Book Title: Swayambhu Stotra Chaturvinshati Jinstuti
Author(s): Samantbhadracharya, Prabhachandracharya, Jindas Parshwanath Phadkule
Publisher: Sakharam Nemchand Doshi

View full book text
Previous | Next

Page 295
________________ ( १५१ ) कारि यत एवं अतः हे नाथ विवेदिथ ज्ञातवान् किं तत् ? इदे जगत्। किं क्रमेण ? | युगपत् एक हेल्या । किं नियतम् ? अखिलं च नि रवशेषमेव । किं नियतकाले ? सदा सर्वकालं । किमिव ? तलाम1 लकवत् तले करतले आमलकः स्फाटिकमणिः स इब तद्वत् । अर्थ :- हे प्रभो नेमि जिनेश ! आपली नेत्र, कान, नाक, वगैरे इन्द्रियें व अन्तकरण हीं सर्वज्ञपणाला बाधा आणीत नाfia वहीं सर्वज्ञपणाला साहायक ही नाहीत. हे जिनेश ! आपण हे सगळे जग तळ हातांत असलेल्या स्फटिक मण्याप्रमाणे एकदम, पूर्णपणे व हमेशा जाणले आहे. विशेष स्पष्टीकरणः - श्री नेमि जिनेश्वराचे ज्ञान अतीन्द्रि होते यामुळे इन्द्रियांचा व मनाचा पदार्थांचे स्वरूप जाण यामध्ये त्यांना कांही उपयोग होत नसे. तसेंच त्यांच्या अती. न्द्रिय ज्ञानामध्यें हीं इन्द्रिय व्यत्यय देखील आणीत नव्हती. यामुळे ही इन्द्रियें असून नमल्यासारखींच होती. श्री नेमि जिaft पदार्थांना क्रमानें जाणलें नाहीं. क्रमानें जाणू लागल्यास त्यांना सर्वज्ञ ह्मणतां येणार नाहीं कारण पदार्थ अनंत आहेत. त्यांचा एक एक स्वभाव जाणीत बसल्यास अनंत काल निघून जाईल. एका समत्रांत एकच पदार्थ जागला गेल्याने सर्वज्ञपणा नष्ट होईल. यास्तव श्री जिनांचे ज्ञान इन्द्रियजन्य नव्हे हैं सिद्ध होते. इन्द्रियें मात्र क्रमाकमाने पदार्थांना जाणतात. अतीन्द्रिय ज्ञान एकदम सर्व पदार्थांना जाणते. इन्द्रियजन्य ज्ञान सर्व पदार्थांना जाणीत नाहीं. ते पदार्थांच्या कांही अंशांना जाणतें. इन्द्रियजन्य ज्ञान ज्ञानावरणीय कर्माचा जसा क्षयोपशम असेल त्याप्रमाणे त्याला अनुसरून ते पदार्थांना जाणतें. अतीन्द्रिय ज्ञान आत्म्यापासून उत्पन्न होतें. तें ज्ञानावरणीय कर्मांचा अभाव झाल्यामुळे अत्यंत स्पष्ट असतें. यामुळे त्या ज्ञानामध्ये सर्व Jain Educationa International For Personal and Private Use Only www.jainelibrary.org

Loading...

Page Navigation
1 ... 293 294 295 296 297 298 299 300 301 302 303 304 305 306 307 308 309 310 311 312 313 314