________________
38
त्रिमंत्र
त्रिमंत्राचे रहस्य हे आहे की तुमच्या सर्व संसारीक अडचणींचा नाश होतो. आपण रोज सकाळी बोललात तर संसारातील साऱ्या अडचणी दूर होतात. आपणास (त्रिमंत्र) बोलण्यासाठी पुस्तक पाहिजे असेल तर एक पुस्तक देतो, त्यात हा त्रिमंत्र लिहीला आहे, ते पुस्तक येथून घेऊन जा.
प्रश्नकर्ता : या त्रिमंत्रामुळे चक्र शीघ्रतेने चालतील?
दादाश्री : त्रिमंत्र बोलण्याने दुसरी नवी पापं बांधली जात नाहीत, इकडे-तिकडे उलट्या मार्गावर भटकणे होत नाही आणि जुनी कर्म पुरी होतात.
हा त्रिमंत्र तर असा आहे ना की समजल्याशिवाय बोलला तरी फायदा होतो आणि समजून-उमजून बोलला तरी फायदा होतो, परंतु समजून बोलणाऱ्याला अधिक फायदा होतो आणि न समजणाऱ्याला तोंडाने बोलण्या इताकाच फायदा होतो. एक मात्र हे टेपरेकॉर्ड (मशीन) बोलते ना, त्यास फायदा होत नाही, पण ज्याच्यात आत्मा आहे, तो बोलला तर त्यास फायदा होईलच.
हे जग शब्दानीच उत्पन्न झाले आहे. उत्तम व्यक्तिचे शब्द बोलण्याने तुमचे कल्याण होईल अणि वाईट व्यक्तिचे बोलण्याने उलटे होईल. म्हणून हे सर्व समजले पाहिजे.
लक्ष्य तर असावे मोक्षाचेच काही विचारायचे असेल विचारा, हं. येथे सगळे काही विचारु शकता, मोक्षाला जायचे आहे ना? मोक्षाला जाता येईल, असे सर्वकाही येथे विचारु शकता, जर विचारायचेच असेल तर. मनाचे समाधान झाले तर मोक्षाला जाता येईल ना? नाहीतर मोक्षाला कसे जाता येईल? भगवंताची शास्त्रे तर आहेत सर्व, पण शास्त्र समजली पाहिजे ना? अनुभवी ज्ञानीपुरुषाशिवाय ते समजणारही नाही आणि उलट चुकीच्या मार्गावर चालू लागेल.