________________
त्रिमंत्र
करण्यास मनाई केली आहे, भाषा परिवर्तन करु नका, अर्थात त्यांच्या श्रीमुखातून निघालेली वाणी आहे, महावीर भगवंतांच्या मुखातून आणि जेव्हा ती वाणी बोलाल ना, तर ते परमाणुच असे संयोजित होतात की लोकांना आश्चर्य वाटते. परंतु हे तर असे बोलतात की स्वतःला सुद्धा ऐकु येत नाही, तेव्हा फळ सुद्धा तसेच मिळेल ना ! स्वतःला फळाची माहिती पडत नाही. तेव्हा पाचही इंद्रिये ऐकतील असे बोलण्यामुळे खरे फळ प्राप्त होते. हो, डोळे सुद्धा पाहत राहतात, कान सुद्धा ऐकत राहतात, नाक सुंघत राहतो...
प्रश्नकर्ता : आपण तर रहस्यमय वाणी बोललात !
21
दादाश्री : हो, नवकार जर असेच बोलत राहिले तर कान ऐकू शकत नाही, कान भुकेलेच राहतात, डोळे भुकेलेच राहतात, फक्त एक जीभच तोंडात फिरत राहते, तेव्हा मग फळ कसे मिळेल ? म्हणजे पाचही इंद्रिये जेव्हा प्रसन्न होतील, तेव्हाच नवकार मंत्र फलित झाला असे म्हणता येईल. मंत्र म्हणतात खरे, परंतु कान ऐकतील, डोळे पाहतील, नाक सुगंध अनुभवेल, त्या वेळी त्वचेस त्याचा स्पर्श व्हावा, असे सगळे झाले पाहिजे! त्यासाठीच आम्ही हा त्रिमंत्र मोठ्याने बोलवतो ना.
केवळ साधक, नाही बाधक
जे आत्मदशा साधण्यासाठी साधना करतात, ते साधू, परंतु संसाराच्या आवडीसाठी जे साधना करतात, ते साधू नाहीत. आवडीसाठी, मानासाठी, किर्ती मिळविण्यासाठी केल्या जाणाऱ्या साधना वेगळ्या आहेत. आत्म्यासाठी केलेल्या साधनेत हे सगळे नसते. अशा सर्व साधुंना मी नमस्कार करतो. बाकीच्या सर्वांना साधू म्हणता येणार नाही...
जो आत्मदशा साधतो, त्याला साधू म्हटले जाते, त्या सगळ्यांना मी नमस्कार करतो. बाकी सगळ्यांना साधू म्हटले जात नाही. देहावस्था, देहाच्या रुबाबासाठी, देहाच्या सुखाची इच्छा ठेवतात, परंतु हे सर्व चालत नाही ना. हिन्दुस्तानात क्वचित एखादा असा संत असेल.