________________
‘भावना भव नाशिनी' या प्रसिद्ध उक्तीत भावनेसंबंधी जितके काही सांगितले जाऊ शकते ते साररूपात या सूत्रात सामावलेले आहे. भावनेचा महिमा या पेक्षा जास्त काय असू शकणार ? की ती भवपरंपरेचा अर्थात जन्म मरणाचा नाश करून अजर अमररूपामध्ये अवस्थित होण्याचे एक अनन्यतम साधन आहे. म्हणूनच माझ्या मनमंदिरात भावनेचे सुदृढ स्थान जमले व मला अभ्यास करण्यासाठी प्रेरणा मिळाली.
गुरुणीमैया डॉ. धर्मशीलाजी महाराजांच्या असीम कृपेणे ज्ञानवृद्धीसाठी लागणाऱ्या सर्व सुविधा सहजतेने प्राप्त झाल्या. गुरुभगवंतांच्या आशीर्वादाने आणि जैनसंघांच्या सहकार्याने अभ्यासाचा माझा उत्साह उत्तरोत्तर वाढत गेला.
विषय निर्धारित झाल्यानंतर सर्वप्रथम जैन आगम साहित्यात भावनेसंबंधी संपूर्णपणे अथवा प्रासंगिक रूपात जे काही विवेचन झाले आहे त्याचे संशोधन सुरू केले. त्यात अंग, उपांग, मूळ छेद प्रकीर्णक इत्यादी आगम वाङ्मय आणि त्याच्या आधारावर प्राकृत, संस्कृत, अपभ्रंश इत्यादी प्राचीन भाषेत रचलेले दर्शन साहित्य आणि योग याचा अभ्यास केला. त्यातील काही ग्रंथांची नावे खालील प्रमाणे आहे
वारसाणुवेक्खा - आचार्य कुन्दकुन्द तत्त्वार्थसूत्र व प्रशनरति प्रकरण - आचार्य उमास्वाती भगवती आराधना - आचार्य शीवार्य कार्तिकयानप्रेक्षा - स्वामी कार्तीकय योगशास्त्र - आचार्य हेमचंद्र ज्ञानार्णव - आचार्य शुभचंद्र शान्तसुधारस भावना - उपाध्याय विनयविजय यशस्तिलक चम्पु - आचार्य सोमदेव बृहद्रव्य संग्रह टीका - श्री ब्रह्मदेव आणि श्री पुट्टय्या स्वामी रुइधू ग्रंथावली - मुनी रइधू। भावना शतक - मुनी रत्नचंद्रजी भावनायोग : एक विश्लेषण - आचार्य श्री आनंदऋषीजी अमूर्त चिंतन - आचार्य महाप्रज्ञजी भावना भवनाशिनी - मुनी श्री अरुणविजयजी, राजेंद्रमुनी शास्त्री, श्री राजशेखर
सूरी, रसिकलाला शाह