________________
त्रिमंत्र
साधु कोठे भेटतील? असे साधु असतात का आता? परंतु या ब्रम्हांडात जेथे जेथेही असे साधू आहेत, त्यांना मी नमस्कार करतो.
संसारी अवस्थेपासून मुक्त होऊन आत्मदशा प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करतात, आत्मदशा साध्य करतात, अशा सर्वांना मी नमस्कार करतो. बाकी योग आदी जे सगळे काही करतात त्या साऱ्या संसारी दशा आहेत. आत्मदशा, हीच अस्सल वस्तू आहे. कोणकोणते योग संसार दशेत आहे? तर म्हणतात, एक आहे देहयोग, ज्यामध्ये आसने आदी करावी लागतात त्यास देहयोग म्हणतात. मग दुसरा मनोयोग, येथे चक्रांवर स्थिरता ठेवणे हा मनोयोग म्हटला जातो. आणि जपयोग करणे, तो वाणीचा योग म्हटला जातो. हे तीन्ही स्थूळ शब्द आहेत आणि त्याचे फळ, संसार फळच मिळते. म्हणजेच येथे बंगला मिळेल, गाड्या मिळतील. आणि आत्मयोग साधल्यावर मुक्ती मिळते, सर्व प्रकारचे सुख प्राप्त होतात. तोच अंतिम, मोठा योग म्हटला जातो. सव्वसाहूणं म्हणजे ज्यांनी आत्मयोग साधला आहे अशा सर्व साधूंना मी नमस्कार करतो.
महणजे साधू कोण? तर ज्यांना आत्म्याची प्रतीति झाली आहे, त्यांची गणना आम्ही साधुंमध्ये केली. अर्थात या साहूणंना प्रथम प्रतीति
आणि उपाध्यायांना प्रतीति, पण विशेष प्रतीति आणि आचार्यांना आत्मज्ञान झालेले असते. आणि अरिहंत भगवंत, ते पूर्ण भगवंत! अशा रीतीने नमस्कार केले आहेत.
पाचही इंद्रिये ऐकतील तेव्हा प्रश्नकर्ता : भगवंतानी नवकाराच्या पाच पदांची रचना केली आहे, त्यामध्ये पहिले चार तर बरोबर आहेत; परंतु पाचव्यामध्ये नमो लोए सव्वसाहूणंच्या ऐवजी सव्वसाहूणं का नाही ठेवले?
दादाश्री : तर पत्र लिहा ना आपण! त्याचे असे आहे, त्यांनी जसे म्हटले आहे तसेच, काना मात्रासहित बोलण्यास सांगितले आहे, कारण ती त्यांच्या श्रीमुखातून निघालेली वाणी आहे, त्याचा गुजराती अनुवाद