Book Title: Trimantra Marathi
Author(s): Dada Bhagwan
Publisher: Dada Bhagwan Aradhana Trust

View full book text
Previous | Next

Page 32
________________ त्रिमंत्र शकते. आत्मदशा साधणारा मनुष्य फक्त साधकच असतो, बाधक नसतो. साधू नेहमी साधक असतात आणि सध्याच्या काळातील जे साधू आहेत ते दुषमकाळाच्या प्रभावामुळे साधक नाहीत, ते साधक-बाधक आहेत. साधक-बाधक म्हणजे बायको मुलांना सोडून, तप-त्याग वगैरे करतात. आज सामायिक प्रतिक्रमण करुन शंभर रुपये मिळवतात परंतु शिष्यासोबत बेबनाव झाल्यावर त्याच्यावर उग्र होतात, त्यामुळे मग दिडशे रुपये गमाऊन बसतात. म्हणून ते बाधक आहे. आणि खरा साधू कधीच बाधक होत नाही, साधकच असतो. जितके साधक असतात ना, तेच सिद्ध दशा प्राप्त करु शकतात! आणि हे तर बाधक आहे, त्यांना छेडल्याबरोबरच चिडून जाण्यास वेळ लागत नाही ना, अर्थात् ते साधू नाही, पण त्यागी म्हटले जातात. आजच्या काळानुसार त्यांना साधू म्हणता येईल. बाकी आता तर साधूत्यागींचा क्रोध उघडपणे दिसून येतो ना! अरे! ऐकू सुद्धा येतो, जो क्रोध ऐकू येत असेल तो क्रोध मग कसा असेल? प्रश्नकर्ता : अनंतानुबंधी? दादाश्री : हो. जो क्रोध दुसऱ्यास भयभीत करेल, आम्हांस ऐकू (पाहू) येईल, तो अनंतानुबंधी म्हटला जातो. ॐ चे स्वरुप प्रश्नकर्ता : ॐ, हा नवकार मंत्राचे छोटे रुप आहे? दादाश्री : हो, समजून ॐ बोलण्याने धर्मध्यान होते. प्रश्नकर्ता : नवकार मंत्राच्या एवजी ॐ, एवढेच म्हटले तर चालेल का? दादाश्री : हो, परंतु ते समजून बोलतात तर! हे लोक बोलतात ते अर्थहीन असते, खरा नवकार मंत्र म्हटल्यावर घरातील क्लेश होणे थांबते, आता घरोघरी क्लेश होणे बंद झाले आहेत ना!

Loading...

Page Navigation
1 ... 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 41 42 43 44 45 46 47 48 49 50 51 52 53 54 55 56 57 58