Book Title: Swayambhu Stotra Chaturvinshati Jinstuti
Author(s): Samantbhadracharya, Prabhachandracharya, Jindas Parshwanath Phadkule
Publisher: Sakharam Nemchand Doshi
View full book text
________________
( २३९ ) इत्थं त्वयि विभाति सति हे भगवन् , अभूवन संजाताः । के ? अन्यमतयः भवत्प्रणीततत्वादन्यस्मिंस्तत्वे मतिर्बुद्धिर्यषामीश्वरकपिलसुगतादीनां । कथम्भूता अभूवन् ? खद्योता इव खे आकाशे द्योतन्ते इति खद्योताः कीटविशेषाः त इव । हतप्रतापाः संजाताः इत्यर्थः । _ मराठी अर्थ:-हे केवलज्ञानसंपन्न नमि जिनेंद्रा! तूं परमात्मस्वरूपामध्ये लीन होऊन कर्माचा त्यांच्या कारणासह नाश केलास, यामुळे विद्वान लोकांना तूं मोक्षमार्ग झाला आहेस. विद्वानांना हे जिनेश तूं मोक्षमार्ग दाखऊन दिला आहेस. आषाढ महिन्यांतील सूर्याप्रमाणे केवलज्ञानरूपी तेजस्वी किर णांनी अद्वितीय सूर्य असा तूं प्रकाशित झाला असतां तुझ्यापुढे असे महादेव, कपिल, बुद्ध वगैरे कुदेव काजव्याप्रमाणे कांतिः हीन दिसू लागले.
तात्पर्य-मोक्षमार्गस्य नेतार, भेत्तारं कर्मभूभृताम् । ..... . ज्ञातारं विश्वतत्वानां, वन्दे तद्गुणलब्धये ॥ .... __या श्लोकांत वर्णिलेल्या तीन गुणांचे धारक नमि जिनेश होते. त्यांनी कर्माचा नाश केला होता मणून त्यांच्या ठिकाणी कर्मभेदनत्व गुण होता. विद्वानांना मोक्षमार्गाचा उपदेश केला होता आणून त्यांच्या ठिकाणी नेतृत्व गुण होता. व ते सर्वज्ञ असल्यामुळे त्यांनी ज्ञातृत्व गुणाला धारण केले होते. . सदानी सप्तभंगसमाश्रयणेन भगवता यथा तत्ममुपदिएं तथा प्रदर्शयन्नाह । सर्वज्ञ अशा नाम निनांनी त्यावेळेस सप्तभंगाच्या आश्रयाने
जो तत्वांचा उपदेश केला त्याचे आचार्य वर्णन करतात. ' विधेयं वार्य चानुभयमुभयं भिश्रमपि तत्, विशेषैः प्रत्येक नियमविश्यैश्वापरिमितेः । सान्योन्यापेक्षा सफलभूवनश्येष्टगरणा,
Jain Educationa International
For Personal and Private Use Only
www.jainelibrary.org