Book Title: Swayambhu Stotra Chaturvinshati Jinstuti
Author(s): Samantbhadracharya, Prabhachandracharya, Jindas Parshwanath Phadkule
Publisher: Sakharam Nemchand Doshi
View full book text
________________
स्तुति करण्याला प्रारंभ केला. क्रमाने सात तीर्थकरांची स्तुति करून योगिराजाने आठव्या तीर्थकरांच्या स्तुतीचा---
* यस्यालक्ष्मी परिवेषभिन्न
तमस्तमोरेरिव रश्मिभिन्नम् । ननाश बाह्यं बहुमानसं च
ध्यानप्रदीपातिशयेन भिन्नम् ॥३७॥ हा श्लोक उच्चारताक्षणी महादेवाचे लिंग ताडकन् फुटले व त्यांतून जिनेश्वराची चतुर्मुख प्रतिमा बाहेर निघाली, त्यावेळेस राजा व इतर सभ्य जनांना फार आश्चर्य वाटले.
* येथे ' भिन्नं ' हा शब्द तीन वेळेस आला आहे. व तिसऱ्या चरणांत 'ननाश' हा शब्द आला आहे. 'भिन्न ' शब्दाचा अर्थ फुटणे असा होतो. ' ननाश' या शब्दाचा अर्थ 'नाश पावला ' असा होती. हा श्लोक ह्मणतांनाच तें महादेवांचे लिंग फुटलें यावरून या श्लोकांतील भिन्न व ननाश या शब्दांची सार्थकता मनाला पूर्ण पदतें. या शब्दाच्या रचनेवरूनहि आचार्यांच्या या कथेत किती सत्यांश भरला आहे हे व्यक्त होते. तसेंच चंद्रप्रभ तीर्थकरांच्या स्तुतीच्या पहिल्या श्लोकांतच 'बन्दे ' मी ' नमस्कार करितो' असा शब्द आला आहे. प्रथमच्या सात तीर्थकरांच्या स्तुतिमध्ये हा शब्द आला नाही. तेव्हां आठव्या तीर्थंकराची स्तुति करीत असतांना त्यांनी नमस्कार केला व नमस्कार केल्यानंतर दुसऱ्या श्लेकाचा प्रथम चरण ह्मणता क्षणीच तें फुटून चतुर्मुखी चंद्रप्रभाची प्रतिमा बाहेर निघाली. या सर्व विवेचनावरून ही दंतकथा नसून ही सत्यकथा आहे असे सिद्ध होते. मल्लिषेण प्रशस्तीमध्ये हेच सांगितले आहे. चंद्रप्रभ तीर्थकरांचीच प्रतिमा का निघावी ? यामध्ये हि कांहीं गूढ आहे. ते असें. महादेवाने आपल्या डोक्यावर चंद्र धारण केला आहे. व चंद्रप्रभ तीर्थकरांनी आपल्या पदकमलीं चंद्र धारण केला आहे. यावरून महादेवापेक्षां चंद्रप्रभच श्रेष्ठ आहेत. आणि ह्मणूनच महादेवाची पिंड फुटून चंद्रप्रभ प्रतिमा निघाली,
Jain Educationa International
For Personal and Private Use Only
www.jainelibrary.org