________________
त्रिमंत्र
(किंवा) एक सुद्धा नसेल. असे साधू दुसऱ्या क्षेत्रात आहेत. ते दुसऱ्या जागी आहेत, म्हणजे आपला नमस्कार तेथे पोहोचतो आणि तेव्हाच आपणास फळ मिळते.
लोकांनी जेवढे ठरविले आहे तेवढेच ब्रम्हांड नाही, ब्रम्हांड फार मोठे आहे, विशाल आहे, त्या सर्व साधूंना मी नमस्कार करतो. __ प्रश्नकर्ता : लोए म्हणजे काय?
दादाश्री : नमो लोए सव्वसाहूणं. लोए म्हणजे लोक, या लोकाशिवाय दुसरा अलोक आहे; तेथे काहीच नाही. अर्थात लोकात जे सर्व साधु आहेत त्यांना मी नमस्कार करतो.
प्रश्नकर्ता : म्हणजे आत्मदशा साधल्यावर आत्मज्ञान होते का? दादाश्री : हो.
प्रश्नकर्ता : आणि आत्मदशा साधल्यावर आत्म्याचा अनुभव येतो का?
दादाश्री : तो आत्मदशा साधतो म्हणजे अनुभवच्या दिशेत वेगाने धावतो. साधना करतो. साधनेचा अर्थ काय? 'आत्मभावना करत जीव लहे केवळज्ञान रे!' परंतु आत्मभावना त्याला प्राप्त झाली पाहिजे ना? आम्ही येथे जे ज्ञान देतो, त्याने आत्मदशेचीच प्राप्ति करवितो आणि ती प्राप्त केल्यानंतर मग त्याला पुढील दशा प्राप्त होते आणि त्यामध्ये कोणी जस-जसा पुढे जातो त्याला उपाध्याय दशा प्राप्त होते. येथे या काळात शेवटी कोणत्या पदापर्यंत पोहचू शकतो? तर आचार्यपदापर्यंत जाऊ शकतो. त्यापुढे जाता येत नाही.
प्रश्नकर्ता : आम्ही कसे ठरवू शकतो की हा आत्मदशा साधतो आहे की नाही?
दादाश्री : हो, आम्ही त्याचे बाधक गुण बघितले तर कळू