________________
त्रिमंत्र
वैष्णव मत आहे' तर दुसरा म्हणेल की 'हे आमचे हे मत आहे.' अर्थात या मतवाल्यांनीच लोकांच्या मनात संभ्रम निर्माण केला आहे. तर हे त्रिमंत्र निष्पक्षपाती मंत्र आहेत. यात जैनांचा किंवा वैष्णवांचा, असे काही आहे का? नाही. हा भारतातील सर्व लोकांसाठी आहे. त्यामुळे या त्रिमंत्राच्या उच्चारणामुळे पुष्कळ फायदा होणार आहे, कारण त्यामध्ये उत्तम मनुष्यांना, उच्चतम कोटीच्या जीवांना नमस्कार करण्याची शिकवण दिली आहे. हे आपल्या लक्षात आले, की काय शिकवण दिली आहे ?
प्रश्नकर्ता : नमस्कार करणे.
दादाश्री : त्यांना नमस्कार केल्यामुळे आम्हाला फायदा होईल, फक्त नमस्कार म्हणण्याने फायदा होणार. तेव्हा तुम्हाला कळेल की 'हे तर माझ्या स्वत:च्याच हितासाठी आहे! जे आपल्या हितासाठी असेल, त्यास जैनांचा मंत्र असे कसे म्हणता येईल?! परंतु मतार्थ रोगी काय म्हणतात? 'हा आमचा नाही.' अरे, आमचा का नाही? भाषा आमची आहे, सर्वकाही आमचेच आहे ना?! आमचे नाही कसे? पण या सगळ्या असमंजस गोष्टी आहेत. ते तर जेव्हा त्याचा अर्थ समजावतो तेव्हा लक्षात येईल.
हे आहेत त्रिमंत्र यासाठीच आम्ही हा मंत्र मोठ्याने बोलावून घेतो.
नमो अरिहंताणं
नमो सिद्धाणं नमो आयरियाणं नमो उव्वज्झायाणं नमो लोए सव्वसाहूणं एसो पंच नमुक्कारो, सव्व पावप्पणासणो