Book Title: Swayambhu Stotra Chaturvinshati Jinstuti
Author(s): Samantbhadracharya, Prabhachandracharya, Jindas Parshwanath Phadkule
Publisher: Sakharam Nemchand Doshi
View full book text
________________
(१९३) खाचा अनुभव घेतला. तदनंतर त्या सुखापासून त्यांना वैराग्य उत्पन्न झालें, ह्मणून त्यांनी चक्रवर्ति पदाचा देखील त्याग केला. स्त्री, नाना त-हेचे रत्नालंकार व अनेक प्रकारची भोगोपभोगाची सामग्री, जिच्यापासून इन्द्रियसौख्याची प्राप्ति होते; या सर्वापासून ते पराङ्मुख झाले. त्यांनी आपली इन्द्रिय पूर्ण ताब्यांत ठेविली. मनोवांच्छित व इन्द्रियांना तृप्त करणाऱ्या ऐश्वर्याने तृष्णानीच्या ज्वाला जास्तीच पेट घेतात. या ज्वालांचा नाश, आपणांस कितीही असले ऐश्वर्य मिळाले तरी, होत नाही. उलट यांची वाढच होते. या आशारूपी अग्नीच्या ज्वालांनी आत्मा सदोदित दग्ध होत असतो. या आशाग्नीच्या ज्वाला ज्यांना इन्द्रियांचो तृप्ति करणारे पदार्थ मिळत नाहीत त्यांनाच जाळून भस्म करीत असतील असे नाही, तर चक्रव
ला देखील आपला प्रभाव या अवश्य दाखवितात. चक्रवर्तीला जरी उत्तम पदार्थ वरचेवर मिळत असतात तथापि, याही पेक्षा अधिक पदार्थ आपल्याजवळ असावेत असे त्याला वाटत असते. यास्तव तो देखील या आशाग्नीच्या ज्वालांनी सदा होरपळत असतो. भोगोपभोगाच्या पदार्थांनी केवळ शरीरास काही वेळपर्यंत सुख मिळत असेल, शरीराचा दाह मिटत असेल, परंतु या पदार्थांच्या प्राप्तीमध्ये आशाग्नीच्या ज्वालांनी होरपळमाया अंत:करणाला अणुमात्रही शांति मिळत नाही. मोगोपभोगाचे पदार्थ अग्नीच्या ज्वालांना तीन दुःखदायक मात्र बनवितात. अशा त-हेच्या विचारांनी कुंथुजिनास वैराग्य
उत्पन्न झाले.
- किं पुनस्तत्पराङमुखेन भूत्वा कृतमित्याहविषयसै ख्यापासून विरक्त होऊन त्यांनी काय केलें हैं
ग्रंथकार सांगतात.
Jain Educationa International
For Personal and Private Use Only
www.jainelibrary.org