________________
त्रिमंत्र
ॐ नमो भगवते वासुदेवाय.... प्रश्नकर्ता : मग 'ॐ नमो भगवते वासुदेवाय' समजावून सांगा.
दादाश्री : वासुदेव भगवंत! म्हणजे जे वासुदेव भगवंत नरमधून नारायण झाले, त्यांना मी नमस्कार करीत आहे. जेव्हा ते नारायण होतात, तेव्हा त्यांना वासुदेव म्हणतात.
प्रश्नकर्ता : श्रीकृष्ण, महावीर स्वामी हे सगळे कोण आहेत?
दादाश्री : ते सगळे तर भगवंत आहेत, ते देहधारी रुपात भगवंत म्हटले जातात, त्यांना भगवंत का म्हटले जाते की त्यांच्या आत संपूर्ण भगवंत प्रकट झाले आहेत. म्हणून आम्ही त्यांना देहासहित भगवंत म्हणतो.
__ आणि जे महावीर भगवंत झाले, ऋषभदेव भगवंत झाले ते पूर्ण भगवंत म्हटले जातात. कृष्ण भगवंतांना तर वासुदेव भगवंत म्हटले जाते, त्यात काही शंका नाही ना? वासुदेव म्हणजे नारायण, नराचे जे नारायण झाले, असे भगवंत प्रकट झाले. त्यांना आम्ही भगवंत म्हणतो. ___वासुदेवांची गणना भगवंतांमध्ये होते. शिवांची गणना भगवंतांमध्ये होते आणि सच्चिदानंद, ते सुद्धा भगवंतांमध्येच धरले जातात आणि हे पाच परमेष्टिसुद्धा भगवंतांमध्येच धरले जातात, कारण ते खरेखुरे साधक असतात, ते सर्व भगवंतांमध्येच धरले जातात, परंतु पंच परमेष्टी हे कार्यभगवंत म्हटले जातात, जेव्हा की वासुदेव आणि शिव हे कारण-भगवंत म्हटले जातात. ते कार्य-भगवंत होण्याच्या कारणांचे सेवन करीत आहेत.
नराचा नारायण!
प्रश्नकर्ता : 'ॐ नमो भगवते वासुदेवाय' याचे विशेष स्पष्टीकरण
करा.
दादाश्री : हे श्रीकृष्ण भगवंत वासुदेव आहेत, ऋषभदेव भगवंतांच्या काळापासून आजपर्यंत असे नऊ वासुदेव झाले आहेत. वासुदेव म्हणजे