________________
त्रिमंत्र
अरिहंत म्हणताच येणार नाही. अरिहंत देहधारी आणि नामधारी, नामासहित असतात.
प्रश्नकर्ता : अरिहंत भगवंत हा शब्द प्रयोग चोवीस तीर्थकरांना संबोधून केला आहे का?
दादाश्री : नाही, वर्तमान तीर्थंकरच अरिहंत भगवंत म्हटले जातात. महावीर भगवान तर मोक्षपदी विराजमान आहेत. तसे तर लोक म्हणतात की, 'आमचे चोवीस तीर्थंकर' (च अरिहंत आहेत) आणि एकीकडे वाचतात की 'नमो अरिहंताणं, नमो सिद्धाणं' मग मी त्यांना म्हणतो की, 'हे दोन आहेत?' तर ते म्हणतात की, 'हो, दोन आहेत' मग मी म्हणतो, 'अरिहंत दाखवा बघू.' तर ते म्हणतात की, 'हे चोवीस तीर्थंकरच अरिहंत आहेत.' अहो, पण ते तर सिद्ध झाले आहेत. ते आता सिद्धक्षेत्रात आहेत. आणि तुम्ही तर सिद्धास अरिहंत म्हणून ओळखता? अरिहंत कोणास म्हणतात हे लोक?
प्रश्नकर्ता : ते सर्व चोवीस तीर्थंकर तर सिद्ध झाले आहेत.
दादाश्री : मग तुम्ही या लोकांना असे म्हणत नाही की भाऊ, जे सिद्ध झाले आहेत त्यांना तुम्ही अरिहंत म्हणून का म्हणता? हे तर दुसऱ्या पदी सिद्धाणंमध्ये येतात. अरिहंताचे पद रिकामे राहिले, त्यामुळे ही उपाधी आहे ना! म्हणून आम्ही म्हणतो की, अरिहंतांना स्थापित करा, सीमंधर स्वामींना स्थापित करा, असे का म्हणतो ते आपल्याला समजले का? या चोवीस तीर्थंकरांना सिद्ध म्हणता येईल की अरिहंत? आता त्यांची दशा सिद्ध आहे की अरिहंत आहे?
प्रश्नकर्ता : आता ते सिद्ध (गतीमध्ये) आहेत.
दादाश्री : सिद्ध आहेत ना? तुमचा विश्वास आहे ना? शंभर टक्के आहे ना?
प्रश्नकर्ता : हो. शंभर टक्के.