________________
त्रिमंत्र
का ?
बंधन राहिले, अघाती कर्मांचे
प्रश्नकर्ता : अरिहंत भगवंत, ही मोक्षाच्या आधीची स्थिती आहे
11
दादाश्री : हो, अरिहंत भगवंत ही मोक्षाच्या आधीची स्थिती. ज्ञानाच्या बाबतीत सिद्ध भगवंतांसारखीच स्थिती आहे, परंतु बंधनाच्या रुपात एवढेच शिल्लक राहिलेले असते, जसे दोन मनुष्यांना साठ वर्षांची शिक्षा सुनावली त्यावेळी एका मनुष्याला जानेवारीच्या पहिल्या तारखेस सुनावली आणि दुसऱ्या मनुष्यास जानेवारीच्या तिसऱ्या तारखेस सुनावली. पहिल्या मनुष्याची ६० वर्षे पूर्ण झाल्यावर तो मुक्त झाला आणि दुसरा मनुष्य दोन दिवसानंतर मुक्त होणार आहे, परंतु दुसरा मनुष्यसुद्धा मुक्तच म्हटला जाईल की नाही? अशी त्यांची स्थिती आहे.
नमो सिद्धाणं...
मग दुसरे कोण आहे ?
प्रश्नकर्ता : 'नमो सिद्धाणं. '
दादाश्री : आता येथून जे सिद्ध झाले आहेत, ज्यांचा येथे (पृथ्वीतलावरचा) देहसुद्धा सुटला आहे आणि ज्यांना पुन्हा देह प्राप्त होणार नाही आणि सिद्धगतीमध्ये निरंतर भगवंताच्या स्थितीमध्ये आहेत, अशा सिद्ध भगवंतास मी नमस्कार करतो.
आता येथून प्रभू श्री. रामचंद्रजी, ऋषभदेव भगवंत, महावीर भगवंत आदी सर्व जे षड्रिपुंना जिंकून सिद्धगतीला गेलेत, अर्थात तेथे निरंतर सिद्धदशेत राहणारे, त्यांना मी नमस्कार करतो. त्यात काय हरकत आहे, बोला ! त्यामध्ये काही हरकत घेण्यासारखे आहे ?
आता ते पहिल्या स्थानावरील उच्च, की दुसरे जे आताच बोललो ( नमो सिद्धाणं) ते उच्च ? हे तर देह सोडून सिद्ध झाले आहेत, पूर्णपणे मुक्त झाले ! तर आता या दोघांमध्ये उच्च कोण आणि निम्न कोण ?