________________
त्रिमंत्र
दादाश्री : त्यासाठीच त्यांना सिद्धाणंमध्ये ठेवले आहे. सिद्धाणंमध्येच पोहोचले. त्यानंतर आता अरिहंताणंमध्ये कोण आहे? अरिहंत म्हणजे प्रत्यक्ष, हजर हवेत, परंतु आता मान्यता उलटी चालू आहे. चोवीस तीर्थंकरांना अरिहंत म्हटले जात आहे, परंतु जर विचार केला तर ते लोक सिद्ध झाले आहेत. त्यामुळे जेव्हा तुम्ही 'नमो सिद्धाणं' असे म्हणता तेव्हा त्यामध्ये ते लोक येऊनच जातात, तेव्हा अरिहंताचा रकाणा बाकी राहतो. म्हणून संपूर्ण नमस्कार मंत्र परिपूर्ण होत नाही. आणि अपूर्ण राहिल्यामुळे फळ प्राप्त होत नाही. म्हणजे सध्या वर्तमान तीर्थंकर असायला हवेत. अर्थात् वर्तमान तीर्थंकर सीमंधर स्वामींना अरिहंत मानले तरच नमस्कार मंत्र पूर्ण होईल. चोवीस तीर्थंकर तर सिद्ध झालेत, ते सर्व 'नमो सिद्धाणं'मध्ये येऊन जातात. जसे कोणी कलेक्टर असेल ते मग गव्हर्नर झाल्यावर आम्ही त्यांना असे म्हटले की, 'कलेक्टर साहेब इकडे या' तर किती वाईट दिसेल, नाही का?
प्रश्नकर्ता : नक्कीच वाईट दिसेल.
दादाश्री : त्याप्रमाणे सिद्धांना जर आपण अरिहंत मानले तर खूपच मोठे नुकसान होते. त्यांचे नुकसान होत नाही, कारण ते वीतराग आहेत; परंतु आपलेच नुकसान होते, जबरदस्त नुकसान होते.
पोहोचते प्रत्यक्ष तीर्थंकरांनाच महावीर भगवान आदी सारे तीर्थंकर आपणांस मोक्ष प्राप्तीसाठी कामी येणार नाहीत, ते तर मोक्षाला गेले आणि आम्ही येथे 'नमो अरिहंताणं' म्हणतो ते त्यांचे संबोधन नाही. त्यांचा संबंध तर 'नमो सिद्धांणं'शी आहे. हे 'नमो अरिहंताणं' जे आपण बोलतो ते कोणास पोहोचते? इतर क्षेत्रात जिथे-जिथे अरिहंत आहेत तेथे त्यांना पोहोचते. महावीर भगवंताना पोहोचत नाही. पत्र नेहमी त्याच्या पत्यावरच पोहोचते. तर लोक काय समजतात की, हे 'नमो अरिहंताणं' बोलण्याने आम्ही महावीर भगवंतांना नमस्कार पोहचवतो. ते चोवीस तीर्थंकर तर मोक्षाला