Book Title: Trimantra Marathi
Author(s): Dada Bhagwan
Publisher: Dada Bhagwan Aradhana Trust

View full book text
Previous | Next

Page 28
________________ त्रिमंत्र लोभ नष्ट होतात, त्यांचा कमकुवतपणा जातो. अपमान केल्यावर फणा काढत नाही. हे तर अपमान केल्यावर फणा काढतात ना? ते फणा काढणारे चालणार नाहीत तिथे. प्रश्नकर्ता : आपण असे म्हटले की, उपाध्याय जाणतात, पण ते काय जाणतात? दादाश्री : उपाध्याय म्हणजे जे आत्म्यास जाणतात, कर्तव्य जाणतात आणि आचार सुद्धा जाणतात. पण तरी त्यांच्यात काही आचार असतात आणि काही आचार यायचे बाकी असतात. संपूर्ण आचार प्राप्त न झाल्यामुळे ते उपाध्याय पदामध्ये आहेत, म्हणजे स्वतः काही शिकत असतात आणि दुसऱ्यांना पण शिकवतात. प्रश्नकर्ता : म्हणजेच, आचारांमध्ये पूर्णता आलेली नसते? दादाश्री : हो, उपाध्यायांमध्ये आचारांची पूर्णता नसते. आचार पूर्णतेनंतरच आचार्य म्हटले जातात. प्रश्नकर्ता : अर्थात उपाध्याय पण आत्मज्ञानी असावेत? दादाश्री : आत्मज्ञानी नाही, आत्मप्रतीतिवाले आणि प्रतीतिची डीग्री जरा उंच असते, प्रतीति! आणि पुढे ? ___ नमो लोए सव्वसाहूणं..... प्रश्नकर्ता : 'नमो लोए सव्वसाहूणं.' दादाश्री : 'लोए' म्हणजे लोक, तर या लोकात जेवढे साधु आहेत त्या सर्व साधुंना मी नमस्कार करतो. साधु कोणास म्हणतात? तर जे पांढरे शुभ्र कपडे घालतात, भगवे कपडे घालतात त्यांना साधू म्हणता येणार नाही. ज्यांनी आत्मदशा साधली (प्राप्त केली) ते साधू. अर्थात ज्यांना अजिबात देहाध्यास नाही, संसारदशा-भौतिकदशा नाही, परंतु आत्मदशा साधली अशा साधुंना मी नमस्कार करतो. आता असे

Loading...

Page Navigation
1 ... 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 41 42 43 44 45 46 47 48 49 50 51 52 53 54 55 56 57 58