________________
त्रिमंत्र
'सव्व पावप्पपणासणो' अर्थात् हे सर्व पापांचा नाश करणारे आहे. ते म्हटल्यामुळे सर्व पाप भस्मीभूत होतात.
'मंगलाणं च सव्वेसिं' अर्थात् सर्व मंगलांमध्ये...
'पढमं हवई मंगलम्' म्हणजे हे प्रथम मंगल आहे. ह्या दुनियेत जे सर्व मंगल आहेत, त्या सर्वात सर्व प्रथम मंगल हे आहे, सर्वात मोठे मंगल हे आहे, असे सांगू इच्छितात.
बोला आता, हे आपण सोडायला पाहिजे का? पक्षपातासाठी सोडून द्यायला पाहिजे? भगवंत निष्पक्षपाती असतील की पक्षपाती असतील?
प्रश्नकर्ता : निष्पक्षपाती.
दादाश्री : तेव्हा मग जसे भगवंतांनी सांगितले, तसेच त्यांच्या निष्पक्षपाती मंत्राना भजा.
त्रिमंत्रानी हलके होते भोगणे प्रश्नकर्ता : त्रिमंत्रात सव्व पावप्पणासणो येते, ते साऱ्या पापांचा नाश करणारे आहे, तर ते भोगल्याशिवायच नष्ट होतात का?
दादाश्री : भोग तर येणारच. असे आहे ना, तुम्ही येथे माझ्याजवळ चार दिवस राहिले असाल तर तुम्हाला कर्म तर भोगावेच लागणार परंतु ते भोग माझ्या हजेरीत हलके होऊन जातील. तसेच त्रिमंत्राच्या हजेरीमुळे भोगण्यात बराच फरक पडतो. मग तुमच्यावर त्याचा जास्त परिणाम होणार नाही.
आता एका माणसास ज्याला ज्ञान नाही, त्याला चार दिवसासाठी तुरुंगात टाकले तर त्याला किती घुसमट होईल? आणि ज्ञान असलेल्याला तुरुंगात टाकले, तर? त्याचे कारण हेच की भोग तर तेच आहे पण त्या भोगाचा आत परिणाम होत नाही.