________________
त्रिमंत्र
ते ख्यातिसहीत आहेत. संपूर्ण ख्यातनाम होऊन मोक्षास जातात. हो, त्यामध्ये चोवीस तीर्थंकर असतात, बारा चक्रवर्ती असतात, नऊ वासुदेव असतात, नऊ प्रति-वासुदेव असतात आणि नऊ बलदेव असतात. बलदेव वासुदेवांचे मोठे भाऊ! ते नेहमी सोबतच असतात. ही नॅचरल अॅडजेस्टमेन्ट आहे. त्यात फरक होत नाही. नॅचरलमध्ये कधीच फेरफार होत नाही. जसे की पाण्यासाठी 2H आणि O च पाहिजे, त्यासारखीच गोष्ट आहे ही!
ही सायन्टिफिक वस्तू आहे. नाहीतर त्रेसष्ठ हा माझा शब्द नाही, त्रेसष्ठच्या ऐवजी चोसष्ठ सुद्धा ठेवला असता; परंतु ही निसर्गाची रचना किती सुंदर व व्यवस्थित आहे.
बोलतेवेळी उपयोग... आम्ही ॐ नमो भगवते वासुदेवाय बोलू, तेव्हा कृष्ण भगवंत सुद्धा दिसतील आणि शब्द बोलू आम्ही. आता कृष्ण भगवंत, जे भलेही आपल्या दर्शनात आलेले असतील, त्यांचे कोणतेही चित्र डोळ्यांसमोर उमटले असेल, मग ते मुरलीवाले असोत किंवा दुसऱ्या कुठल्या रुपात असोत पण या उच्चाराबरोबर लगेच ते दिसले पाहिजेत, बोलताक्षणीच दिसले पाहिजेत. बोलते वेळी दिसले नाही, तर त्याचा अर्थच काय?
फक्त नाव घेतले तर फक्त नाव घेण्याचे फळ मिळेल, परंतु त्याबरोबर त्यांची मूर्ती दिसली, तर दोघांचेही फळ मिळेल. नाव आणि स्थापना असे दुहेरी फळ मिळाले तर फार झाले.
प्रश्नकर्ता : 'नमो अरिहंताणं'चा जप करतेवेळी मनात कोणत्या रंगाचे चिंतन केले पाहिजे?
दादाश्री : 'नमो अरिहंताणं'चा जप करताना कोणत्याही रंगाचे चिंतन करण्याची काहीच आवश्यकता नाही. आणि जर चिंतन करायचे असेल तर डोळे मिळून न..मो..अ..रि..हं..ता..णं असे एक एक शब्द नजरेसमोर यायला हवेत. त्यामुळे पुष्कळ चांगले फळ प्राप्त होते, तुम्ही