________________
त्रिमंत्र
शासनदेव सुद्धा वेगवेगळे आहेत, ह्या संन्यस्त मंत्रांचे शासनदेव वेगळे असतात, सगळे देव निरनिराळेच असतात.
प्रश्नकर्ता : पण तीन्ही मंत्र एकाच वेळेस बोलल्याने काय फायदा?
दादाश्री : अडचणी तर दूर होतात ना. व्यवहारात अडचणी येत असतील तर त्या कमी होतात. पोलिसांशी थोडीशी ओळख असेल तर सुटका होते की नाही?
प्रश्नकर्ता : हो, सुटका होते.
दादाश्री : तर या त्रिमंत्रात जैनांचा, वैष्णवांचा आणि शैवांचा, या तीन्ही मंत्रांना एकत्र केले आहे. जर तुम्हाला देवतांची सहाय हवी असेल तर ते सर्वही मंत्र एका वेळेसच म्हणा. त्याचे शासनदेव असतात ते तुम्हाला सहाय करतील. या त्रिमंत्रामध्ये जैनांचा मंत्र आहे, तो जैनांच्या शासनदेवांना प्रसन्न करण्याचे साधन आहे. वैष्णवांचा मंत्र आहे तो त्यांच्या शासनदेवांना प्रसन्न करण्याचे साधन आहे आणि शिवाचा जो मंत्र आहे तो त्यांच्या शासनदेवांना प्रसन्न करण्याचे साधन आहे. म्हणजे प्रत्येक धर्माच्या पाठीमागे नेहमीच शासनाचे रक्षण करणारे देव असतात. हे मंत्र बोलल्याने ते देव खुश होतात, त्यामुळे आपल्या अडचणी दूर होतात.
तुम्हाला संसारात अडचणी असतील ना, तर या तीन्ही मंत्रांना एकत्र बोलल्याने त्या अडचणी नरम होतात. तुमच्या सर्व कर्मांचा उदय आला असेल ना, तर त्या उदयांना नरम करण्याचा रस्ता आहे हा. अर्थात हळूहळू मार्गावर चढण्याचा रस्ता आहे हा. ज्या कर्माचा उदय सोळा आणे आहे, तो चार आणे होईल. म्हणून हे तीन मंत्र बोलल्याने येणाऱ्या सर्व अडचणी हलक्या होतील. त्यामुळे शांति होते बिचाऱ्याला.
त्रिमंत्र निष्पक्षपाती बनवतात फार पूर्वीपासून हे तीन मंत्र आहेतच, परंतु या लोकांनी वादावादीत मंत्रसुद्धा वाटून घेतले की 'हा आमचा आणि तो तुमचा.'