________________
त्रिमंत्र
दादाश्री : संपूर्ण फळ खाणे आणि फक्त फळाचा एक तुकडा खाणे यात काही फरक नाही ? हा जो त्रिमंत्र आहे तो पूर्ण फळस्वरुपच आहे, पूर्ण फळ !
मंत्र - जप, तरीसुद्धा सुखाचा अभाव...
ऋषभदेव भगवंतांनी एकच गोष्ट सांगितली होती की, ही जी मंदिरे आहेत, वैष्णवपंथीयांचे विष्णुचे, शिवपंथीयांचे शिवाचे, जैनपंथीयांची जैनांचे अशी सर्व आपपली मंदिरे वाटून घ्या पण जे मंत्र आहेत त्यांना वाटून घेऊ नका. मंत्र वाटून घेतले तर त्यातील सत्व निघून जाईल, परंतु लोकांनी मंत्रही वाटून घेतले आणि एकादशीसुद्धा वाटून घेतली, 'ही शैवांची आणि ही वैष्णवांची. ' त्यामुळे एकदाशीचे महत्व नष्ट झाले आणि या मंत्राचे महात्म्यसुद्धा राहिले नाही. हे तीन मंत्र एकत्र न राहिल्यामुळे जैन सुद्धा सुखी होत नाहीत व दुसरे लोकसुद्धा सुखी होत नाहीत. म्हणून हा समन्वय भगवंतांनी सांगितल्यानुसार आहे.
2
ऋषभदेव भगवंत हे धर्माचे मुख मानले जातात. धर्माचे मुख म्हणजे साऱ्या जगास धर्माची प्राप्ति करवून देणारे ते स्वतः आहेत ! हा वेदांत मार्ग सुद्धा त्यांनीच स्थापित केला आहे आणि या जैनमार्गाची स्थापना सुद्धा त्यांच्या हातूनच झाली आहे.
काही लोक ज्यास आदम म्हणतात ना, ते आदम म्हणजे हे आदिम तीर्थंकरच आहेत. आदिमच्या ऐवजी आदम म्हणतात ही लोकं. अर्थात् हा सगळा जो मार्ग आहे तो त्यांनीच सांगितलेला मार्ग आहे. सांसारीक अडचणींसाठी
प्रश्नकर्ता : ऋषभदेव भगवंतांनी मंदिरे वाटून घेण्यास सांगितले, पण मंदिरातील सर्व देवता तर एकच आहेत ना ?
दादाश्री : नाही, देवता सर्व खूप वेगवेगळ्या आहेत. सर्वांचे