Book Title: Trimantra Marathi
Author(s): Dada Bhagwan
Publisher: Dada Bhagwan Aradhana Trust

View full book text
Previous | Next

Page 19
________________ त्रिमंत्र जागी वर्तमानात आहेत की नाही? तर म्हणे, 'हो आहेत.' तर ते वर्तमान तीर्थंकर म्हटले जातील. आम्ही जर अरिहंतांस पाहिले नसेल, भगवान महावीरांच्या काळात त्यांना पाहिले नसेल, भगवान महावीर तिकडे (बिहारमध्ये) असतील आणि आम्ही इकडे (गुजरातमध्ये) असू, पण तरी त्यांना अरिहंतच म्हटले जाईल. आम्ही पाहिले नाही तर त्यामुळे काही बिघडत नसते. अर्थात अरिहंतास अरिहंत असे मानले तर त्यामुळे पुष्कळ फळप्राप्ती होते, नाहीतर त्याची (सिद्धास अरिहंत म्हणणे) मेहनत वाया जाते. नवकार मंत्र फलदायी होत नाही, त्याचे हेच कारण आहे. तीर्थंकर कोणास म्हणतात? तीर्थंकर भगवंतांना केवळज्ञान असते, केवळज्ञान तर दुसऱ्यांसही होते, केवळियांनासुद्धा होते, परंतु तीर्थंकर होण्यासाठी तीर्थंकर (गोत्र) कर्माचा उदय व्हावा लागतो. जेथे त्यांची पावले पडतील ते तीर्थक्षेत्र होते. ज्या काळात तीर्थंकर भगवंत असतात ना, तेव्हा संपूर्ण जगात त्यांच्या सारखा पुण्यही कोणाचाच नसतो आणि त्यांच्या सारखे परमाणुही कोणाचे नसतात. त्यांच्या शरीराचे परमाणु, त्यांच्या वाणीचे परमाणु, अरे! स्यादवाद वाणी! ऐकल्याबरोबरच सर्वांची हृदये तृप्त होतात, असे ते तीर्थंकर महाराज! अरिहंत तर पुष्कळ मोठे रुप आहे, साऱ्या ब्रम्हांडात त्याकाळी असे परमाणु कोणाचेच नसतात, सर्व उच्चतम परमाणु फक्त त्यांच्याच शरीरात एकत्र आलेले असतात. तेव्हा त्यांचे शरीर कसे? त्यांची वाणी कशी? त्यांचे रुप कसे? त्या सगळ्या गोष्टींचे तर काय सांगावे! त्यांची तर गोष्टच निराळी ना! अर्थात् त्यांची तुलना करुच नका, त्यांच्या तुलनेत ठेउच नका कुणालाही! तीर्थंकरांची तुलना कोणाबरोबर करताच येणार नाही, अशी ही गजब मूर्ति आहे. चोवीस तीर्थंकर होऊन गेलेत, परंतु त्या सगळ्या गजब मूर्ति!

Loading...

Page Navigation
1 ... 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 41 42 43 44 45 46 47 48 49 50 51 52 53 54 55 56 57 58