Book Title: Trimantra Marathi
Author(s): Dada Bhagwan
Publisher: Dada Bhagwan Aradhana Trust

View full book text
Previous | Next

Page 15
________________ त्रिमंत्र मंगलाणं च सव्वेसिं, पढमं हवई मंगलम् ॥१॥ ॐ नमो भगवते वासुदेवाय ॥२॥ ॐ नमः शिवाय ॥३॥ जय सच्चिदानंद आता जर हा नवकार मंत्राचा अर्थ तुम्हाला समजावून सांगितला तर तुम्हीच म्हणाल की हा तर आमचा मंत्र आहे. जर त्याचा अर्थ तुम्हाला कळला तर तुम्ही त्यास सोडणारच नाही. हे तर तुम्ही असेच मानता की हा शिव मंत्र आहे किंवा हा वैष्णवांचा मंत्र आहे, पण त्याचा अर्थ समजण्याची गरज आहे. मी त्याचा अर्थ आपणास समजाऊन सांगेन, मग तुम्ही असे म्हणणारच नाही. नमो अरिहंताणं... प्रश्नकर्ता : 'नमो अरिहंताणं' म्हणजे काय? याचा अर्थ विस्तारपूर्वक सांगा. दादाश्री : 'नमो अरिहंताणं' अरि म्हणजे शत्रु आणि हंताणं म्हणजे ज्यांनी त्याचे हनन केले आहे, अशा अरिहंत भगवंतांना नमस्कार करीत आहे. ___ज्यांनी क्रोध-मान-माया-लोभ-राग-द्वेषरुपी सर्व शत्रुचा नाश केला आहे, त्यांना अरिहंत म्हणतात. शत्रुचा नाश केला तेव्हापासून पूर्णाहुति होईपर्यंत अरिहंत म्हटले जातात. ते पूर्णस्वरुप भगवंत आहेत ! ते अरिहंत भगवंत मग कोणत्याही धर्माचे असोत, हिंदु असो की जैन असो की कुठल्याही जातीचे असो, ते ह्या ब्रम्हांडात कोठेही असतील, त्यांना नमस्कार करीत आहे. प्रश्नकर्ता : अरिहंत देहधारी असतात का? दादाश्री : हो देहधारीच असतात. देहधारी नसतील तर त्यांना

Loading...

Page Navigation
1 ... 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 41 42 43 44 45 46 47 48 49 50 51 52 53 54 55 56 57 58