
दादाश्री : ती अडचण किती मोठी होती आणि किती कमी झाली, ते तुम्हाला कळत नाही परंतु आम्हाला ते कळते.
नवकार म्हणजे नमस्कार प्रश्नकर्ता : काही लोक 'नमो लोए सव्वसाहूणं' पर्यंतच म्हणतात आणि काही लोक 'एसो पंच नमुक्कारो' आणि शेवटपर्यंत म्हणतात. दोन्ही पैकी खरे कोणते?
दादाश्री : 'एसो पंच नमुक्कारो'च्या मागची चार वाक्ये नाही म्हटली तरी चालेल. मंत्र तर पाचच आहेत आणि पाठीमागची चार वाक्ये तर त्याचे महात्म्य समजावण्यासाठी लिहीली गेली आहेत.
प्रश्नकर्ता : नव(नऊ) पदांच्या हिशोबाने हा नवकार मंत्र म्हटला जातो ना?
दादाश्री : नाही, नाही, असे नाही. ही नऊ पदे नाहीत. हा नमस्कार मंत्र आहे, त्याच्या ऐवजी नवकार झाला. हा मूळ शब्द 'नमस्कार मंत्र आहे, त्याच्या ऐवजी मागधि भाषेत नवकार' म्हणतात. म्हणून नमस्कारलाच नवकार बोलतात. अर्थात नऊ पदांशी त्याचे देणेघेणे नाही. हे पाचच नमस्कार आहेत.