________________
14
त्रिमंत्र
आचार्य भगवंत कोण? हे जे दिसतात, लौकिक धर्माचे आचार्य, ते नाहीत. ज्यांना कुठल्याही प्रकारच्या (भौतिक) सुखांची इच्छा नाही आणि फक्त स्वतःच्या आत्मसुखासाठीच आचार पाळतात. आयरियाणं म्हणजेच ज्यांना आत्मा जाणल्यानंतर आचार्यपणा (अर्थात जे स्वतः आचारांचे पालन करतात व दुसऱ्यांकडून आचार पाळून घेतात,) आहे अशा आचार्य भगवंतांना मी नमस्कार करीत आहे. त्यात काही हरकत आहे का? तुम्हाला यात काही अडचण वाटते का? मग भले कोणीही असो, कोणत्याही जातीचा असो, परंतु ज्यांना आत्मज्ञान झाले आहे, अशा आचार्यांना मी नमस्कार करीत आहे.
आताच्या काळात असे आचार्य या जगात सर्व ठिकाणी उपस्थित नाहीत, पण काही ठिकाणी आहेत, परंतु असे आचार्य या इथे नाहीत. आपल्या भूमिवर नाहीत पण दुसऱ्या भूमिवर आहेत, म्हणून हा नमस्कार ते (आचार्य) जेथे असतील तेथे पहोचतो आणि स्वत:ला त्याचे फळ लगेचच मिळते.
प्रश्नकर्ता : ह्या आचार्यांमध्ये शक्ती नव्हती का? आचार्यपद केव्हा प्राप्त होते?
दादाश्री : हे आचार्यपद जे आहे ते महावीर भगवानानंतर एक हजार वर्षांपर्यंत ठीक चालले, आणि त्यानंतरचे जे आचार्यपद आहे ते लौकिक आचार्यपद आहे, नंतर अलौकिक आचार्य झालेच नाहीत.
प्रश्नकर्ता : मी अलौकिक आचार्यांची गोष्ट करीत आहे.
दादाश्री : अलौकिक तर झालेच नाहीत, अलौकिक आचार्यांना तर भगवंत म्हणतात.
प्रश्नकर्ता : तर कुंदकुंदाचार्य....?
दादाश्री : कुंदकुंदाचार्य झाले परंतु ते महावीर भगवानांच्या नंतर सहाशे वर्षांनंतर झाले होते. कुंदकुंदाचार्य तर पूर्ण पुरुष होते. आणि हे तर मी सांगतो की, शेवटच्या पंधराशे वर्षांत आचार्य झालेच नाहीत.