________________
16
त्रिमंत्र
परंतु त्याने जर सिंहास पाहिले तर पाहताचक्षणीच मासाची उलटी करुन टाकेल! असाच आचार्य महाराजांचा प्रताप असतो. हो, कुणी जास्त पाप केले असेल, तर तो त्यांच्यासमोर आपल्या पापांची उलटी करुन टाकतो. तीर्थंकर सुद्धा म्हणतात की, 'मी त्यांच्यामुळेच इथवर आलो आहे' म्हणून आचार्य भगवंत तर पुष्कळ मोठे गुणधाम समजले जातात !
हे पाच नवकार (नमस्कार) सर्वश्रेष्ठ पद आहे. त्यात पण आचार्य महाराजांची प्रशंसा तर तीर्थंकरांना सुद्धा करावी लागते. कारण ते तीर्थंकर कसे झाले? तर (त्यांच्यावेळी असणाऱ्या) आचार्य महाराजांच्या प्रतापामुळेच!
गणधर पार करतील बुद्धीचे स्तर प्रश्नकर्ता : तर हे जे भगवंताचे गणधर असतात, ते सुद्धा आचार्यांच्या कक्षेत येतात?
दादाश्री : हो. आचार्य पदामध्येच येतात, कारण भगवंतांच्या खालचे दुसरे काणतेच पद नाही. गणधर नाव का पडले? कारण त्यांनी बुद्धिचे पूर्ण भेदन केले आहे. आणि आचार्य महाराज तसे असतीलही किंवा नसतीलही. परंतु गणधरांनी तर बुद्धिचे सर्व स्तर पार केलेले असतात.
तो स्तर आम्ही पार केला आहे. एक चंद्राचा स्तर म्हणजे मनाचा स्तर आणि दूसरा सूर्याचा स्तर म्हणजे बुद्धीचा स्तर, या सूर्य चंद्रांचे ज्याने भेदन केले आहे असे गणधर भगवंत, तरी सुद्धा ते तीर्थंकरांच्या आदेशात राहतात. आम्ही सुद्धा सूर्य-चंद्रांचे भेदन केले आहे.
बर्फासारखा ताप आचार्यांचे संपूर्ण शास्त्र कंठस्थ असते आणि त्यांनी सर्वकाही धारण केलेले असते. जेव्हा की उपाध्याय स्वतः शिकतात आणि शिकवतात. आता ते अभ्यास करत असतात पण त्यांना आत्मप्राप्ती झालेली असते, म्हणजेच सम्यक्त्व प्राप्त केलेले असते. हे उपाध्याय थोडे जास्त शिकलेले