________________
त्रिमंत्र
प्रश्नकर्ता : क्लेश नाही थांबले.
दादाश्री : क्लेश चालूच आहेत? क्लेश बंद झाले नसतील तर समजावे की आतापर्यंत हा नवकार मंत्र चांगल्या त-हेने समजून बोलत नाहीत.
हा जो नवकार मंत्र आहे, तो बोलल्याने ॐ (पंच परमेष्टि) खुश होतात, भगवंत खुश होतात. फक्त ॐ बोलण्याने कधी ॐ खुश होत नाहीत. अतः हा नवकार मंत्र सुद्धा म्हणा! हा नवकार मंत्र तेच ॐ आहे! या सर्वांच्या संक्षिप्तरुपात हा ॐ शब्द ठेवला आहे. करणाऱ्यांनी लोकांच्या हितासाठीच असे केले आहे, परंतु लोकांना हे समजत नसल्यामुळे सगळे उलटेच झाले.
ते पोहोचते अक्रमच्या महात्म्यांना भगवंतांनी ॐ स्वरुप कोणाला म्हटले आहे ?
ज्याला मी येथे ज्ञान देतो ना, तो त्या दिवसापासूनच 'मी शुद्धात्मा आहे' बोलायला लागतो, तेव्हापासून तो साधू झाला, शुद्धात्म दशा साधतो तो साधू. म्हणून आपले हे महात्मा, जेवढ्यांना मी हे ज्ञान दिले आहे, त्यांना हा नवकार पोहोचतो. हो, लोक नवकार मंत्र म्हणतात ना, त्याची जबाबदारी तुमच्या (ज्ञान प्राप्त महात्म्यांच्या) डोक्यावर येते, कारण तुम्ही सुद्धा नवकारात आलात. आत्मदशा साधेल तो साधू.
त्यानंतर हळूहळू थोडे-थोडे तुम्ही स्वतः समजत गेले आणि थोडे-थोडे दुसऱ्यांना समजावू शकाल, असे झाले अर्थात तुम्ही तर साधुच्याही पुढे गेलात. तेव्हापासून उपाध्याय व्हायला लागले. आणि आर्चापद तर या काळात लवकर मिळेल असे नाही! आम्ही गेल्यानंतर निघेल ती गोष्ट वेगळी आहे.
- नवकाराचे महात्म्य 'एसो पंच नमुक्कारो' अर्थात् हे जे वरती सांगितले, त्या पाचांना नमस्कार करतो.