________________
त्रिमंत्र
थोडेतरी मोक्षाकडे वाटचाल करा.' तीर्थंकर तर एकच स्पष्ट वाक्य बोलतात की 'चारी गती अत्यंत दुःखदायी आहेत. म्हणून हे माणसा, इथून मोक्षास जाण्याचे साधन प्राप्त होईल, असे तुम्हास मनुष्यपण प्राप्त झाले आहे, म्हणून मोक्षास जाण्याची कामना करा,' इतकेच बोलतात. तीर्थंकर आपल्या देशनेत बोलतात.
18
ह्या काळात येथे तीर्थंकर नाहीत आणि सिद्ध भगवंत तर आपल्या देशात (सिद्धक्षेत्रात) च राहतात. म्हणून सध्या तीर्थंकरांचे प्रतिनिधी म्हणून आम्ही आहोत, हो, ते नाहीत, म्हणून सर्व सत्ता आमच्या हातात आहे. कोणासही विचारल्याशिवाय आम्ही त्याचा उपयोग निवांतपणे करीत आहोत. पण आम्ही तीर्थंकरांना आमच्या माथी ठेवतो. त्यांना येथे बसवले आहेत ना !
उपाध्यायांमध्ये विचार आणि उच्चार असे दोनच असतात आणि आचार्यांमध्ये विचार, उच्चार आणि आचार असे तीन असतात. त्यांच्यात या तीघांची पूर्णाहुती झालेली असते, म्हणून ते आचार्य भगवंत ! म्हटले
जातात.
नमो उवज्झायाणं
प्रश्नकर्ता : 'नमो उवज्झायाणं' सविस्तर समजावून सांगा.
दादाश्री : उपाध्याय भगवंत! याचा अर्थ काय होतो ? ज्यांना आत्म्याची प्राप्ति झाली आहे आणि जे स्वतः आत्म्याला जाणल्यानंतर सर्व शास्त्रांचा अभ्यास करतात आणि दुसऱ्यांकडून अभ्यास करवून घेतात, अशा उपाध्याय भगवंतांना मी नमस्कार करतो. उपाध्याय म्हणजे स्वतः सर्व समजतात जरुर, तरी पण त्यांच्या आचरणात संपूर्णपणे आलेले नसते. ते मग वैष्णवांचे असतील, जैनांचे असतील किंवा कोणत्याही धर्माचे असतील पण त्यांनी आत्मा प्राप्त केलेला असतो. आजचे हे जे सर्व साधू आहेत ते सर्व यांच्या पंक्तीत बसत नाहीत, कारण त्यांनी आत्म्याची प्राप्ति केलेली नाही. आत्म्याच्या प्राप्तिनंतर क्रोध - मान-माया