________________
त्रिमंत्र
जाऊन बसले, ते तर 'नमो सिद्धाणं' झाले आहेत. त्यांना भूतकाळीतील तीर्थंकर म्हटले जाते. म्हणून आज त्यांना सिद्ध भगवंत म्हटले जाते आणि जे वर्तमान तीर्थंकर आहेत, त्यांना अरिहंत म्हटले जाते.
बुद्धिने सुद्धा समजेल अशी ही गोष्टी प्रश्नकर्ता : आज गोष्ट समजली, अरिहंताणं बोलतो, पण अरिहंत तर हे सीमंधर स्वामीच आहेत, हे आता समजले.
दादाश्री : पूर्ण भोपळा भाजीमध्ये गेला! दुधीची भाजी चिरली आणि आख्खा भोपळा त्यात गेला! असेच चालू राहते... मग काय करणार?
एक वकिल म्हणून आपणास कसे वाटले?
प्रश्नकर्ता : ही गोष्ट मला समजली, दादाजी. वकिल म्हणून तर ठीक आहे, परंतु मी जैन धर्माचा पक्का अनुयायी आहे, म्हणून मला ही गोष्ट बरोबर समजली, आपण जी गोष्ट सांगितली, त्यावर जर कोणी जैन असेल आणि तो जर बरोबर समजत असेल, तर त्याच्या लक्षात येईल की जे वर्तमानात विचरण करीत आहेत, त्यांनाच तीर्थंकर म्हणतात, म्हणून तर अरिहंताना सिद्धांच्या आधी स्थान दिले आहे.
ते कोठेही असोत, तरी सुद्धा प्रत्यक्षच प्रश्नकर्ता : ते लोक असे मानत असतील ना की सीमंधर स्वामी परदेशात आहेत?
दादाश्री : वर्तमान तीर्थंकर कोठे आहेत हे पहायचे नाही. मग ते परदेशात असतील किंवा कोठेही असतील. तसे पाहिले तर ते प्रथम बिहारमध्ये होते, त्याचा या चरोतरवाल्यांशी (गुजरात) काय संबंध? गाड्या नव्हत्या, काहीही नव्हते, तर मग काय संबंध असणार? परंतु नाही, येथे बसल्या-बसल्या त्यांचा नामजप करीत राहतात. फक्त कळले की तीर्थंकर आहेत. ते मग कितीही दूर असतील, परंतु कुठल्यातरी